आफ्रिका

ताई, आज साऊथ आफ्रिकेचे प्रेझेंटेशन आहे, मला सांगा ना, साऊथ आफ्रिकेचं महत्त्व मी सर्वांना कसं समजावून सांगू? आमची सेल्स इनचार्ज, शीतलने मला विचारलं. मी म्हटलं, प्रत्येक पर्यटकाने साऊथ आफ्रिका हे तर पाहिलंच पाहिजे. आफ्रिका हा एकच खंड या भूतलावर आहे जिथे बिग फाईव्ह म्हणजे सिंह, बिबटे, गेंडे, हत्ती आणि आफ्रिकन म्हैस स्वतःच्या परिसंस्थेमध्ये मुक्तपणे संचार करताहेत. आफ्रिकेतील गेम रिझर्व्ह म्हणजे जगातले एकमेव ऍनिमल किंग्डम म्हणता येईल.

साऊथ आफ्रिका, केनिया आणि व्हिक्टोरिया फॉल्स हे पॅन्डमिक नंतर होणाऱ्या एअरलाईन्स बदलामुळे थोडं जिकरीचं झालं आहे. केसरीची ही सहल पूर्वीपासून सुरु आहे आणि ती पर्यटकांना खूप आवडतेय. म्हणून आम्ही या कॉम्बिनेशन्सच्या सहली दर वेळेस घेऊन येतो. इतक्या दूर जातोय तर साऊथ आफ्रिका, केनिया आणि व्हिक्टोरिया फॉल्स असं सगळं एकत्र पाहता यावं आणि पैसा व वेळ दोन्हीची बचत करता यावी अशा प्रकारे आम्ही या टूरची आखणी करतो, ज्यामुळे एका वेगळ्या जगाची आपल्याला ओळख होते.

झांबिया आणि झिम्बाब्वेच्या सीमारेषेवर असलेला व्हिक्टोरिया फॉल्स हा झाम्बेझी नदीवरील धबधबा जगातील सगळ्यात मोठा धबधबा आहे. ५६०४ फूट रुंद असा हा धबधबा आपल्या कल्पनेपेक्षाही मोठा आहे. झांबिया आणि झिम्बाब्वे या दोन्ही देशात नॅशनल पार्क्स आहेत. पर्यटनासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा दोन्ही देशांनी निर्माण केल्या आहेत.

केनिया हे प्राण्यांचे विश्व म्हणून जगप्रसिद्ध आहे, असं म्हणता येईल. इथले गेम रिझर्व्ह, विशेषतः मसाई मारा आणि लेक नाकुरू येथे फ्लेमिंगोचे थवे, हरीण, हत्ती आणि जिराफांचे कळप हे सारं पाहणं म्हणजे एका आगळ्या-वेगळ्या जगाची सफर आपण अनुभवतो. इथे माणसांपेक्षा प्राण्यांचे वर्चस्व आहे. केनियाला ऍनिमल किंग्डममध्ये जाऊन प्रत्यक्षात ते जग पाहणं म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव. दबा धरून बसलेली सिंहीण, तिच्यावर लक्ष ठेऊन असलेली हजारो गझेल्स हरणं, त्यांच्या डोळ्यातली भिती, हत्तीचे कळप, ते लहानग्या हत्तीची कशी काळजी घेतात, हे सारं पाहणं म्हणजे एक सुखद अनुभव असतो. झेब्रा क्रॉसिंग असं का म्हणतात हे इथे खूप साऱ्या झेब्राचा मोठा कळप पाहिला की लक्षात येतं.

नेल्सन मंडेलांचा गौरवशाली इतिहास सांगणारा साऊथ आफ्रिका हा आफ्रिका खंडातील सर्वात दक्षिणेकडील देश. दक्षिण अटलांटिक महासागर आणि हिंद महासागराचा सुंदर सागरकिनारा साऊथ आफ्रिकेला लाभला आहे. साऊथ आफ्रिकेत आपण केप टाऊन, टेबल टॉप माऊंटन आणि गार्डन रूट या साऊथ आफ्रिकेतील अतिशय नयनरम्य प्रांताला भेट देतो. साऊथ आफ्रिकेची आणखी एक वेगळी ओळख म्हणजे ही आफ्रिका खंडातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे. त्याला बायोडायव्हर्सिटी हॉट स्पॉट असेही म्हणतात. प्रिटोरिया हे जरी प्रशासकीय राजधानीचं शहर असलं तरी केप टाऊन हे संसदेचं आणि विधीमंडळाचं ठिकाण आहे. केप टाऊनहून पुढे जोहान्सबर्गपर्यंतचा गार्डन रूटचा प्रवास हा जगातल्या सर्वात नयनरम्य मार्गावरचा प्रवास असंही म्हणता येईल. सर्वश्रुत प्रवासी खलाशी असलेला वास्को द गामा याने भारताचा शोध घेत केप ऑफ गुड होपला वळसा घेऊन पुढे प्रवास केला. आपण फनिक्युलर ट्रामचा प्रवास करत तिथल्या लाईट हाऊसला भेट देतो. टेबल टॉप माऊंटनला गेल्यावर झिपलाईनचा साहसी अनुभव घेता येतो.

राष्ट्रपिता गांधीजी, नेल्सन मंडेला यांचा इतिहास लाभलेल्या आफ्रिकेचं पर्यटन क्षेत्रही अतिशय विलोभनीय आहे. तिथला निसर्ग, तिथले वन्यजीवन, तिथला इतिहास व भूगोल आपल्याही या सहलींमध्ये अनुभवता येतो. तर मग मंडळी, साऊथ आफ्रिकेची टूर नक्कीच करा आणि घ्या एक अविस्मरणीय अनुभव, फक्त केसरी सोबत.

हजारो पर्यटकांना आफ्रिकन एडव्हेंचर घडविणाऱ्या केसरीसोबत आपणही चला.

Tags