रिफ्रेशिंग लाँग विकेंड टूर्स!

कॅलेंडरमध्ये सलग सुट्ट्या दिसल्या की, मन आधीच बॅग भरायला लागतं! ऑगस्ट-सप्टेंबर म्हणजे वर्षातील असा काळ, जेव्हा निसर्ग, आनंददायी सण-उत्सव आणि सुट्ट्या हे तिन्ही एकत्र येऊन प्रवासासाठी परफेक्ट निमित्त ठरतात. पावसाच्या रिमझिम सरी, धुक्याने वेढलेले डोंगर, हिरवाईने नटलेल्या दर्‍या आणि सुखद गारवा… प्रत्येक क्षण मनाला नवसंजीवनी देणारा असतो. म्हणूनच या महिन्यांतील लाँग वीकेंड म्हणजे फक्त सुट्टी नाही, तर स्वतःला रिफ्रेश करण्याची सुवर्णसंधी आहे! 

आजच्या धावपळीच्या आयुष्यात मोठ्या सुट्टीची वाट पाहण्यापेक्षा लोक छोट्या-छोट्या ब्रेकमध्ये मोठा आनंद शोधू लागले आहेत. दोन-तीन दिवसांचा प्रवासही मनाला नव्या उर्जेने भरून टाकतो. कुटुंबासोबत क्वॉलिटी टाईम, मित्रांसोबत धम्माल, मुलांसोबत आठवणी किंवा स्वतःसोबत निवांत वेळ… प्रत्येकासाठी हा काळ काहीतरी खास घेऊन येतो. याच दरम्यान स्वातंत्र्यदिन, जन्माष्टमी आणि गणेशोत्सव अशा सणांचीही रेलचेल असते. त्यामुळे प्रवास फक्त पर्यटन राहत नाही, तर भारताच्या संस्कृतीचा, परंपरांचा आणि उत्सवांचा अनुभव बनतो. प्रत्येक राज्याचा वेगळा रंग, वेगळी चव, वेगळी संस्कृती आणि वेगळा उत्साह हीच तर प्रवासाची खरी मजा! 

उत्तराखंडच्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्समधील रंगीबेरंगी फुलांचा सडा, लेह लडाखमधील निळाशार पँगाँग त्सो लेक, काश्मीरच्या स्वर्गीय दर्‍या, हिमाचलच्या धुक्यात हरवलेले रस्ते पाहता भारतात निसर्ग प्रत्येक वळणावर नवा चमत्कार दाखवतो. जर यंदा परदेशवारीची इच्छा असेल, तर ईझी-फ्री व्हिसा कंट्रीज, साऊथ ईस्ट एशियाचे सुंदर समुद्रकिनारे, ऑस्ट्रेलियाचा स्प्रिंग सीझन, आफ्रिकेतील ‘द ग्रेट मायग्रेशन’, चायनाचा ऑटम सीझन, श्रीलंकेतील रामायण ट्रेल, जपानची शिस्त आणि आदरातिथ्य, अमेरिकेची भव्यता किंवा युरोपचं स्वप्नवत सौंदर्य… देशविदेशातील प्रत्येक डेस्टिनेशन आपल्या बकेट लिस्टमधील एक सुंदर स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे. 

आणखी एक बोनस म्हणजे शॉपिंगचा जल्लोष! ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अनेक देशांमध्ये सीझन एंड सेल्स आणि मेगा शॉपिंग ऑफर्स सुरू असतात. खासकरून दुबई आणि साऊथ ईस्ट एशियामध्ये या काळात सुरू असलेल्या सेल्समुळे शॉपिंग लव्हर्सची विशेष रेलचेल असते. प्रवासासोबतच ब्रँडेड वस्तू, फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स, परफ्यूम्स, चॉकलेट्स आणि स्थानिक खास वस्तू आकर्षक दरात खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळते. गेल्या वर्षीही अनेक पर्यटकांनी लाँग वीकेंड आणि या देशांमध्ये सुरू असलेल्या मेगा सेल्सचं निमित्त साधत या टूरची निवड केली होती. म्हणजेच, लाँग वीकेंडमध्ये ट्रॅव्हल, सेलिब्रेशन, रिलॅक्सेशन आणि शॉपिंग अशा सगळ्याच आनंदांचा एकाच वेळी अनुभव घेता येतो! 

पर्यटनाचा हा ऑफ-सीझन म्हणजे कमी आनंद नव्हे; उलट कमी गर्दी, निवांत पर्यटन, अधिक सुंदर फोटो, उत्तम सेवा आणि निसर्गाशी जवळीक अनुभवण्याचा हा सर्वोत्तम काळ आहे. निसर्ग, अध्यात्म, शॉपिंग किंवा इंटरनॅशनल टूर… आपल्या आवडीचा प्रत्येक प्रवास तयार आहे.  यंदाच्या ऑगस्ट-सप्टेंबरमधील प्रत्येक लाँग वीकेंडला आयुष्यभर लक्षात राहील अशी आठवण बनवा. कारण प्रवास फक्त ठिकाणं दाखवत नाही, तो नात्यांना अधिक जवळ आणतो, मनाला नवी ऊर्जा देतो आणि आयुष्याला नवे रंग देतो. केसरीच्या गेल्या 42 वर्षांच्या विश्वासार्ह नियोजनासोबत आपला प्रत्येक प्रवास होईल सुरक्षित, आनंददायी आणि अविस्मरणीय!

गणेशोत्सव म्हणजे आनंद, उत्साह आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक! बाप्पाच्या आगमनाने घरात जशी मंगलमय चाहूल लागते, तशीच मनात नव्या प्रवासाचीही ओढ निर्माण होते. गप्पांच्या मैफिलीत जुन्या टूरच्या आठवणी रंगतात आणि पुढची टूर कुठे करायची? याची स्वप्नं आकार घेऊ लागतात. आपसूकच दसरा, दिवाळी, ख्रिसमस आणि न्यू ईयर हॉलिडेचं प्लॅनिंगही सुरू होतं. फेस्टिव्हल्सचा आनंद आणि प्रवासाचा उत्साह यांचं सुंदर नातं जुळतं. याच वातावरणात प्रत्येकाला ड्रीम डेस्टिनेशन्स खुणावू लागतात. अंदमानचे निळेशार समुद्र, मध्य प्रदेशचा वारसा, आंध्र प्रदेशचं आध्यात्मिक वैभव, नेपाळ-भूतानची शांतता, सिंगापूर, मलेशिया, बाली, व्हिएतनाम, फुकेतची रंगत, सिंगापूर डिस्ने क्रूझ, गेंटींग ड्रीम क्रूझ, चियांग माई लँटर्न फेस्टिव्हल, युरेशिया आणि युरोपसह प्रत्येल डेस्टिनेशन आपली वाट पाहत आहे. चला तर, यंदा बाप्पाच्या आशीर्वादाने केसरीसोबत आपल्या पुढच्या प्रवासाचाही श्रीगणेशा करूया! नव्या ठिकाणांचा अनुभव घेऊया, नव्या आठवणी जपूया. आयुष्यातील सर्वात सुंदर गुंतवणूक म्हणजे आठवणी आणि त्या निर्माण होतात प्रवासातून!

Tags