परंपरा ४० वर्षांची, विश्वसनीय पर्यटनाची!

४० वर्षांपूर्वी सुरू झालेलं केसरी टूर्स आज पर्यटन क्षेत्रातील एक विश्वासार्ह ब्रँड कसा बनला? या वाटचालीतील आव्हानं, अनुभव आणि भविष्यातील वाटचाल या विषयावर केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ यांच्याशी साधलेला हा संवाद.

केसरी टूर्सची स्थापना कशी झाली ?

माझे वडील केसरी पाटील यांनी त्यांच्या वयाच्या ५०व्या वर्षी ८ जून १९८४ साली केसरी टूर्सची स्थापना केली. भारतीयांना जग दाखवायचं आणि जगभरातील पर्यटकांना आपला अतुल्य भारत, हे त्यांचं स्वप्न ! स्प्रेडिंग स्माईल्स ॲण्ड हॅप्पीनेस, हे ध्येय मनाशी बाळगत पर्यटकांना व्हॅल्यू फॉर मनी टूर्सचा अनुभव देण्याकडे त्यांचा कल आहे. लोकांना त्यांच्या अपेक्षेहून जास्त आनंद मिळाला तर प्रोडक्टचं रूपांतर बँडमध्ये होतं आणि हेच केसरीच्या बाबतीत झालं. ४० वर्षांपूर्वी सुरू झालेलं केसरी टूर्स आज पर्यटन क्षेत्रातील एक विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.

तुमचं व्हिजन आणि मिशन काय ?

पर्यटकांना सहलींचा एक अविस्मरणीय अनुभव देणं हे आमचं उद्दिष्ट! स्प्रेडिंग स्माईल्स ॲण्ड हॅप्पीनेस हे आमचं ध्येय आणि यासाठी प्रयत्न करणं हे आमचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. ज्यामुळे केसरी कालांतराने एक वर्ल्ड क्लास ट्रॅव्हल कंपनी म्हणून नावारूपास आली आहे. पर्यटन क्षेत्रात आमूलाग्र बदल करताना क्वालीटी ट्रॅव्हल आणि व्हॅल्यू अॅडेड सर्व्हस देण्याचा आमचा प्रयत्न कायम राहिला आहे.

४० वर्षांच्या या प्रवासाबद्दल काय सांगाल ?

केसरी टूर्सची सुरुवात एक ग्रुप टूर कंपनी म्हणून झाली. नावीन्याचा ध्यास आणि पर्यटकांच्या गरजा ओळखून त्यानुसार काळानुरूप बदल करत गेलो आणि लोकांच्या वैयक्तिक गरजांनुसार केसरी सिलेक्ट, कॉर्पोरेट टूर्स केसरी MICE, केसरी फॉरेक्स अशा वैविध्यपूर्ण संकल्पना रुजविल्या. तसंच भारतीय पर्यटन क्षेत्रात सहलींची नावीन्यपूर्ण संकल्पना आणत केवळ महिलांसाठीची माय फेअर लेडी, लहानग्यांसाठी स्टुडंट स्पेशल, ज्येष्ठांसाठी सेकंड इनिंग्स्, शेतकऱ्यांसाठी ॲग्रो टूर्स, जोडप्यांसाठी हनिमून टूर्स अशा प्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यांसाठी सहलींचे पर्याय उपलब्ध करून दिले.

या वाटचालीतील उल्लेखनीय कामगिरी कोणती?

ज्या काळात पर्यटनाची संकल्पना फारशी रुळलेली नव्हती, अशा वेळी माझ्या वडिलांनी ९०च्या दशकात २००-३०० जणांचा ग्रुप घेऊन काश्मीरला सहल केली. भारतातील देशांतर्गत सहलींसाठी आणि पाश्चिमात्य देशातील सहलींसाठी विविध पुरस्कार मिळाले, सिंगापूरमध्ये २४०० जणांचा आशियातील सर्वात मोठा क्रूझ ग्रुप, इतर कॉर्पोरेट ग्रुप घेऊन गेलो. २०० चौरस फुटांच्या ऑफिसपासून ते माहीममधील प्रशस्त कार्यालय आणि आता दादरच्या कोहिनूर येथे मुख्यालय सुरू झालं. सुरुवातीच्या काळात केवळ ४ ते ५ जणांचा स्टाफ होता आणि आता ५००हून अधिक केसरीयन्स आणि ३०० हून अधिक टूर लीडर्सचं मनुष्यबळ आहे. मुंबईतील मुख्यालय, देशभरात १६ शाखा, २०० हून अधिक पीएसए असं देशभरातील नेटवर्क यापुढेही विस्तारण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

देश आणि समाजातील योगदान ?

गेल्या ४० वर्षांतील कामगिरीमुळे पर्यटन क्षेत्राला ग्लॅमर देण्याचं काम केसरीने केलं आहे. दरवर्षी नवनवीन टूर्स आणत संपूर्ण जग पर्यटकांसाठी खुलं केलं, देशविदेशातील पर्यटकांमध्ये वृद्धी केली. सोप्या, सोयीस्कर आणि नियोजनपूर्वक सहलींच्या माध्यमातून जग जवळ आणलं. पर्यटनामुळे सीमा ओलांडताना भारतीय व इतर देशांच्या खाद्य, पोशाख आणि पारंपरिक संस्कृतीच्या देवाणघेवाणमध्ये वृद्धी झाली. मोठ्या संख्येने भारतीय लोक परदेशात गेल्यामुळे परदेशातील लोकांना भारतीयांचं महत्त्व कळलं.

सामाजिक जबाबदारी म्हणून आपण काय पावलं उचलली ?

सीमा बल, भारतीय जवान, वीरपत्नी यांच्यासाठी सीएसआर अंतर्गत केसरीद्वारे विविध उपक्रम राबविले जातात. कारगिलच्या हरका बहादुर येथील आर्मी गुडवील शाळेला एक बस दिली ज्याचा लाभ १०० विद्यार्थ्यांना झाला. सियाचीन ऑक्सिजन प्लांट कंट्रीब्यूशन, मिलिट्री कॅम्पला रुग्णवाहिका असे अनेक सीएसआर उपक्रम वेळोवेळी राबविले जातात.

आपल्या पर्यटन क्षेत्रातील योगदानाबद्दल काय सांगाल?

केसरीच्या देशांतर्गत आणि परदेशातील सर्वसमावेशक सहली पर्यटन क्षेत्रातील प्रमाण बनल्या आहेत. ९० च्या काळी सुरू असणाऱ्या परदेशातील सहलीत अनेक पर्यटन स्थळं पर्यायी असायची. जे पाहण्यासाठी पर्यटकांना अधिकचे पैसे भरावे लागायचे. तसेच अनेक सहलींमध्ये भोजनाची व्यवस्थासुद्धा नव्हती. अशा वेळी आम्ही ऑल इनक्लुसिव्ह टूर्स सुरू केल्या ज्या कमी कालावधीत लोकप्रिय झाल्या. जे जे पाहण्यासारखं त्या सर्व पर्यटनस्थळांसह ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरची व्यवस्था सुरू केली. ज्यावेळी महिलांना एकटं फिरण्यास संकोच वाटायचा अशा वेळी खास माहिलांसाठीच्या माय फेअर लेडी सहलींची सुरुवात केली. आता हजारोंच्या संख्येने महिला देशविदेशात मनसोक्त फिरत आहेत. भारतीय पर्यटन क्षेत्रातील हे एक मोठं परिवर्तन आणि मोठं पाऊल ठरलं.

आपला यशाचा मंत्र काय?

यशासाठी आमची काही ठराविक स्ट्रॅटेजी नाही. अतिथी देवो भवः हा मंत्र जपत पर्यटकांच्या जीवनात आनंद आणि हास्य खुलवणं, त्यांची पर्यटनाची स्वप्नपूर्ती करणं हेच आमचं ध्येय आहे. हेच मनाशी बाळगत आमची ४० वर्षांची अविरत वाटचाल सुरू आहे.

पर्यटन क्षेत्रात काम करताना कोणती आव्हानं आली?

या प्रवासात अनेक आव्हानं आली, पण न डगमगता त्यांना आम्ही सामोरे गेलो, कारण आपण जेव्हा आव्हानांना खंबीरतेने सामोरे जातो तेव्हा आपली प्रगती होते. एका युरोप टूरमध्ये आमची बस चोरीला गेली, चारधाम यात्रेच्या ढगफुटीमध्ये आम्ही आमचा बेस्ट टूर लीडर गमाविला ज्याने अनेक पर्यटकांचा जीव वाचविला, शेवटच्या क्षणी विमानसेवा रद्द होणे, गो एअर, जेट एअरवेज् या विमानकंपन्यांमुळे आलेलं आर्थिक संकट आणि या सगळ्यांमध्ये पँडेमिकमुळे आलेलं आव्हान तर सर्वात मोठं होतं. पण प्रत्येक आव्हानाला सामोरे जात आम्ही स्वतःला सक्षम बनवलं.

इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी बद्दल काय सांगाल? 

सन १९८४मध्ये केसरी कार्यालयात संगणक होते. आम्ही इन हाऊस सिस्टीम विकसित केली ज्यामुळे मल्टी नॅशनल कंपनीच्या स्तरावर जात त्यांच्याशी स्पर्धा करू शकलो. आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय आजच्या युगात जागतिक स्तरावर व्यवहार करणं जवळपास अशक्य आहे. या प्रगत तंत्रज्ञानामुळे कंपनीमध्ये आम्ही प्रमाणबद्धता आणू शकलो.

भविष्यातील योजना काय आहेत?

जग हे वेगाने बदलत आहे. हे बदलते जग सहलींच्या रूपात पर्यटकांना दाखवत दरवर्षी नवनवीन डेस्टीनेशन्सच्या टूर्स आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भारतीयांना जग दाखवायचं आणि जगभरातील पर्यटकांना आपला अतुल्य भारत, हेच आमचं ध्येय ! तसेच सध्याची इस्रोची प्रगती पाहता भविष्यात ऑर्बिटर टूर नेण्याचं केसरीचं स्वप्न आहे.

Tags