राजस्थान, केरळ किंवा अंदमानला!
वर्षातून एकदा मोठ्ठी टूर करावी की छोट्या छोट्या ३-४ टूर्स कराव्या ? आपल्या धावपळीच्या या जगात आता पर्यटन हा रोजच्या जीवनाचा भाग बनला आहे. साधारपणे वर्षातून एकदाच पर्यटनासाठी बाहेर जाणारी आपण मंडळी आजकाल मात्र ३-४ छोटे ब्रेक घेतल्याशिवाय रिलॅक्स होत नाही. शिवाय माझ्यासारखी अनेक मंडळी कामानिमित्ताने बाहेर सतत बाहेर असतात. त्यामुळे दिवाळी, ख्रिसमस किंवा न्यू इयर अशा फेस्टिवलच्या निमित्ताने का होईना फॅमिलीसोबत पर्यटनाचा आनंद आम्ही अनुभवतो. सर्वांचं प्लॅनिंग करता करता आमचं प्लॅनिंग राहून जातं, पण टूर हैं ना ? मग आम्ही ज्या टूरमध्ये जागा शिल्लक असेल तिथे जाऊन ते क्षण कुटुंबासोबत साजरे करतो. आयत्या वेळच्या कैक पटीने महागलेल्या फेअर्स भरण्यापेक्षा प्री बुक्ड रेट्समधील सर्व सामविष्ट टूर बरीच स्वस्त पडते. हल्ली असाही एक ट्रेण्ड तयार झालाय की, घरी दिवाळी साजरी न करता अनेक मंडळी ऑन टूर दिवाळी सेलिब्रेशन करतात. ज्या मंडळींना केसरीसोबत दिवाळी देशात – परदेशात साजरी करता नाही आली. त्यांच्यासाठी ख्रिसमस आणि न्यू इयर व्हॅकेशनचा हा ब्रेक म्हणजे ‘अ परफेक्ट सेलिब्रेशन टाईम!’
केवळ आपल्याच नाहीतर एक्सडेंटेड फॅमिलीला घेऊन केसरीसोबत आपल्याला हा पर्यटनाचा आनंद अनुभवता येईल. सध्या न्यूक्लियर फॅमिलीतील अनेकजण टूरवरच्या आनंददायी वातावरणात एकत्र भेटतात. ४० ते ५० जण एकत्र येऊन केलेलं न्यू इयर सेलिब्रेशनची मजा काही औरच! कारण देश असो वा परदेश त्या डेस्टिनेशन्सची सर्व टूरवरची किमान २०० ते ६०० हून अधिक मंडळी एकाच ठिकाणी एकाचवेळी एकत्र येऊन सरत्या वर्षाला निरोप देतानाच नविन वर्षाचे जल्लोषात स्वागत करतात. अनेक वर्षे सरतील पण हे वर्ष आणि त्या डेस्टिनेशनला केलेलं मात्र सेलिब्रेशन मात्र कायम लक्षात राहील. त्यामुळे ख्रिसमस आणि न्यू इयरचं सेलिब्रेशन कसं आणि कुठं करायचं हे अजून ठरलं नसेल तर आजच ठरवा. यावर्षीचा छोटा ब्रेक सिंगापूर, थायलँड, मॉरिशसला घ्यायचा की आपल्या भारतातील राजस्थान, केरळ किंवा अंदमानला…
रंगीलो राजस्थान
निसर्गाचे रंगीबेरंगी रंग दाखविणाऱ्या राजस्थानमध्ये एका शाही आदारातिथ्यामधून अनोखं सेलिब्रेशन अनुभवता येतं. भव्य राजवाडे, कलात्मक महाल, प्राचीन मंदिरे, नैसर्गिक आणि मानव निर्मित सरोवरे, ऐतिहासिक किल्ले असा राजस्थानचा समृध्द वारसा यादरम्यान अनुभवता येतो. राजस्थानमधील वातावरण आणि निसर्गसौंदर्य ही अप्रतिम असतं. याठिकाणी पर्यटकांना महलवजा भव्य हॉटेल्समध्ये वास्तव्य देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. पारंपरिक लोकसंगीतापासून ते चविष्ट पाककलेपर्यंत अनेक बाबतीत बहुरंगी असलेले रंगबेरंगी राजस्थान बघायला जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी येतात. त्यामुळे अशा फेस्टिवल दरम्यानच्या सेलिब्रेशनला फॅमिलीसोबत एकदातरी जायलाच पाहिजे.
एव्हरग्रीन केरळ
ख्रिसमस आणि न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी केरळ एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. केरळमधील ख्रिसमस सेलिब्रेशनची तयारी सुरू होते, ती कोचीनच्या प्रसिध्द सेंट फ्रान्सिस चर्चपासून. चर्चला दिलेला रंग आणि केलेली सजावट अतिशय छान असते. सुवासिक मसाल्यांसाठी आणि जगात पर्यटनासाठी प्रसिध्द असलेले केरळ अनोख्या निसर्गसौंदर्याने सर्वांना भुरळ घालते. मनमोहक बिच, सदाबहार वनराई, हिरवेगार चहाचे मळे, उंचच उंच नारळ- ताडाची झाडे, टुमदार घरे आणि आकर्षक – आलिशान हाऊसबोट अशा आल्हाददायक सौंदर्याने केरळ अधिकच जवळचे वाटते. येथील प्राचीन मंदिरे, संग्रहालये, निसर्गसौंदर्य पाहातानाच केरळच्या संस्कृतीचा, परंपरेचा परिचयही होतो. कैराली शो, कुमीली स्पाईस व्हिलेजमध्ये शॉपिंग, मुत्तुपट्टी डॅममधील स्पीड बोट राईड, कुमारकोमची बॅकवॉटर राईड, अर्धचंद्राकर आकाराचा कोवालम बीच अशा एव्हरग्रीन केरळमध्ये सहकुटुंब केलेलं सेलिब्रेशन म्हणजे जणू एक आनंददायी आठवणच !
एक्सायटिंग अंदमान
भारतातच असलेले हे डेस्टिनेशन आपले वेगळेपण टिकवून आहे. क्रिस्टल क्लिअर बिचेस आणि निसर्गवैविध्यामुळे इथे नेहमीच सेलिब्रेशनचा माहोल असतो. येथे गेल्यावर अगदी थायलँड – मॉरिशसला गेल्याचा आभास होतो. इथले गगनचुंबी वृक्ष, समुद्रातले शंख शिंपले व कोरल्स, अजस्त्र मासे, खळाळणारे निळे पाणी आणि या सर्वांना सदोदित साक्षी असणारे निरभ्र आकाश हा अमूल्य खजिना डोळ्यासमोर ठेवून सहलीचा अनुभव काही औरच असतो. अंदमान येथील एक निसर्गनिर्मित अदभूत रमणीय स्वराज बेट आपल्या अनोख्या निसर्गसौंदर्याने सर्वांना भुरळ घालते. जॉली बॉईज आयलँडला समुद्रीकिनारी रिलॅक्स होता येते, विविध वॉटर स्पोर्टस् आणि स्वीमिंगची धम्माल अनुभवता येते. येथील स्थानिक नेहमीच पर्यटकांच्या आदरातिथ्यासाठी सज्ज असतात. एकंदरीतपणे अंदमान धम्माल डेस्टिनेशन्स आहे, हे तिथे गेल्यावरच समजते. मग फॅमिलीसोबत आनंददायी अंदमानला भेट द्यायलाच हवी.
सेलिब्रेशन कोणतंही असो, भारतातील आणि विदेशातील प्रत्येक डेस्टिनेशनवर ते एन्जॉय करताना वेगळीच मजा येते. यावेळचा ख्रिसमस राजस्थानच्या सॅन ड्युन्समध्ये साजरा करायचा की अंदमानच्या बीचवर न्यू इयरचे सेलिब्रेशन करायचे. निसर्गरम्य केरळच्या सानिध्यात फटाक्यांची आतषबाजी बघायची की हिमाचलच्या गारव्यात म्युझिकल नाईट पार्टी करायची. एवढंच नाहीतर हाँगकाँग मकाऊ शेंजेन, सिंगापूर, हाँगकाँग, मॉरिशस अशा विविध छोटा ब्रेक टूर्ससह ख्रिसमस, न्यू इयर सेलिब्रेशनसाठी साऊथ इस्ट एशिया, दुबई, युरोपची सर्व डेस्टिनेशन्स सज्ज आहेत. यंदाचे आपले सेलिब्रेशनही हटके असायला हवे. म्हणूनच केसरीच्या सर्वात मोठ्या परिवारासह ख्रिसमस, न्यू इयरच्या सेलिब्रेशनला चला आणि देशविदेशातील आनंदमयी टूर्समध्ये सहभागी होत आपल्या कुटुंबाला ‘एक अविस्मरणीय अनुभव’ देणाऱ्या टूरची भेट द्या. केसरीची टूर म्हणजे अप्रतिम साईटसिईंग, उत्कृष्ट हॉटेल्स, स्वादिष्ट भोजन, सोबतीला केसरीचं ‘आपलं माणूस’ आणि बरंच काही. अनेक टूर्स फुल्ल होत आहेत, तेव्हा ही आहे सेलिब्रेशनची शेवटची संधी. त्वरा करा. चला करूया २०२४ची सांगता आणि २०२५चे जंगी स्वागत. आता नव्या वर्षाची नवी सुरूवात, नव्या देशात, नव्या जल्लोषात… फक्त केसरीसोबत !
आध्यात्मिक अनुभूती !
अखंड चराचरात भरलेली ऊर्जा विश्वनिर्मात्याने निर्मित केलेल्या विश्वात कृतज्ञता, श्रध्दा, भक्ति, भाव यांची प्रचिती वेगवेगळ्या रूपात अनुभवता येते. नेमकी हीच प्रचिती विशिष्ट स्थानांवरील वातावरणात सामावलेली आहे. शेकडो वर्षे हजारो भाविक ज्या शक्तिपिठांवर परमेश्वराची उपासना करू लागले. त्या ठिकाणी ही भक्तिमय आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होत गेली. कालानुरूप हे चक्र असेच सुरू राहिले आणि येथे भेट देणाऱ्या भाविकांना या ऊर्जेची अनुभूती मिळू लागली. हे ऊर्जाचक्र तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अविरत फिरत असतं. ऊर्जायनाचा स्पर्श व्हावा, मनातील उदासीनता, निराशा नष्ट व्हावी यासाठी ‘मारीगोल्ड’ तर्फे तीर्थस्थानांच्या मंगलमय यात्रांचे आयोजन केले जाते. मारीगोल्डच्या यात्रांमध्ये देव दैवतांच्या जागृत स्थानांबरोबरच ऐतिहासिक, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची स्थाने समाविष्ट आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील अष्टविनायक यात्रा आणि ज्योतिर्लिंगासह, महाभारताची युद्धभूमी दाखविणारी डलहौसी अमृतसर धरमशाला, स्टॅच्यू ऑफ युनिटीसह सौराष्ट्र, साऊथ इंडिया टेम्पल टूर, अयोध्येसह त्रिस्थळ दर्शन, श्रीकृष्ण चरित्र यात्रा, जगन्नाथ पुरी कोलकाता गंगासागर, मदुराई रामेश्वरम कन्याकुमारी, पिठापुराम कुरवपूर श्रीशैलम, मुक्तिनाथसह डिव्हाईन नेपाळ अशा विविध धार्मिक अधिष्ठांनाचा सामावेश आहे.