गोष्ट एका अद्भुत स्थलांतराची !
आफ्रिका म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात ती अथांग सवाना माळराने, मुक्तपणे भटकणारे वन्यजीव आणि जगातील सर्वात मोठे वन्यजीव स्थलांतर म्हणजेच ग्रेट मायग्रेशन. टांझानियाच्या प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यानांमध्ये निसर्गाचा हा विलक्षण आविष्कार प्रत्यक्षात अनुभवण्याची दुर्मिळ आणि अनोखी संधी पर्यटकांना केसरीच्या टांझानिया वाईल्डलाईफ स्पेशल या दूरमध्ये मिळते.
7 दिवस 6 रात्रींच्या या टूरमध्ये आपण टांझानियातील लेक मन्यारा, सेरेन्गेटी आणि गोरोन्गोरो या तीन वन्यजीवसंपन्न ठिकाणांना भेट देतो. या निसर्गरम्य प्रदेशात घालवलेला प्रत्येक दिवस वन्यजीवनाच्या नव्या अनुभवांनी भरलेला असतो. किलिमांजारो विमानतळावर उतरल्यावर सर्वप्रथम आपण भेट देतो ते लेक मन्यारा नॅशनल पार्कला. आफ्रिकन म्हशी आणि भल्यामोठ्या हत्तींच्या कळपांसाठी प्रसिद्ध असलेलं हे उद्यान जैवविविधतेनं समृद्ध आहे. जिराफ, इंपाला, पाणगेंडा यांसारखे प्राणी तसंच 300 हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती इथे पाहायला मिळतात. फ्लेमिंगो, लाँग क्रेस्टेड ईगल आणि ग्रे हेडेड किंगफिशर यांसारख्या सुंदर पक्ष्यांमुळे या प्रदेशाचं सौंदर्य अधिक खुलतं. झाडांवर चढणाऱ्या सिंहांसाठी तर लेक मन्यारा विशेष प्रसिद्ध आहे.
अमर्याद पसरलेली गवताळ माळरानं अॅकॅशिया वृक्षांचा सवाना प्रदेश, जंगलांनी व्यापलेले डोंगर आणि पर्वतरांगा असा विविधतेने नटलेला भूभाग म्हणजे सेरेन्गेटी नॅशनल पार्क. इथल्या गेम ड्राईव्हमध्ये आपल्याला सिंह, चित्ता, बिबट्या, झेब्रा, गझेल हरणं, वाईल्ड डॉग्स आणि असंख्य वन्यजीव त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याची संधी मिळते. सेरेन्गेटीमध्ये सुमारे 4000 सिंह, 1000 बिबटे, 550 चित्ते आणि 500 पेक्षा अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. या विशाल मैदानांवर लाखो वाईल्डबीस्ट्सचं स्थलांतर घडतं आणि हा नजारा पृथ्वीवरील सर्वात भव्य वन्यजीव प्रदर्शन मानला जातो. येथील मुक्कामात पर्यटकांना ऑप्शनल हॉट एअर बलून सफरीचा अनुभवही घेता येतो. सूर्योदयाच्या वेळी आकाशातून सेरेन्गेटीच्या विस्तीर्ण मैदानांचं विहंगम दृश्य पाहणं हा खरोखर आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव असतो.
क्रेटर हायलँड्स प्रदेशात वसलेलं न्गोरोन्गोरो संरक्षित क्षेत्र हे जगातील सर्वात मोठ्या अखंड ज्वालामुखीय विवरांपैकी एक. न्गोरोन्गोरो क्रेटर हे आफ्रिकेतील सात नैसर्गिक आश्चयांपैकी एक मानलं जातं आणि काळा गेंडा पाहण्यासाठी तर हे जगातील सर्वोत्तम ठिकाण. या प्रचंड विवरात आफ्रिकन म्हैस, हिप्पोपोटॅमस, ईलंड, हार्टबीस्ट, वॉरथॉग तसंच विविध प्रकारची हरणं पाहायला मिळतात. दुर्मिळ ईस्ट आफ्रिकन वाईल्ड डॉग आणि टांझानियन चित्ता देखील क्वचित नजरेस पडतात. न्गोरोन्गोरो क्रेटरमधील सफर म्हणजे आफ्रिकेच्या वन्यजीवनाचं एक अद्भुत आणि संपूर्ण चित्र अनुभवण्याची संधी.
लेक मन्याराच्या हिरव्यागार जंगलांपासून ते सेरेन्गेटीच्या अथांग माळरानांपर्यंत आणि गोरोन्गोरोच्या भव्य ज्वालामुखीय विवरापर्यंत ही टूर निसर्गाच्या सर्वोत्तम कलाकृतींचं दर्शन घडवते.
आफ्रिकेतील टांझानियाचा अतिशय विलोभनीय निसर्ग अनुभवल्यानंतर, वन्यजीवांचं दुसरं नंदनवन म्हणजे केनिया ! सिंह, बिबट्या, हत्ती, गेंडा आणि केप बफेलो या बिग फाईव्ह प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहणं, हा कोणत्याही वन्यप्रेमीसाठी एक थरारक अनुभव असतो. इथलं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे मसाई माराचं वन्यजीव स्थलांतर! लाखोंच्या संख्येने मारा नदी ओलांडणारे वाईल्डर बीस्ट, पाण्यात दबा धरून बसलेल्या मगरी आणि शिकारीची संधी शोधणारा बिबटया… काळजाचा ठोका चुकवणारं हे दृश्य बहुतेकदा आपण डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफीवर पाहिलेलं असतं. केसरीच्या केनिया सफारी या टूरमध्ये हाच थरार आपल्याला प्रत्यक्ष अनुभवता येतो. हे स्थलांतर आपल्याला निवांतपणे, जवळून आणि व्यवस्थितपणे पाहता यावं, यासाठी आम्ही या टूरमध्ये एक संपूर्ण दिवस सफारी देतो. जगभरातील निसर्गप्रेमी आणि अभ्यासक मंडळी या काळात इथे येतात. साधारण जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून इथे स्थलांतराला सुरुवात होते. आयुष्यात एकदातरी घ्यावाच असा हा अनुभव ! फक्त वन्यजीवन अनुभवायचं नसेल तर केसरीची साऊथ आफ्रिका केनिया व्हिक्टोरिया फॉल्स ही टूर एक उत्तम पर्याय आहे. ग्रेट मायग्रेशनसोबतच जगप्रसिद्ध व्हिक्टोरिया धबधबाही पाहता येतो. उंचावर कोसळणारा तो प्रचंड जलप्रपात पाहताना भान हरपायला होतं.
टांझानिया वाईल्डलाईफ स्पेशल, केनिया सफारी, साऊथ आफ्रिका केनिया व्हिक्टोरिया फॉल्स आणि केसरीच्या इतर कॉम्बिनेशन टूर्समध्ये आपल्याला साऊथ आफ्रिकेची विविध रूपं पाहायला मिळतात. कुठे निव्वळ निसर्गसौंदर्य आणि वाईल्डलाईफ तर कुठे सोबतीला तिथल्या शहराच्या आधुनिकतेची झलक! या सगळ्याच टूर्स आतापर्यंत लाखो पर्यटकांनी नावाजलेल्या आहेत. यातील आपल्या पसंतीची टूर निवडा आणि चला केसरीसोबत!
