आज आपला स्टे इथेच!

जेव्हा आम्ही लाहौल-स्पिती विथ चंद्रताल या टूरला निघतो, तेव्हा अनेक पर्यटकांच्या मनात एक वेगळीच ओढ असते; ती म्हणजे untouched, unexplored हिमालय अनुभवण्याची. त्या उत्सुकतेसोबतच प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न हमखास असतो… ‘इथला स्टे कसा असणार?’

दिवसभर हिमालयातील high-altitude road trips, sightseeing, monasteries, valleys आणि लांबचा प्रवास अनुभवल्यानंतर प्रत्येकालाच relaxing stayची गरज असते. कुणासाठी हॉटेल रूम आणि तिथून दिसणारा व्ह्यू महत्त्वाचा असतो, तर कुणासाठी आराम आणि हे सगळं अगदी स्वाभाविक आहे.

या टूरचा अनुभव आणखी खास व्हावा आणि तिथल्या unseen beautyशी एकरूप होता यावं, यासाठी आम्ही या टूरमध्ये एक खास स्टे ठेवला आहे… तो म्हणजे स्पिती व्हॅलीतील चंद्रताल येथील टेंट स्टे!

समुद्रसपाटीपासून साधारण 14,000 फूट उंचीवर, चंद्राच्या आकारासारख्या मोहक तलावाजवळ आणि उंच पर्वतरांगांच्या सान्निध्यात राहण्याचा हा अनुभव शब्दांच्या पलीकडचा असतो! इथे luxury नसते, पण natural beauty भरभरून असते. इथे city life नसते, पण मनाला खोलवर भिडणारी शांतता असते. निसर्गाचा साधेपणा आणि त्याचा स्पर्श मनाला भावतो आणि प्रत्येक क्षण जणू निसर्गाची खरी श्रीमंती अनुभवायला लावतो.

इथलं आकाश हेच इथलं सर्वात मोठं आकर्षण आहे… Pollution almost zero! हवामान अनुकूल असल्यास रात्री Milky Way आणि तारे पाहण्याची संधी मिळते. त्यामुळेच हे ठिकाण भारतातील best stargazing spots पैकी एक मानलं जातं. संपूर्ण दिवस हिमालयाचं भव्य सौंदर्य अनुभवल्यानंतर हा टेंट स्टे मनाला वेगळीच शांतता देतो. सकाळी टेंटमधून बाहेर पडताच समोर दिसणारे पर्वत आणि Spiti Valleyची raw beauty हे क्षण मनात कायमचे कोरले जातात. एका रात्रीचा हा स्टे जणू निसर्गाशी केलेली विपश्यना वाटते, जी आपल्यात आणि निसर्गात एक सुंदर संवाद घडवून आणते.

हा अनुभव घेतल्यानंतर चंद्रताल ते मनाली हा रोहतांग पासमार्गे होणारा प्रवास, मनालीतील रिव्हर राफ्टिंग, जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस असलेलं हिक्कीम आणि इतर अनेक must-see sightseeing experiences संपूर्ण टूरला आणखी खास बनवतात. टूरवरून परतताना अनेकांच्या मनात कायम घर करून राहतो तो चंद्रताल येथील शांत, निवांत, साधा आणि निसर्गाच्या कुशीतील टेंट स्टे… कारण काही ठिकाणं फक्त पाहायची नसतात, ती अनुभवायची असतात!

Tags