पूर्व नियोजन अमेरिका सहलीचे !

“अमेरिकेला जायच्या आधी व्हिसाच्या इंटरव्ह्यूला जावं लागतं आणि त्याची मला भीती वाटते. शिवाय एव्हडा दूरचा प्रवास मला जमणारच नाही.” आपल्या अर्धांगिनीचे हे शब्द ऐकून दामले काका त्यांना आमच्याकडे घेऊन आले होते. “झेलमताई, आपण हीला समजवा. कारण मला अमेरिकेला जायचं आहे. आधीच हीचा व्हिसा एकदा रिजेक्ट झाला होता.” आम्ही सर्व कागदपत्रं नीट तपासली. व्हिसा रिजेक्ट होण्याचं तसं काही मोठं कारण नव्हतं. मी म्हटलं, “आपण प्रयत्न करुयात. फॉर्म व्यवस्थित भरला तर व्हिसा होईल. मी घेते सारी काळजी.” तरी ताई इंटरव्ह्यूला जायला तयार होईनात. मग मी म्हटलं, “जर व्हिसा ऑफिसरने मराठीत प्रश्न विचारले तर जाल का?” मी तयारी करून घेतली तेव्हा ताई इंटरव्ह्यूला जायला तयार झाल्या. मात्र एव्हडा दूरचा प्रवास करण्यासाठी ताईना मनवताना आम्हाला दोघांनाही कष्ट करावे लागले. असो. ताई तयार झाल्या. व्हिसा हाती आल्यावर दोघांचाही आनंद गगनात मावेना. असे होऊ शकते, यावर विश्वास बसायलाच त्यांना वेळ लागला. त्यांची ही सहल सुंदर झाली आणि दोघेही मला मिठाई घेऊन भेटायला आले. आमच्या दृष्टीने हाच आनंद मोठा. जेव्हा पर्यटक खुश होतात, त्यांचे पर्यटनाचे स्वप्न केसरीमुळे आमच्यामुळे साकारते, हा आनंद त्याहून मोठा.

आम्ही पर्यटनावर लिहितो. सप्तखंडात आपल्या सहली जातात. आजतोवर पर्यटकही खूप देश फिरले आहेत. परंतु जग पाहायचं, तर अमेरिका बघायलाच हवं. तिथल्या भव्य इमारती, उत्तम पायाभूत सुविधा, स्वच्छता, फ्री वे- ओव्हरब्रीजचं जाळं आणि मनोरंजनाच्या नवनव्या संकल्पना आपल्याला जवळून अनुभवण्यासाठी अमेरिका सहल मस्ट. न्यूयॉर्क आणि लॉस ऍन्जेलीस या शहरांची रचना, तिथल्या लोकांची मानसिकता, सवयी यात नक्कीच फरक आहे. त्यामुळे जरी आपण ईस्ट कोस्ट, वेस्ट कोस्ट आणि फ्लोरिडाला भेट दिली तरी आपण ३-४ देशांचा प्रवास करतोय, असं वाटतं. 

न्यूयॉर्कमध्ये रस्त्यांची टंचाई म्हणजे बंपर टू बंपर ट्रॅफिक आणि पार्किंग प्रचंड महाग आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोक ट्रेन नाही तर पायी प्रवास करतात. तर लॉस ऍन्जेलीसमध्ये फ्री वेचे प्रचंड मोठे जाळे असल्याने गाडी घेऊनच बाहेर जावं लागतं. एकीकडे वर्टिकल ग्रोथ तर दुसरीकडे हॉरिझंटल ग्रोथ. न्यूयॉर्कच्या डाऊनटाऊनमध्ये किंवा मॅनहॅटन भागात माणसांचा महापूर तर लॉस ऍन्जेलीसमध्ये माणसंच दिसत नाहीत आणि फ्लोरीडाच्या डिस्नेवर्ल्डची तर याहून वेगळीच कथा. डिस्नेवर्ल्डमध्ये आल्यावर एखादया स्वप्ननगरीत आल्याचा भास होतो. ही तर मनोरंजनाची राजधानीच. अगदी जगावेगळा अनुभव. आबालवृद्ध प्रत्येकासाठी धम्माल राइड्स, भरपूर शॉपिंग, फूड परेड्स आणि आवडत्या डिस्ने भूमिकांना भेटण्याची अद्भुत संधी असं जे जे उत्तम ते सारं इथे आहे. डिस्नेलँड आणि डिस्नेवर्ल्डमध्ये खूप फरक आहे. एकावरून दुसऱ्याची परिक्षा करता येत नाही. तेव्हा ओरलँडो पाहायलाच हवं. आपण इथलं सारं जग पाहताना प्रथमतः भांबावतो, पण सोबत असलेला आपला एक्सपर्ट टूर लीडर महत्वाचं आणि बघायलाच हवं ते सर्व दाखवतो. संपूर्ण सहलीवर आपली काळजीही घेतो. 

आम्ही एखाद्या डेस्टिनेशनविषयी लिहिताना फक्त आणि फक्त पर्यटनाच्या दृष्टीने त्या ठिकाणाकडे पाहतो. जे पर्यटकांसाठी उत्कृष्ट ते आम्हाला भावतं आणि त्यानुसार सहलीमध्ये बदल होतात. मंडळी, उत्तमोत्तम हॉटेल्स, स्वादिष्ट जेवण आणि सहल उत्तम होण्यासाठी सोबतीला आपला टूर लीडर हे केसरीच्या अमेरिका सहलीचे आणखी तीन महत्वाचे घटक. आपल्याकडे वैध व्हिसा असेल तर २०२४-२५मध्ये अमेरिकेची सहल करू शकतात. आपला व्हिसा नसेल तर तो लवकरात लवकर करून घ्या. याबाबत माहिती मिळवण्यासाठी १८०० २६६ ११०० या आमच्या टोल फ्री क्रमांकावर व्हिसा टीमशी संपर्क साधू शकतात.

आम्ही नेहमी म्हणतो, जगभरचा प्रवास करत असताना आपला अतुल्य भारत हा पाहिलाच पाहिजे. नुकतंच केसरीच्या माय फेअर लेडी सहलीच्या निमित्ताने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व ९० महिला लेह लडाख पाहायला गेल्या होत्या. तिथे स्वातंत्र्य दिनी जवानांसोबत ध्वजवंदन केले. या सहलीतील महिलांनी कारगिल येथील जवानांना राखी बांधल्या. “केसरीमुळे आम्हाला हा आनंद आणि अवर्णनीय अनुभव मिळाला. हा स्वातंत्र्य दिन आम्ही कधीच विसरु शकत नाही.” अशीच प्रत्येकीची प्रतिक्रिया होती. या व अशा भावनिक प्रतिक्रिया ऐकताना मलाही आनंदाश्रु आले. पर्यटकांची स्वप्ने मोठी करायची, त्यांना एकट्याला फिरताना जे शक्य होत नाही, ते ग्रुपमध्ये सगळ्यांसोबत करवून प्रचंड आनंद द्यायचा, एक अविस्मरणीय अनुभव द्यायचा, हाच आमचा ध्यास. याचसाठी हा सारा अट्टाहास…!

टिप – आपल्या नातेवाईकांसोबत किंवा मित्रमंडळींसोबत अमेरिकेच्या सहलीचं प्लॅनिंग करत असाल तर आम्हाला आजच संपर्क करा. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमचे सेल्स एक्स्पर्ट 1800 266 9080 या क्रमांकावर सज्ज आहेत.

Tags