चला करूया परदेशवारीचा श्रीगणेशा

लाखो पर्यटकांनी गौरविलेल्या केसरीच्या साऊथ ईस्ट एशियातील सहलींसह

“तुम्ही स्वतःला इन्स्पायर्ड कसे ठेवता?” आमच्या मार्केटिंग विभागातल्या गिताश्री या गोड मुलीने मला प्रश्न विचारला. मी तिला म्हटलं, “माझ्याकडे लुईस हे या लेखकाचं पॉवर थॉट्स नावाचं एक छोटं पुस्तक आहे आणि खूप साऱ्या वह्या आहेत, ज्यात मी उत्तमोत्तम लिखाण जपून ठेवलं आहे. त्यातलं लिखाण वाचलं किंवा आठवलं की आपोआपच नवीन ऊर्जा मिळते. भाऊंची ही सवय नकळत मलाही लागली.” मग तिने पुढचा प्रश्न विचारला, “यातला तुमचा आवडता सुविचार कोणता?” Sow a thought, and reap an action; sow an action, and reap a habit; sow a habit, and reap a character; sow a character, and it will change your destiny. हेच गीतेतही सांगितलं आहे, महात्मा गांधींजींनीही सांगितलं आहे आणि माझ्यापर्यंत रॉबिन शर्मा या प्रसिद्ध लेखकाने पोहचवलं. मी या विचाराच्या प्रेमात पडले.

मंडळी, विषय आहे प्रेरणा आणि मला वाटतं ती आपल्याला कुठूनही मिळू शकते. फक्त त्यासाठी आपली नजर तयार असायला हवी. परदेशातील सहली सुरु केल्या, तेव्हा आम्ही प्रेरित झालो. सिंगापूर या देशाने असं अद्‌भुत, सुंदर, मनोहर विमानतळ बनवलं आहे की आजतागायत मी इतकं सुंदर विमानतळ पाहिलं नाही. पुढे शहरात प्रवास करायला लागलो तेव्हा जिथे नजर जाईल तिथे झाडे, वेली, ऑर्किड्स नाहीतर सुंदर वनस्पती नजरेस पडतात, अगदी जे बघावं ते सुंदरच दिसतं. तिथल्या नेत्यांचे व्हिजन होते की जे बनवायचं ते सुंदरच असायला हवं. त्यानुसार इथली प्रत्येक इमारत सुंदर आहे. या शहरात एक प्रकारची शिस्त आहे, हे तिथे फिरताना जाणवतं. म्हणूनच इथे च्युईंगमवर बंदी केली आहे. एव्हाडासा देश परंतु पर कॅपिटा जीडीपीनुसार हा जगातील सर्वाधिक जीडीपी असलेला दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरतो. एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशनचे मुख्यालयही इथेच आहे. इथले केवळ १.८७ टक्के लोक बेरोजगार आहेत, तर सर्वात कमी भ्रष्टचार असलेल्या पाच देशांमध्ये सिंगापूर येते.  इथल्या लोकांनी आणि इथल्या राजकर्त्यांनी तयार केलेल्या व्यवस्थेमुळे सिंगापूर हा एक आदर्श देश बनवला आहे. 

संपूर्ण साऊथ ईस्ट एशियामध्ये फिरताना जाणवतं की इथे प्रयत्नपूर्वक उत्कृष्ट पर्यटनस्थळे बनवली आणि ती जोपासली जात आहेत. सिंगापूरला आपण मिनी वर्ल्ड म्हणू शकतो कारण पर्यटकांची जगभरातील आवडीची पर्यटनस्थळे या देशात आहेत. लंडन आयच्या धर्तीवर बनवण्यात आलेल्या सिंगापूर फ्लायर या महाकाय आकाशपाळण्यातून आपल्याला सिंगापूर शहराचं विहंगम दृश्य पाहता येतं. लंडन मधलं जगप्रसिद्ध मादाम तुसॉ संग्रहालयही इथे आहे. अमेरिकेतल्या प्रसिद्ध युनिव्हर्सल स्टुडिओला आपण सिंगापूरमध्ये भेट देऊ शकतो. शिवाय सेंतोसाच्या किनाऱ्यावर पाहता येणारा विंग्स ऑफ फायर हा अनोखा लाईट अँड साऊंड शो प्रत्येकाने पाहावा असाच आहे. १०१ हेक्टरमध्ये पसरलेल्या इथल्या गार्डन्स बाय द बेमध्ये अडीच लाखांहून अधिक झाडांच्या दुर्मिळ प्रजाती आहेत. सुंदर फुलांचा देखावा, क्लाऊड फॉरेस्ट, फ्लॉवर डोम, नयनरम्य मानवनिर्मित धबधबा आणि इथलं शांत वातावरण हे सारं अचंबित करणारं आहे. जगातील एकमेव नाईट सफारीचा आनंद घ्यायचा तर केसरीसोबत सिंगापूरला जायलाच हवं. मला माहित आहे आपल्या सगळ्यांना शॉपिंग आवडतं. या देशात भरपूर शॉपिंग करता येते. 

थायलँड हा एकेकाळी भारतासारखाच शेतीप्रधान देश. परंतु, काही वर्षांपूर्वी इथे अतिशय अस्वच्छता होती. परंतु आज इथली शहरं सुस्थितीत आहेत आणि मेट्रोने उत्तमरीत्या जोडलेली आहेत. बँकॉक, पट्टाया आणि क्राबीच्या समुद्रकिनाऱ्यावर धम्माल करण्यासाठी करण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. पॅरासेलिंगसारखे वॉटरस्पोर्ट्स आणि पट्टायामधला सुंदर क्रिस्टल क्लिअर समुद्रकिनारा पर्यटकांना नेहमी आकर्षित करतो. बँकॉकच्या सफारी वर्ल्डमध्ये जाऊन तिथल्या अजगरासोबत किंवा वाघासोबत काढलेले फोटो आज पर्यटकांच्या घराघरांत आहेत. चाओ फ्राया रिव्हर क्रूझमध्ये केलेली धम्माल पर्यटक कधीच विसरू शकत नाहीत. आपल्या पर्यटकांसाठी इथल्या म्युझिकल शोमध्ये हिंदी गाणी वाजतात तेव्हा आपल्याही अंगावर रोमांच संचारतो. खरं तर हा शेतीप्रधान देश परंतु पर्यटन क्षेत्रात या देशाने उत्तम भरारी घेतली आहे. आज बाराही महिने पर्यटक या देशाला भेट देतात आणि इथे शॉपिंग करतात. कॉस्मेटिक्स, कपडे, बॅग्स आणि अनेक गोष्टी पर्यटक आवर्जून विकत घेऊन जातात. 

मलेशिया फार काळ जगाच्या पर्यटन नकाशामध्ये नव्हता. परंतु पेट्रोनास टॉवर आणि क्वालालंपूरटॉवर आता या देशाची ओळख बनली आणि मलेशियात लोक पर्यटनासाठी येऊ लागले. गेंटिंग आयलँड ही खरंच एका इन्स्पिरेशनची आणि पॅशनची कहाणी आहे. तर इथे आपल्याला रेनफॉरेस्टही पाहायला मिळतं. आणि खरंच हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. म्हणूनच अनेक पर्यटक आपल्या परदेश पर्यटनाचा श्रीगणेशा करण्यासाठी सिंगापूर मलेशिया थायलँड सहलींना प्राधान्य देतात.

साऊथ ईस्ट एशियातील या पॉप्युलर देशांच्या सहलींसह केसरीकडे काही ऑफ बिट आणि अनोखे पर्यायही आहेत. व्हिएतनाम, कंबोडिया, हॉंगकॉंग, शेन्जेन, मकाऊ, बाली, श्रीलंका आणि जकार्ता या देशांसह आपल्यासाठी केसरीकडे साऊथ ईस्ट एशियामधील वीसहून अधिक सहलींचे पर्याय उपलब्ध आहेत. गिली आयलँड हे तर इथलं नवीन आकर्षण. दरवर्षी फेब्रुवारीमध्ये येणारा लारटेन फेस्टिवल पाहण्यासाठी आपली सहल तैवानलाही जाते.


केसरीसोबत साऊथ ईस्ट एशिया म्हणजे पर्यटनाचा उत्सवच जणू. उत्कृष्ट हॉटेल्स, उत्तम भोजन, पाहायला हवी ती सर्व पर्यटनस्थळे समाविष्ट असलेली आमची सहल आजवर लाखो पर्यटकांनी नावाजली. 

सिंगापूरचे इनोव्हेशन, थायलँडचे थ्रिल आणि मलेशियाची भव्यता यांनी इन्स्पायर व्हायचं असेल आणि भरपूर धम्माल करायची असेल तर चला साऊथ ईस्ट एशियातील एकपेक्षा एक सहलींना, फक्त केसरीसोबत!

Tags