इजिप्त आणि हुरघडा

A dream is not that which you see while sleeping, it is something that does not let you sleep. आपल्या माननीय माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम साहेबांनी आपल्याला हा किती सुंदर विचार दिला आहे. खरंच एखाद्या कल्पनेवर प्रेम करावं आणि तिलाच सत्यात उतरवावं असंच आहे. आपण जागेपणी जे स्वप्न पाहतो, त्यासाठी झटतो, कष्ट घेतो, ते स्वप्न प्रत्यक्षात येण्याचा आनंद अवर्णनीय असतो. पर्यटकांची स्वप्नं प्रत्यक्षात आणण्याचं आमचं स्वप्नही त्यासोबत पूर्ण झालं. माझं स्वप्नाळू मन लहानपणीच डिस्नेलँडचं स्वप्न पाहत होतं. विमान प्रवास ते जगभ्रमण अशी बकेट लिस्ट आयुष्यभर बनत गेली आणि तेच माझ्या आयुष्यात मी केलं. मला नेहमीच वेगळ्या गोष्टींचं आकर्षण होतं. युनिव्हर्सल स्टुडिओतील ममी राईड या माझ्या दृष्टीने थरारक असलेल्या राईडमध्ये बसल्यापासून मला फारोजच्या देशात म्हणजेच इजिप्त जायची उत्सुकता लागली.

इजिप्त म्हटलं की सगळ्यात आधी काही डोळ्यासमोर येत असेल, तर ते म्हणजे पिरॅमिड्स किंवा नाईल नदी. या दोन्ही गोष्टी जगाच्या दृष्टीने इतक्या अनोख्या आहेत की त्यामुळे इजिप्तचं पर्यटन वाढलं. आम्ही 20 वर्षापूर्वी सहल करायचो तेव्हा या मंडळीना, पर्यटकांना कसं सांभाळावं याची कल्पना देखील नव्हती. भाषेचा प्रश्न यायचा, परंतु आता इथले स्थानिक आलेल्या पर्यटकांची उत्तम काळजी घेतात.

अरब रिपब्लिक ऑफ इजिप्त हा देश मेडिटेरिअन सी, रेड सी या समुद्रांनी तसंच, लिबया, सुदान आणि इस्रायल या देशांनी घेरला आहे. इजिप्त, इस्रायल, जॉर्डन आणि सौदी अरेबिया या देशांच्या सीमा गल्फ ऑफ अकाबाला लागून आहेत. लोकसंख्येनुसार जगातील १४व्या क्रमांकावर व आफ्रिकेत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इजिप्तमध्ये सुमारे १० कोटी लोक राहतात म्हणजेच भारताच्या लोकसंख्येच्या मानाने हा खूपच छोटासा देश. सुदाममध्ये उगम पावलेली जगातली सर्वांत लांब नाईल नदी इजिप्त मधून वाहत मेडिटेरिअन सीमध्ये मिसळते. या नदीकाठी वसलेल्या नाईल डेल्टामुळे इजिप्तला प्राचीन इतिहास लाभला. या ख्रिश्चन धर्मीय देशाने सातव्या सहस्त्रकात इस्लाम धर्म स्वीकारला. 10व्या सहस्त्रकात कैरो हे राजधानीचे शहर बनले आणि 1517 पर्यंत इजिप्त हा देश ऑटोमन साम्राज्याचा भाग होता. 1867मध्ये मोहम्मद अली यांनी मॉडर्न इजिप्तची स्थापना केली मात्र पुढे ब्रिटिशांनी इजिप्तवर राज्य केले आणि शेवटी 1922मध्ये इजिप्त हा स्वतंत्र देश घोषित झाला.

केसरीच्या इजिप्त हुरघडा या पॉप्युलर सहलीत आपण कैरो, अलेक्झांड्रिया, आस्वान, आदी शहरांना भेट देतो. कैरोमध्ये येताच इजिप्तशिअन म्युझियमला भेट देत बॉय किंग म्हणून प्रसिद्ध राजा तुतनखामुनचा प्राचीन आणि दुर्मिळ वस्तूंचा खजिना पाहता येतो. इथल्या राष्ट्रीय संग्रहालयामध्ये इजिप्तशिअन संस्कृतीची ओळख होते. ग्रेट पिरॅमिड्स ऑफ गिझा पाहायला जातो, या पिरॅमिड्समध्ये दडलेलं रहस्य पाहतो. मानवी डोके, सिंहाचे शरीर आणि गरुडाचे पंख असलेला स्फिंक्स या पौराणिक प्राण्याचा भव्य पुतळा आहे. ताकद आणि क्रूरतेचे प्रतीक असलेला हा प्राणी इथल्या प्राचीन मंदिरांचे संरक्षण करताना दिसतो. या पुतळ्यासमोर उभं राहून आपल्याला छानसा फोटो काढता येतो. माहितीपूर्ण लाईट अँड साऊंड शोचा अनुभव घेता येतो. आस्वानमध्ये आपण नाईल रिव्हर क्रूझमध्ये बोर्ड करतो. या प्रवासात जगप्रसिद्ध अबू सिम्बेल येथील द ग्रेट टेम्पल ऑफ फारो रामसेस द्वितीय आणि टेम्पल ऑफ क्वीन नेफरतारी पाहता येतं. कोम ओम्बो येथील मगर देवता सोबेक आणि गरुड देवता होरस यांना समर्पित दुहेरी मंदिर पर्यटकांनी नक्की पाहावं असंच आहे. गरुड देवता होरसला समर्पित एडफू टेम्पल हे इजिप्तमधील एक सर्वोत्तम जतन करण्यात आलेलं मंदिर. 3 रात्रींच्या वास्तव्यासह नाईल क्रूझच्या प्रवासात नदीकाठचा नयनरम्य नजारा तर आपण पाहतोच तसंच इजिप्तचा प्राचीन इतिहासही अनुभवतो. किनाऱ्यावरील विविध ठिकाणी थांबून ऐतिहासिक वास्तूंना, महाकाय पुतळ्यांना, पुरातन मंदिरांना आणि संग्रहालयांना भेट देतो. व्हॅली ऑफ द किंग्स ही तर फारोजची दफनभूमी. या युनेस्को जागतिक वारसा स्थळाला आपण भेट देतो तेव्हा तिथले राजा महाराजांचे थडगे आणि ममी आपल्याला पाहता येतात. इथली राजा तुतनखामुनची 3300 वर्षांची ममी जगप्रसिद्ध आहे. हुरघडा हे रेड सीच्या किनाऱ्यावरील एकेकाळचे छोटे मच्छीमार गाव आज सर्वात मोठे रिसॉर्ट डेस्टिनेशन असून एक अतिशय सुंदर कोस्टल सिटीसुद्धा आहे. डॉल्फिन क्रूझ हे इथलं प्रमुख आकर्षण. इथल्या रिसॉर्ट आणि समुद्रकिनाऱ्यावर आपण मनसोक्त धम्माल करू शकता. डॉल्फिन पाहू शकता, बनाना बोटमधून फेरफटका मारू शकता.

तर मंडळी, नाईल नदीच्या किनारी वसलेल्या या अद्भुत अनोख्या देशाची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक आश्चर्यांची ओळख करून देणारी सहल आपल्यालाही करायची असेल, सोबत हुरघडाच्या किनारी डॉल्फिन वॉचिंगचा आनंद घ्यायचा असेल, हे आपलं पर्यटन स्वप्न असेल तर 9 दिवस 8 रात्रींच्या केसरीच्या इजिप्त हुरघडा सहलीला नक्की या. या महिन्यातील सहली हाऊसफुल्ल झाल्या असल्या तरी 5, 12, 26 नोव्हेंबर आणि 3, 10, 17, 24 डिसेंबरच्या सहलीसाठी आपण बुकिंग करू शकता.

Tags