युरोप केव्हा आणि कसा पाहावा?

गेल्या चाळीस वर्षांच्या प्रवासात केसरीसोबत लाखो पर्यटकांनी युरोप अनुभवला. केसरीने कित्येकांचं युरोप प्रवासाचं स्वप्न पूर्ण केलं तर अनेकांनी पुन्हा पुन्हा युरोपला भेट देण्यासाठी केसरीलाच पसंती दिली. अशा वेळी आता परत युरोपची कोणती सहल निवडायची आणि कोणत्या सिझनमध्ये युरोपला जायचं या विषयी पर्यटकांना नेहमीच शंका असते. पण काळजी करू नका. युरोप सहलींचे केसरीकडे 40हून अधिक पर्याय आणि 500हून अधिक डिपार्चर्स आहेत. त्यातून योग्य सहल निवडता यावी यासाठी हा लेख खास आपल्यासाठी.

साधारणपणे १९९५ साली केसरीने युरोप सहली सुरु केल्या, युरोप सहलींचा पूर्ण पॅटर्नच बदलला आणि पुढे तेच युरोप सहलींसाठी प्रमाण बनले. पर्यटकांना या सहली भावल्या आणि त्यांनी उदंड प्रतिसाद दिला. आजवर या सहलींच्या निमित्ताने पर्यटकांनी केसरीसोबत युरोप पाहिला, अनुभवला, अभ्यासला आणि सहलींवर खूप धम्मालही केली. अनेक पर्यटकांचं युरोप एकदा जाऊन समाधान होत नाही, त्यांना पुन्हा वेगळ्या डेस्टिनेशनला पण युरोपमध्येच जावंसं वाटतं. कोणाला स्वित्झर्लंडमधले हिमाच्छादित डोंगर खुणावतात, कोणाला ख्रिसमसमध्ये युरोप पाहायचा असतो, कोणाला मिडनाईट सन खुणावतो, तर कोणाला नॉर्दन लाईट्स आकर्षित करतात. केसरीसोबत एकदा युरोप पाहिलेले पर्यटक उर्वरित युरोप पाहण्यासाठी विविध सहलींचे पर्याय तपासून पाहत असतात. आम्ही नेहमी म्हणतो, केसरी म्हणजे युरोप आणि युरोप म्हणजे केसरी.

युरोपमध्ये पहिलं पाऊल ठेवत आहात, तर इथल्या प्रसिद्ध शहरांचा प्रवास नक्की करावा. इटली, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, हे देश तर लंडन आणि पॅरीस ही शहरं नक्की पाहावीत. इथल्या सहलींना गेल्यावर एकंदरीत युरोपच्या सौंदर्याची आपल्याला कल्पना येते. युरोप पाहण्याचं स्वप्न आहे आणि केवळ एकदाच युरोपला जाणार आहात तर केसरीची E1 अर्थात ऑल ऑफ युरोप ही सहल निवडावी. जे जे पाहायलाच हवं, अशा सर्व पर्यटनस्थळांचा समावेश असलेली ही सहल. अगदी वेस्टर्न युरोपमधील स्पेन आणि कान्सचाही यामध्ये समावेश आहे. 

मंडळी, या सर्व देशांनी युरोपचं पर्यटन सस्टेनेबल बनवलं आहे. जेव्हा एखादं पर्यटनस्थळ सस्टेनेबल असतं म्हणजे आपण त्याचे फोटो पाहतो, त्याबद्दल वाचतो, त्यापेक्षा प्रत्यक्ष भेटीतील अनुभव कैकपटीने चांगला असतो. त्यामुळे पर्यटक इतरांनाही या सहली रेकमेंड करतात. त्यामुळे तिथल्या पर्यटकांची आणि पर्यटनाची वाढ होते. त्याच सोबत इथल्या देशांनी सुंदर पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत अनुभव अपेक्षेपेक्षा जास्त सुंदर असतो. म्हणून त्यांना सस्टेनेबल टुरिझम म्हटलं जातं.

युरोपचं पर्यटन आता पूर्वीसारखं दोन तीन महिन्यांपुरतं मर्यादित न राहता वर्षभराचं झालं आहे. बहुतांश पर्यटक साधारणपणे एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये युरोप पाहतात. पुढे ख्रिसमस मार्केट किंवा नॉर्दन लाईट्स पाहण्यासाठी डिसेंबर ते जानेवारीमध्ये जातात. जूनमध्ये आपल्याला मिडनाईट सन पाहता येतो. मार्च-एप्रिलमध्ये रंगीत ट्युलिप्सनी बहरलेला युरोप पाहता येतो. ज्यांना थंडी कमी हवी ते पर्यटक जून ते सप्टेंबरमध्ये युरोपला जातात. 

पुन्हा युरोपला जायचं तर स्कँडिनेव्हिया – रशिया किंवा नॉर्दन युरोपमधील फक्त स्कँडिनेव्हियन देशांची सहल करावी. पॉप्युलर वेस्टर्न युरोपमधील पर्यटकांची गर्दी आपल्याला स्कँडिनेव्हियन देशांमध्ये अजिबात दिसत नाही. अगदी परिकथेतील गावांसारखी इथली शहरं आपल्याला खूप आनंद देतात. जलमार्गाने जोडलेल्या या शहरांमध्ये आपल्याला क्रूझमधून प्रवास करण्याचा आनंद घेता येतो. फिनलँड, नॉर्वे, स्विडन आणि डेन्मार्क हे फार कमी लोकसंख्या असलेले नॉर्दन युरोपमधील देश आनंदी देशांच्या यादीत वरच्या क्रमांकावर आहेत. इथल्या सोयी-सुविधा पाहून आपल्याला आश्चर्य वाटलं नाही तरच नवल. नॉर्वेमधील ऑस्लो आणि बर्गन ही शहरं प्रसिद्ध आहेत. तर नॉर्दन लाईट्ससाठी ट्रोम्सो हे पर्यटकांच्या पसंतीचं शहर.  स्विडनमधील स्टॉकहोल्म म्हणजे उत्कृष्ट आणि आधुनिक स्थापत्यशास्त्र तसंच कला, संस्कृती आणि निसर्गसौंदर्य यांचा उत्तम नमुना आहे. आपल्याला ABBA संगीत आवडतं तर इथे जायला हवं. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दिला जाणारा नोबेल पुरस्कार स्वीडनच्या स्टोकहोल्म्समध्ये दिला जातो, तर शांततेसाठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार नॉर्वेच्या ओस्लोमध्ये दिला जातो, त्यामुळे या शहरांना विशेष महत्त्व आहे. सॅंटाक्लॉज आणि एल्वजचा देश म्हणून ओळखला जाणारा फिनलँड हा तर पर्यटकांच्या आवडीचा देश. हेलसिंकी हे इथलं राजधानीचं शहर, रोवानिएमी म्हणजे सॅंटाक्लॉजचं ऑफिशिअल होमटाऊन. जगभरातील लहान मुलं आपल्या लाडक्या सॅंटाक्लॉजला वर्षभर पत्र लिहितात, ते इथल्याच पत्त्यावर. ख्रिसमसच्या रोषणाईने सजलेल्या या अनोख्या ठिकाणाला भेट द्यायलाच हवी. कोपनहेगन ही डेनमार्कची राजधानी. या सुंदर शहराचा फेरफटका मारताना जलपरीचा सुंदर पुतळा पाहता येतो.

स्कँडिनेव्हियन प्रांत आपल्याला एका वेगळ्याच विश्वात नेतो. इथले आकाश, अगदी सूर्य आणि चंद्र देखील वेगळे भासतात. मिडनाईट सन म्हणजेच मध्यरात्री दिसणारा सूर्य पाहण्यासाठी आपल्याला स्कँडिनेव्हियन देशांमध्ये जावं लागतं. रात्री उशिरापर्यंत दिसणारा सूर्य आणि अवघ्या तासाभराची रात्र, मध्यरात्री खेळलं जाणारं गोल्फ, हे सारं इथे येणाऱ्या पर्यटकांना अनुभवता येतं.

युरोपचा भाग असलेला पण अगदी जगावेगळा देश पाहायचा असेल तर आईसलँडला भेट द्यायलाच हवी. हा युरोपचा सर्वात उत्तरेकडील देश, परंतु या प्रांताला उर्वरित युरोपसारखी हिरवी चादर नाही. इथे निसर्गाची वेगळीच किमया आहे. काळा समुद्र, ज्वालामुखी, गिझर्स, युरोपातील सेकंड लार्जेस्ट ग्लेशिअर, ग्लेशिअरची अनोखी सफर, त्याच्या पाण्यात बोट राईड, व्हेल वॉचिंग हे सारं आपण इथे अनुभवतो. तुरळक वस्तीच्या या देशात जागोजागी थर्मल पूल्स आणि थर्मल इलेक्ट्रिसिटीचा वापर होतो. अनेक नैसर्गिक धबधबे आणि गिझर्स इथे पाहावयास मिळतात.

वर्षातल्या ठराविक वेळेतच करता येतील अशा युरोपमधील काही सहली म्हणजे स्कँडिनेव्हियन नॉर्दन लाईट्स, स्कँडिनेव्हिया मिडनाईट सन, युरोप ख्रिसमस मार्केट, फ्रेंच रिव्हेरा, स्पेन टोमॅटिना फेस्टिवल. पर्यटकांना अद्भुत अनुभव देणाऱ्या या सहली आपले वेगळेपण जपतात. 

तर मंडळी, केसरीची युरोप सहल म्हणजे सतत अपग्रेड केलेली सहल आणि मोठ्या संख्येने युरोप पाहायला येणाऱ्या पर्यटकांना या सहलींमध्ये माऊंट टिटलिस रोटेअरचा प्रवास, एंगलबर्ग या सुंदर शहरात वास्तव्य, वेगवान युरोस्टारचा प्रवास, आदी अनेक गोष्टी आपण देतो. त्यामुळे युरोप सहलीची किंमत पाहण्यापेक्षा आपल्याला काय पाहिजे ते या सहलीत आहे का हे तपासून पाहा. अविस्मरणीय युरोप अनुभवा फक्त केसरीसोबत!

Tags