जगभ्रमण ही काही नवीन संकल्पना नाही. प्रत्येकाच्या बकेट लिस्टमध्ये आपल्या बजेट आणि आवडीनुसार अनुभवायच्या आणि पाहायच्या ठिकाणांची एक यादी असते. पण केवळ काय पाहायचं हेच नाही, तर ते कसं अनुभवायचं हेही तितकंच महत्त्वाचं असतं.
परदेश प्रवासाची सुरुवात बहुतांश जण साऊथ ईस्ट एशियापासून – खासकरून सिंगापूर, थायलँड, मलेशिया किंवा दुबईसारख्या लोकप्रिय डेस्टिनेशनपासून करतात. त्यानंतर प्रवासाची व्याप्ती वाढत जाते आणि मग युरोपची भव्यता, अमेरिकेची विविधता, स्कँडिनेव्हियाची निसर्गरम्यता, आईसलँडचे अद्भुत भूवैशिष्ट्य, कॅनडाचे विस्तीर्ण सौंदर्य, रशियाचा इतिहास, ऑस्ट्रेलिया – न्यूझीलँडची वेगळी जीवनशैली आणि रंगीबेरंगी साऊथ अमेरिकेसह अनेक प्रदेशांची सफर घडत जाते.
आणि जर सप्तखंडांची सफर पूर्ण करण्याचं स्वप्न असेल, तर पृथ्वीच्या सर्वात दक्षिणेकडचा, सर्वात थंड, कोरडा आणि जोरदार वाऱ्यांसाठी ओळखला जाणारा अंटार्क्टिका खंड अनुभवायलाच हवा. जगातील सेव्हन वंडर्स ऑफ द वर्ल्ड पाहायची इच्छा असेल, तर साऊथ अमेरिकेची टूर नक्कीच करावी. त्यासोबत जॉर्डनमधील ऐतिहासिक पेट्रा शहरही पाहण्यासारखं आहे.
प्रत्येक देश आणि प्रत्येक शहराची स्वतःची एक वेगळी ओळख असते. काही ठिकाणे त्यांच्या इतिहासासाठी प्रसिद्ध असतात, काही निसर्गासाठी तर काही जीवनशैलीसाठी. त्यामुळे त्या त्या ठिकाणी गेल्यावर तेथील खास अनुभव घेणं महत्त्वाचं ठरतं. मात्र स्वतंत्र प्रवासात अनेक गोष्टी नकळत राहून जातात.
याउलट, ग्रुप टूरमध्ये प्रवासाचा प्रत्येक टप्पा विचारपूर्वक नियोजित केलेला असतो. कोणत्या वेळी कोणतं ठिकाण पाहावं, कुठे गर्दी टाळता येईल, कोणत्या मार्गाने वेळ वाचेल आणि कमी वेळेत अधिक अनुभव कसे घेता येतील याचा आधीच अभ्यास केलेला असतो. त्यामुळे प्रवास अधिक निवांत, समृद्ध आणि अनुभवांनी भरलेला होतो. टूर लीडर्सच्या योग्य मार्गदर्शनामुळे त्या त्या शहरांतील laws of the land सुद्धा सहजपणे पाळले जातात.
साऊथ ईस्ट एशियामध्ये, विशेषतः थायलँडमध्ये पॅराग्लायडिंगचं ऍडव्हेंचर, पारंपरिक थाई मसाजसह रिलॅक्सेशन आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीची लज्जत – हे अनुभव प्रत्येक पर्यटकाने घ्यायलाच हवेत.
जगभरातील काही अनुभव असे असतात जे केवळ पाहायचे नसतात, तर जगायचे असतात. स्वित्झर्लंडमधील माऊंट टिटलिसच्या गंडोलामधून पर्वतरांगांमध्ये घेतलेली राईड, आयफेल टॉवरच्या टॉप लेव्हलवरून दिसणारं पॅरिसचं विहंगम दृश्य आणि युंगफ्रॉकडे जाणाऱ्या ट्रेनचा निसर्गरम्य प्रवास – हे प्रत्येक क्षण प्रवासाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातात.
साऊथ अमेरिका म्हणजे अनुभवांची एक अखंड मेजवानीच. जगातील सर्वात मोठा आणि रंगतदार मानला जाणारा रिओ कार्निव्हल, पेरिटो मोरेनो ग्लेशिअरचं बर्फसौंदर्य, शुगरलोफ माऊंटन, ख्राईस्ट द रिडीमर, महाकाय ऍमेझॉन नदीतील क्रूझ सफर आणि माचूपिचूचा रहस्यमय प्रवास – प्रत्येक ठिकाण एक वेगळी कथा सांगतं. यासोबतच कॅक्टस आयलँड, अर्जेंटिनातील रंगीबेरंगी वॉकवे, पेरूमधील कुझको शहरातील ऐतिहासिक वास्तुरचना, ला पाझ शहराच्या मध्यभागी उभारलेली आणि स्थानिकांची लाईफलाईन असलेली रोपवे आणि निसर्गाचा चमत्कार सालार दे उयूनी – अशा एकापेक्षा एक समृद्ध अनुभवांनी सजलेली केसरीची साऊथ अमेरिका टूर, विशेषतः रिओ कार्निव्हलच्या काळात केली तर उत्तमच.
आणि अंटार्क्टिका? ती केवळ टूर नाही – एक एक्स्पेडिशन आहे. निसर्गाच्या अनंत किमयांचा अनुभव देणारी, बर्फाच्या अद्भुत दुनियेत घेऊन जाणारी आणि प्रत्येक क्षणाला विस्मयचकित करणारी एक अविस्मरणीय सफर.
आईसलँड म्हणजे निसर्गाने जपून ठेवलेलं एक रहस्यच जणू. जसं आपण स्कँडिनेव्हिया टूरमध्ये बस, क्रूझ आणि ट्रेनमधून त्या प्रदेशाची खरी ओळख करून घेतो आणि आईसब्रेकर क्रूझचा अनुभवही घेतो. आईसलँड पाहायचा तर एक वेगळी पद्धत आहे. केवळ राजधानी रेक्याविकमध्ये मुक्काम करून हा देश पूर्णपणे अनुभवता येत नाही. शुभ्र धबधबे, ज्वलंत ज्वालामुखी, उकळते मडपूल्स, उंच उसळणारे गिझर्स, हजारो वर्षांत तयार झालेल्या रॉक फॉर्मेशन्स आणि ग्लेशिअरमधील तासनतास चालणारा प्रवास – इथला प्रत्येक क्षण अचंबित करणारा आहे.
असा वेगळेपण जपणारा आणि प्रत्येक देशाचा खरा अनुभव देणारा प्रवास हेच केसरीचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक देशातील जे अनुभव, जी ठिकाणं आणि जे क्षण पर्यटकांनी अनुभवायलाच हवेत, ते आपल्या टूर्समध्ये समाविष्ट आहेत.
आपल्यालाही जगाचा असा आगळावेगळा अनुभव घ्यायचा असेल तर लगेच प्लॅनिंग करा – केसरीसोबत!
स्कँडिनेव्हियाचा निसर्गरम्य प्रवास, रिओ कार्निव्हलची रंगत, अंटार्क्टिकाची अद्वितीय एक्स्पेडिशन, युरोपमधील ख्रिसमस मार्केट्सची जादू, चीनमधील झांगजियाजी पर्वतरांगांचे सौंदर्य, तैवानचा माउंटन फेस्टिव्हल, जपानमधील चेरी ब्लॉसम, युरोप विथ एंगलबर्ग किंवा बेस्ट ऑफ अमेरिका – प्रत्येक टूरमध्ये काहीतरी वेगळं अनुभवायला मिळतंच. कैलास मानसरोवर, चारधाम किंवा युरोप टूर्समध्ये केसरीसोबत हजारो पर्यटक प्रवास करत आहेत. केसरीची प्रत्येक टूर म्हणजे अविस्मरणीय अनुभव आणि यशस्वी प्रवासाची हमखास खात्री.
जगातील प्रत्येक कोपऱ्यात एक नवा अनुभव, एक नवी गोष्ट आणि एक नवी आठवण आपली वाट पाहत आहे. आता फक्त स्वप्न पाहू नका – आपल्या पुढच्या अविस्मरणीय प्रवासाची सुरुवात करा… केसरीसोबत!
