व्हिसा अमेरिकेचा

युएसए – युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेला जायचा प्लान करताय ? पण व्हिसाचे काय ? व्हिसा काढलेला असेल तर उत्तमच कारण आपण कधीही उठून युएसएच्या सहलीला जाऊ शकतो. गेल्या काही वर्षांत बऱ्याच भारतीय मंडळींकडे युएसएचे पासपोर्ट असण्याचे प्रमाणही वाढले आहे. परंतु आपल्याकडे जर अमेरिकेचा व्हिसा नसेल तर आणि पुढच्या वर्षी आपण अमेरिकेच्या सहलीला जाण्याचा विचार करत असाल, तर हीच ती वेळ. अजुनही अमेरिकेचा व्हिसा मिळायला वेळ लागतोय.

बऱ्याचदा मित्रमंडळी आणि ओळखीचे लोक व्हिसा रिजेक्ट झाल्यानंतर मला फोन करतात, आता काय करावे ? जमेल तितकी मदत आम्ही करतो. परंतु काही वेळा आमच्याही हातात काही नसते. युरोप-अमेरिकेच्या व्हिसासाठी केसरीतील तज्ज्ञांची मदत घ्या म्हणजे पहिल्याच वेळेत व्हिसा मिळण्याची शक्यता वाढेल. अनेक ओळखीच्या मंडळीना त्यांचा व्हिसा रिजेक्ट झाल्यावर आम्ही आवश्यकतेनुसार व्यवस्थित कागदपत्रे जोडून व्हिसा मिळवून दिला आहे. अमेरिकेचा व्हिसा असेल तर इतर देशांचा व्हिसा मिळायलाही खूप मदत होते. २०२५-२६च्या अमेरिका सहलीला जायचं असेल तर व्हिसा मिळवण्यासाठी आत्ताच प्रयत्न करायला हवे. कारण हा व्हिसा सामान्यतः १० वर्षांच्या कालावधीसाठी मिळतो. बरेचदा आपण व्हिसा प्रक्रिया ऑनलाईन करतो, परंतु एखादी छोटी चूकही इथे महागात पडू शकते.

आम्ही नेहमीच सल्ला देतो की, अमेरिकेचा व्हिसा करून ठेवा. एकदा १० वर्षांचा व्हिसा मिळाला की आधी अमेरिका आणि नंतर साऊथ अमेरिका, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलँड या लांब पल्ल्याच्या टूर्स कराव्या, पुढे आपला मोर्चा आशिया खंडातील सहलींकडे वळवला तरी चालेल. कारण आशिया खंडातील देशांचा व्हिसा मिळवणं त्यामानाने सोपं असतं. काही युरोपियन देश व्हिसा देण्यासाठी २-३ महिन्यांचा वेळ घेतात आणि आपण जर नॉन रिफंडेबल तिकीट काढले असेल आणि वेळेत व्हिसा वेळेत आला नाही तर तिकीटाचे पैसे वाया जाण्याची वेळ येते, तेव्हा काळजी घ्या.

अमेरिकेची सहल तशी सोपी नाही, परंतु आम्ही ही सहल एकदम सोपी केली आहे. या सहलीत सर्वात महत्वाचे म्हणजे अमेरिकेच्या सहलीची आयटनररी (प्रोग्रॅम). कारण ईस्ट कोस्ट वेस्ट कोस्ट, आदी भागांमध्ये विभागली आहे. त्यामुळे मागेपुढे प्रवास (बँकट्रेकिंग) करावा लागू नये. म्हणून इथली आयटनररी केसरीच्या तज्ञांनी विचारपूर्वक बनवली आहे. इथली अनेक शहरे बघण्यासारखी आहेत, जणू काही वेगवेगळे देशच. न्यूयॉर्क, नायगारा, वॉशिंग्टन, ओरलँडो, लॉस एंजलिस, लास वेगास, सॅनफ्रान्सिस्को, असा इथला कोणताही प्रांत एक दुसऱ्यासारखा नाही. न्यूयॉर्कची भव्यता, सेंट्रल पार्क, इथल्या टॅक्सीझ, इथल्या रस्त्यावरील माणसांची शिस्तबद्ध गर्दी दुसऱ्या शहरामध्ये दिसत नाहीत. नायगाराचा अविस्मरणीय नजारा म्हणजे एक पैसा वसूल अनुभव. Cave of the Winds आणि Maid of the mist ची सैर तर करायलाच हवी. Cave of the Winds च्या सफरीत नायगारा धबधब्याखाली भिजायला मिळते तर Maid of the Mist मध्ये नायगाराची अगदी जवळून भेट घेता येते. सोबत फोटोग्राफीचा आनंदही आपण लुटू शकतो. वॉशिंग्टन डीसी हे तर अमेरिकेच्या राजधानीचे शहर. डिस्नेवर्ल्डला भेट देणे म्हणजे अनेकांसाठी ही तर स्वप्नपूर्तीच. मनोरंजनाची नगरी असलेली डिस्नेवर्ल्ड अनेक अमेरिकन्स तसेच जगभरातील पर्यटकांसाठी हनिमून डेस्टिनेशन बनले आहे. बेव्हर्ली हिल्स, युनिव्हर्सल स्टुडीओज आणि हॉलिवूडमुळे लॉस एंजलिसची एक वेगळीच ओळख आहे. हॉलिवूडमुळे तर संपूर्ण जगाचे लक्ष अमेरिकेने वेधले. सॅनफ्रान्सिस्को हे जगभरातील सर्वांत सुंदर शहरांपैकी एक. इथल्या बेमुळे (आखाती भागामुळे) आणि हाँगकाँगच्या समुद्रकिनाऱ्यांमुळे ही दोन्ही शहरे काहीशी सारखी दिसतात. न्यूयॉर्कहून सुरु होणारी ही सफर सॅनफ्रान्सिस्कोला संपते. या सहलीनंतर आपण आपल्या नातेवाईकांकडेही जाऊन काही दिवस राहू शकतो. केसरीच्या अमेरिका सहलींचे बुकिंग सुरु आहे. आपणही आपल्या आवडीची सहल निवडून, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन लगेच आपले बुकींग करा.

तर मंडळी, अमेरिकेची सहल केसरीसोबत म्हणजे खरंच एक अविस्मरणीय अनुभव उत्तमोत्तम हॉटेल्स, उत्कृष्ट भोजन आणि पर्यटनस्थळांची लयलूट असलेली ही अमेरिका एकदा तरी पाहायला हवी. थोडक्यात काय मंडळी, मानवनिर्मित आश्चर्य आणि नैसर्गिक सौंदर्याची अमेरिका अनुभवा फक्त केसरी सोबत !

Tags