Rakiura म्हणजे Land of Glowing Skies! न्यूझीलँडमधील स्टिवर्ट आयलँडला दिलेलं हे नाव केवळ काव्यात्मक नाही; त्यामागे सुंदर अनुभव आहे. युरोपियन प्रवाशांना सर्वसाधारणपणे १७व्या – १८व्या शतकात आकाशात सुंदर रंगप्रकाश आढळले. ब्रिटीश समुद्रप्रवासी आणि संशोधक जेम्स कूक यांनी साऊथ पोल परिसरात अनेक मोहिमा केल्या आणि त्यांनी प्रवासादरम्यान आकाशात दिसणाऱ्या या नॅचरल फेनॉमेनाचं निरीक्षण करून त्याची नोंद केली आणि त्याला Aurora Australis म्हणून नाव देण्यात आलं… ज्याला आपण सदर्न लाईट्स म्हणतो. पण, त्याआधीपासूनच माओरी संस्कृतीमध्ये या उजळत्या आकाशाला विशेष महत्त्व दिलं गेलंय. आकाशात अचानक दिसणारे हिरवे, गुलाबी, लालसर रंग त्यांनी पाहिले आणि त्या उजळत्या आकाशाला अर्थ दिला. त्यांच्या दृष्टीने हा फक्त प्रकाश नाही, तर पूर्वजांचा आशीर्वाद आहे. या श्रद्धेला जोपासत ते आकाशातील हा सोहळा आदरपूर्वक साजरा करत.
मंडळी, या नॅचरल फेनॉमेनाबद्दलचं कुतूहल अजून वाढलं असावंच. कारण नॅचरल फेनॉमेना म्हंटलं की, मनात आपसूकच आठवतात त्या म्हणजे युरोपमधील स्कँडीनेव्हियन कंट्रीजमधील नॉर्दर्न लाईट्स, अर्थात Aurora Borealis. हिरव्या, गुलाबी आणि जांभळ्या रंगांच्या नॉर्दर्न लाईट्स अतिशय मोहक दिसतात. जे वर्ल्ड फेमस अट्रॅक्शन आज प्रत्येक पर्यटकांच्या बकेट लिस्टमध्ये आहे. आईसलँड, कॅनडा आणि अलास्का या देशांमध्ये सप्टेंबर ते मार्चदरम्यान त्या पहायला मिळतात. तर असाच एक निसर्गाचा अद्भूत चमत्कार म्हणजे मिडनाईट सन अर्थात मध्यरात्रीही आकाशात दिसणारा सूर्य ! हे प्रामुख्याने आर्क्टिक सर्कलच्या वरच्या भागात दिसते. जसे की, नॉर्वे, आईसलँड, फिनलँड आणि अलास्का. मे ते जुलै या काळात काही ठिकाणी २४ तास सूर्यप्रकाश अनुभवायला मिळतो. रात्री १२ वाजताही सूर्य दिसतो. निसर्ग सोनसळी प्रकाशात उजळतो. ट्रेकिंग, क्रूझ आणि साईटसिईंग्स् रात्रीही करता येतात. हे नॅचरल फेनॉमेना फक्त नॉर्थ पोलपुरते मर्यादित राहिले नाहीत. जगाच्या दुसऱ्या टोकाला, म्हणजे साऊथ पोल परिसरात, न्यूझीलँड आणि अंटार्क्टिका येथे तितकाच सुंदर हिडन जेम….. जो आजही अनटच्ड आहे, तो म्हणजे सदर्न लाईट्स ! भौगोलिक दृष्ट्या पाहिलं तर, नॉर्थ पोल परिसरात भूभाग मोठ्या प्रमाणात आहे आणि लोकवस्तीही. शिवाय, इथले नॅचरल फेनॉमेना अनुभवण्यासाठी डोम, ऑब्झर्व्हेटरी डेकसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. साऊथ पोलचं चित्र मात्र याहूनही अनोखं आहे. इथे समुद्राचं प्रमाण जास्त, भूभाग कमी आणि लोकवस्तीही तुलनेने कमी आहे. इथल्या स्टिवर्ट आयलँडवर जाऊन सदर्न लाईट्स बघतो. जगाच्या एका टोकाला जाऊन हे सगळं अनुभवणं… ही मजाच काही औरच! या सुंदर सदर्न लाईट्सचा अनुभव आपल्याला घेता यावा म्हणून आम्ही न्यूझीलँड सदर्न लाईट्स ही टूर सुरू केली आहे. ही टूर म्हणजे जगातील अजून एका नॅचरल फेनॉमेनाचा एक अविस्मरणीय अनुभव देण्याचा प्रयास !
न्यूझीलँडमध्ये सदर्न लाईट्स अनेक ठिकाणांहून दिसतात. पण आपण हा नजारा स्टिवर्ट आयलँडवरून पाहतो. जे न्यूझीलँडमधील तिसरे सर्वात मोठे आयलँड आहे. भौगोलिकदृष्ट्या याचं कारणही अत्यंत खास आहे. या आयलँडवर लोकसंख्या कमी, शिवाय वाहनांची ये-जा कमी असल्यामुळे प्रदूषणही कमी आहे. ज्यामुळे रात्रीचं आकाश पूर्णपणे निरभ्र आणि गडदळ दिसतं. यामुळे इथे आकाशगंगा, तारे आणि aurora australis अतिशय स्पष्टपणे दिसतात. हे सगळं पाहता २०१९ साली इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशनने स्टिवर्ट आयलँडला अधिकृतपणे डार्क स्काय सँक्च्युरी म्हणून मान्यता दिली. म्हणजे अशी जागा जिथे रात्रीच्या नैसर्गिक आकाशाचं जतन केलं जातं, जेणेकरून भविष्यातील पिढ्यांनाही इथे नॅचरल फेनॉमेना अनुभवता येतील. तसंच, न्यूझीलँडचा राष्ट्रीय पक्षी म्हणजे किवीचा कधी कधी मुक्त वावर दिसतो. रात्रीच्या शांततेत किवीचा आवाज आणि आकाशात नाचणारे रंग… ही जोड शब्दांत मांडणं कठीण आहे. स्टिवर्ट आयलँडला जाण्याचा प्रवाससुद्धा तितकाच सुंदर आणि संस्मरणीय आहे. हा प्रवास जणू एखाद्या नटशेल जर्नी सारखा वाटतो. छोटासा, पण निसर्गाच्या अप्रतिम अनुभवांनी भरलेला. ख्राईस्टचर्च ते इन्व्हरकारगिल हा विमान प्रवास दक्षिणेकडील निसर्गसौंदर्याची पहिली झलक दाखवतो. वरून दिसणारे बर्फाच्छादित पर्वत, हिरव्यागार दऱ्या आणि निळ्याशार किनाऱ्यांचं दृश्य मन मोहून टाकतं. त्यानंतर इन्व्हरकारगिल ते ब्लफ हा रोड प्रवास शांत किनारी प्रदेशातून पुढे सरकतो आणि मग खऱ्या अर्थाने सुरू होतो रोमांचक टप्पा… ब्लफ ते स्टिवर्ट आयलँड डार्क सँक्च्युरी हा फेरी प्रवास! समुद्राच्या लाटांवरून पुढे जाताना सभोवताली पसरलेलं अथांग निळं पाणी आणि हळूहळू जवळ येणारं स्टिवर्ट आयलँड जणू एखाद्या वेगळ्याच जगात प्रवेश करत असल्याची जाणीव करून देतं.
या प्रवासात न्यूझीलँडचं निसर्गसौंदर्यही अगदी जवळून अनुभवता येतं. हिरव्यागार दऱ्या, बर्फाच्छादित पर्वत, तलाव, फ्यॉर्ड्स, ग्लेशियर्स आणि समुद्रकिनारे यांचा अप्रतिम संगम पहायला मिळतो. आपला हा प्रवास अभ्यासपूर्ण टूर म्हणून नियोजनबद्ध रितीने आखला आहे. विशेष म्हणजे स्टिवर्ट आयलँड येथे दोन रात्रींचा स्टे असल्यामुळे सदर्न लाईट्स पाहण्याची संधी अधिक असते. इथली हॉटेल्सही निसर्गाच्या सान्निध्यात असल्यामुळे सभोवतालचा नजारा एक सुंदर कॅनव्हास वाटतो. या टूरचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक ठिकाण एक नवा अनुभव देतं. निसर्ग, अॅडव्हेंचर आणि मजा… हे सगळं काही एकाच प्रवासात ! धुक्याने वेढलेले डोंगर आणि उंचच उंच धबधबे यातून वाट काढत जाणाऱ्या मिलफर्ड साऊंड क्रूझमध्ये बसल्यावर जाणवतं की, निसर्ग किती भव्य आहे. रोटोरूआमध्ये निसर्ग वेगळ्याच रूपात दिसतो… हॉट गिझर्स आणि जमिनीतून उसळणारी वाफ; इथे पृथ्वीचं अनोखं रूप दिसतं. Te Puia Geothermal Park मध्ये हॉट गिझर्स साधारण ३० मीटर उंच उडताना पाहणं म्हणजे पृथ्वीच्या उर्जेचं थेट दर्शनच! ॲग्रोडोममध्ये न्यूझीलँडचं ग्रामीण जीवन अनुभवायला मिळतं… मेंढ् शेतीचे प्रकार आणि स्थानिक जीवनशैली दिसते. या निसर्गसौंदर्याचा अनुभव घेतल्यानंतर प्रवास पोहोचतो क्वीन्सटाऊन येथे, जे जगाचं अॅडव्हेंचर कॅपिटल आहे. जगातील पहिलं कमर्शिअल बंजी जंपीग इथेच सुरू झालं असं म्हणतात. मग प्रवास पोहोचतो एका जादुई दुनियेत अर्थात् वायटोमो ग्लोवर्म केव्हज् येथे. शांत पाण्यातून बोट हळूहळू पुढे सरकताना अंधारात अचानक हजारो लुकलुकणारे ग्लोवर्म्स दिसतात जो स्वप्नवत अनुभव वाटतो. इथलं पझलिंग वर्ल्ड म्हणजे एक मजेशीर प्लेग्राउंडच ! इल्युजन रूम, थ्रीडी पझल कॅफे गोंधळात टाकतात, पण हाच गोंधळ मजेशीर वाटतो. ग्रेट मेझमध्ये फिरताना प्रत्येक वळणावर हाच प्रश्न उभा राहतो… बाहेर कसं पडायचं ? असे सगळे अनोखे अनुभव घेतल्यावर असं वाटतं आपण वेगळ्याच दुनियेतून परत आलोय. मंडळी, जगातल्या प्रत्येक ठिकाणांचं वेगवेगळं वैशिष्ट आहे. नॉर्दर्न लाईट्स, मिडनाईट सन, सदर्न लाईट्स… या आणि अशा इतर नॅचरल फेनॉमेना मागे दडलेलं सौंदर्य केवळ डोळ्यांनी पाहण्याचं नसतं, तर मनापासून अनुभवण्याचं असतं. अशा ठिकाणी जाऊन आल्यानंतर जीवनाला नवा दृष्टिकोन मिळतो, मनाला शांतता लाभते आणि निसर्गाची किमया जवळुन अनुभवता येते. चला तर मग, आयुष्याच्या प्रवासात निसर्गाच्या या अद्भुत रंगसोहळ्याचा एक अविस्मरणीय अनुभव घेऊया !


