आमच्या एका स्नेही कुटुंबाने मुलीला मनालीला हनिमूनला पाठवलं होतं. ते मनालीच्या इतक्या प्रेमात पडले की त्यांनी पहिल्या मुलीचे नाव मनाली ठेवले. मनालीचा बहुतेक करिष्माच आहे तसा, जो आला त्याला मनाली आपलं वाटलं, भावलं. भारताच्या भूगोलातील मानाचा तुरा म्हणजे हिमाचल प्रदेश आणि मनाली हे त्याचं कोंदण.
देवराज इंद्राच्या अंगठीतला, शुभ्र लखलखता हिरा…. हिमाचल! पाचूसारख्या हिरव्या वनराईच्या कोंदणातल्या हिमाच्छादित शिखरांचा… हिमाचल! नितळ नद्यातला, निळ्या आभाळाच्या प्रतिबिंबांच… हिमाचल! हा हिरा जवळून निरखून पाहायचा तर केसरीबरोबर या सिझनमध्ये हिमाचलच्या सहलींना जायला हवं! शौर्य आणि पराक्रमासाठी दिले जाणारे 847 गॅलेनट्री अवॉर्ड्स याच प्रदेशातील शूर सैनिकांना देण्यात आले आहेत. या प्रदेशाने इतके शूर सैनिक आपल्या देशाला दिले आहेत, म्हणूनच कदाचित हिमाचलला Valley of Veer (Brave) म्हणत असावेत. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जायचं तर शूरवीरांच्या या भूमीला नक्की भेट द्या.
अनुपम निसर्गसौंदर्याचं वरदान लाभलेल्या मॅजिकल मनालीला पुराणकथांचं गूढ रम्य वलयही लाभलेलं आहे. सनातन हिंदू कायदेतज्ज्ञ ऋषी मनू यांच्यामुळे या प्रदेशाला मनाली हे नाव मिळालं. मनु – आलय म्हणजे Abode of Manu. असं म्हणतात की महाप्रलयानंतर ऋषी मनु यांनी मनालीची पुनर्बांधणी केली. म्हणूनच कुल्लु व्हॅलीमध्ये वसलेल्या या मनालीला Valley of God असंही म्हटलं जातं. एकीकडे खळाळत वाहाणारी प्रसन्न बियास नदी आणि दुसरीकडे बर्फाच्छादित पर्वत म्हणजे मनालीची खासियत. थेट महाभारताशी संबंध असलेलं हिडिंबा मंदिर म्हणजे मनाली मधील अद्वितीय आध्यात्मिक अनुभूती देणारं निसर्गरम्य वातावरणातील शांत आणि अद्भुत ठिकाण इथल्या सोलांग व्हॅलीमध्ये पॅराग्लायडिंगची धम्माल अनुभवा येते. शिमलाहून मनालीला जाताना वाटेत कुल्लू लागतं. या नदीमध्ये रिव्हर राफ्टिंग करता येतं. हातमागावर विणलेल्या शाली, कुल्लू कॅप्स आपल्याला खरीदी करता येतात. लष्कराच्या अधिपत्याखाली असलेलं रोहतांग पास मे महिन्यात पर्यटकांसाठी खुलं झालं की स्नो स्कूटर, केबल कार राईड आणि इतर बर्फातील धम्माल ऍक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला सहभागी होता येतं आणि तिथूनच पुढे लेहला जाता येतं. तर मनालीला लाहौल-स्पितीशी जोडणाऱ्या अटल टनल या जगातील सर्वात लांब उंच पर्वतीय बोगद्यातून आपण प्रवास करतो. दसरा हा इथला खूप मोठा सण. या वेळेत मनालीमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने येतात.
चंदीगडहून अवघ्या सहा तासांवर असलेलं, सात हजार फूटांवर वसलेलं स्नो ऍडव्हेंचरसाठी प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणजे शांत निवांत शिमला हे ब्रिटीश राजवटीत भारताची उन्हाळी राजधानी होतं. आजही शिमल्याच्या रस्त्यांवर फिरताना ब्रिटीशकालीन खूणा नजरेस पडतात. शिमलाच्या मॉल रोडला हातमागावर विणलेल्या रंगीत शाली आणि लक्कड़ बाजारात नक्षीदार हस्तकलेचे उत्तम आर्टिकल्स खरेदी करता येतात.
शिमला मनाली हे पूर्वीपासूनच पर्यटकांमध्ये एक सुंदर पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. आजही उत्तरेकडील अनेकांची पहीली टूर ही इथलीच असते. म्हणूनच केसरीची बहुतेक रोजच एक टूर शिमला मनालीला जाते. पण ज्यांनी या आधीच शिमला मनाली पाहिलं आहे, त्यांनी हिरमुसून जाण्याचं कारण नाही. हिमाचलमध्ये पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी खूप काही आहे, जे त्यांनी नक्की पाहावं.
हिमाचलमधील डलहौसी हे सुंदर ठिकाण धौलदार पर्वतरांगेत पाच टेकड्यांवर मिळून वसलेलं आहे. 1942 लव्ह स्टोरी या सिनेमात पाहिलेलं डलहौसीला बॉलिवूडसह पर्यटकांनीही डोक्यावर उचलून धरलं.
चंदीगडहून अवघ्या सहा तासांवर असलेलं, सात हजार फूटांवर वसलेलं स्नो ऍडव्हेंचरसाठी प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणजे शांत निवांत शिमला हे ब्रिटीश राजवटीत भारताची उन्हाळी राजधानी होतं. आजही शिमल्याच्या रस्त्यांवर फिरताना ब्रिटीशकालीन खूणा नजरेस पडतात. शिमलाच्या मॉल रोडला हातमागावर विणलेल्या रंगीत शाली आणि लक्कड़ बाजारात नक्षीदार हस्तकलेचे उत्तम आर्टिकल्स खरेदी करता येतात.
शिमला मनाली हे पूर्वीपासूनच पर्यटकांमध्ये एक सुंदर पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. आजही उत्तरेकडील अनेकांची पहीली टूर ही इथलीच असते. म्हणूनच केसरीची बहुतेक रोजच एक टूर शिमला मनालीला जाते. पण ज्यांनी या आधीच शिमला मनाली पाहिलं आहे, त्यांनी हिरमुसून जाण्याचं कारण नाही. हिमाचलमध्ये पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी खूप काही आहे, जे त्यांनी नक्की पाहावं.
हिमाचलमधील डलहौसी हे सुंदर ठिकाण धौलदार पर्वतरांगेत पाच टेकड्यांवर मिळून वसलेलं आहे. 1942 लव्ह स्टोरी या सिनेमात पाहिलेलं डलहौसीला बॉलिवूडसह पर्यटकांनीही डोक्यावर उचलून धरलं. इतकं की पुढे अनेक सिनेमांमध्ये ते पाहायला मिळालं. शिमला जशी हिमाचलची उन्हाळी राजधानी तशी हिवाळी राजधानी कोणती तर धरमशाला. जवळच असलेलं मॅक्लॉडगंज म्हणजे दलाई लामांचं भारतातील निवासस्थान. इथल्या मॉनेस्ट्रीमधून शांतीचा, अध्यात्माचा आणि चैतन्याचा संदेश दिला जातो. इथलं भव्य क्रिकेट स्टेडियमने तर जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या मनात विशेष घर केले आहे. घनदाट जंगलांनी वेढलेले, महाभारतातील अर्जुन आणि शंकर महादेवांच्या भेटीचं ठिकाण म्हणून ओळखलं धरमशाला जवळील अघंजर महादेव मंदिर हे हिमाचल प्रदेशातील एक प्राचीन शिव मंदिर आहे.
देवीच्या 52 शक्तीपिठांपैकी एक असलेलं श्री ज्वालाजी मंदिरही हिमाचलमध्येच आहे. वशिष्ठ ऋषींचे मंदिर आणि वशिष्ठ कुंड ही हिमाचलला जाणाऱ्या पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. अनन्यसाधारण आध्यात्मिक महत्त्व असलेल्या या तीर्थक्षेत्रांना आपल्या हिमाचल टूरमध्ये निश्चितपणे भेट द्यायला हवी. शिमला मनाली ही टूर चंदीगडहून सुरु होते. तर ऑल ऑफ हिमाचल टूर अमृतसर, पंजाब येथून सुरु होते. त्यामुळे आपल्याला अमृतसर येथील सुवर्ण मंदिरही पाहता येतं. तर पार्वती नदीच्या काठावर वसलेले मणिकरण हे गरम पाण्याच्या कुंडांसाठी तसंच गुरुद्वारा मणिकरण साहिब व प्राचीन शिवमंदिरासाठी प्रसिद्ध धार्मिक आणि निसर्गरम्य ठिकाण आपल्याला केसरीच्या कस्टमाइज्ड टूर्समध्ये पाहता येतं.
मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जाणारं खज्जियार हे हिरव्यागार मैदानांनी, घनदाट देवदाराच्या जंगलांनी आणि शांत सरोवराने नटलेले आहे. साहसी खेळ, घोडेस्वारी आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी हे एक परिपूर्ण पर्यटन स्थळ आहे.
पुढे जूननंतर सुरु होणाऱ्या, स्वच्छ आकाश, बर्फाच्छादित डोंगर आणि विशेषतः ट्रेकिंग आणि कॅम्पिंगसाठी तरुणाईमध्ये प्रसिद्ध असलेल्या लाहौल, स्पिती व्हॅली आणि चंद्रतालच्या टूर्स हाऊसफुल्ल होतात, त्यामुळे अनेक पर्यटक त्यांचं बुकिंग आत्ताच करतात. हिमाचलमध्ये टूर्स करायच्या तर कुटुंबातील प्रत्येकासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत.
ग्रुप टूर्ससोबतच सिनिअर सिटिझन्ससाठी सेकंड इनिंग्स टूर्स, कपल्ससाठी हनिमून टूर्स आणि केवळ महिलांसाठी वूमेन्स स्पेशल टूर्सचा पर्यायही उपलब्ध आहेत. मंडळी, हिमाचलबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच. अद्भुत निसर्गाचं वरदान लाभलेला, देवदेवतांचा आशीर्वाद लाभलेला आणि भरपूर ऍडव्हेंचरने भरलेला हेवनली हिमाचल पाहायचा तर तो फक्त केसरी सोबत!