भारतातील सण, संस्कृती आणि परंपरा यांविषयी मला नेहमीच विशेष आकर्षण आणि कौतुक वाटतं. शक्य तितकं सर्व सण मी आईच्या मदतीने घरी साजरे करण्याचा प्रयत्न करते. माझा सर्वात आवडता सण म्हणजे दिवाळी. आपल्या आयुष्यातील दोन अतिशय महत्त्वाच्या नात्यांचा सुंदर उत्सव या पर्वात अनुभवायला मिळतो, नवरा-बायकोच्या नात्यातील गोडवा अधिक दृढ करणारा पाडवा आणि भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचं बंध अधिक घट्ट करणारी भाऊबीज.
बालपणी तर आम्ही दिवाळीची आतुरतेने वाट पाहायचो. आमच्याकडे अनेक कुटुंबांमध्ये भाऊबीजेच्या दिवशी चुलत, आते आणि इतर सर्व भावंडं एकत्र जमायची. आजही अनेक ठिकाणी ही सुंदर परंपरा जपली जाते. कल्पना करा, त्या क्षणी घरभर किती उत्साह, गप्पा आणि आनंदाचं वातावरण असायचं! आपल्या हिंदू संस्कृतीची सर्वात मोठी ताकद म्हणजे आपली कुटुंबव्यवस्था. मात्र, काळानुसार त्यात बरेच बदल झाले आहेत. आज प्रत्येकजण आपल्या कामात इतका व्यग्र झाला आहे की, अनेकदा भाऊ-बहिणीसुद्धा एकाच गावात नाहीत, तर वेगवेगळ्या देशांत, अगदी वेगवेगळ्या खंडांत राहतात. त्यामुळे अनेकांना भाऊबीज व्हिडिओ कॉलवर ओवाळणी करून आणि ऑनलाइन शुभेच्छांची देवाणघेवाण करत साजरी करावी लागते.
पण विचार करा, आपण पुन्हा एकदा सगळे एकत्र आलो आणि भाऊबीज पूर्वीसारख्या उत्साहात साजरी केली, तर किती आनंदाची गोष्ट असेल ना? यंदा आपल्या सगळ्यांची लाडकी अप्सरा, सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि तिचा भाऊ रोहनही या विशेष सोहळ्यात आपल्यासोबत सहभागी होणार आहेत. याच भावनेतून यंदाच्या दिवाळीत लक्षद्वीप क्रूझवर एक अनोखी ‘सेलिब्रिटी भाऊबीज’ आयोजित केली आहे. या संस्मरणीय प्रवासात सोनाली आणि रोहनसोबत आपण सर्व भाऊ-बहिणी आणि आपल्या कुटुंबियांसोबत नात्यांचा हा सुंदर उत्सव अनुभवणार आहोत.
दिवाळीचा जल्लोष, कुटुंबाचा सहवास आणि नात्यांची ऊब—या सगळ्यांचा अविस्मरणीय संगम अनुभवण्याची ही एक खास संधी आहे. यंदाची भाऊबीज आयुष्यभर स्मरणात राहील, अशा अनोख्या पद्धतीने साजरी करूया. भावाने बहिणीला किंवा बहिणीने भावाला केवळ भेटवस्तूच नव्हे, तर आयुष्यभर जपून ठेवता येईल अशी सुंदर आठवण भेट देऊया.
या आनंदोत्सवासाठी संपूर्ण कुटुंबाने एकत्र यायचं, नात्यांचा हा सोहळा मनापासून अनुभवायचा आणि पर्यटनाचा एक अविस्मरणीय अनुभव घेऊन परतायचं, फक्त केसरीसोबत!

आम्ही भाऊ-बहीण आहोत, पण त्याहूनही जास्त एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. अतुल माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि मला खात्री आहे की मीही त्याच्या आयुष्यात तितकीच महत्त्वाची आहे. आम्ही दोघे एकमेकांची सर्वात मोठी ताकद आहोत, एकमेकांचे विश्वासू साथीदार आहोत.
एकत्र प्रवास करणं नेहमीच खूप आनंददायी असतं, कारण आमचे छंद, आवडीनिवडी आणि अगदी खाण्यापिण्याच्या सवयीदेखील सारख्याच आहेत. माझ्या मते, उत्तम प्रवाससाथी निवडताना या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. या सगळ्या गोष्टींचा आनंद एकत्र घेता आला पाहिजे, विशेषतः खाण्याचा… आणि सुदैवाने, याबाबतीत आमच्यात कधीच वाद होत नाही.
नवीन ठिकाणं अनुभवणं आणि प्रवासात मनसोक्त शॉपिंग करणं आम्हा दोघांनाही खूप आवडतं. यापूर्वी आम्ही कुटुंबासोबत केसरीची टूर केली आहे. त्यामुळे कम्फर्ट आणि कॉन्फिडन्स अगदी दुप्पट आहेच. आम्ही याआधी गोवा एकत्र अनुभवला आहे, पण कधीच एकत्र क्रूझ सफर केलेली नाही. त्यामुळे त्या सुंदर आठवणी पुन्हा जगण्याची आणि काही नवीन आठवणी निर्माण करण्याची ही टूर म्हणजे आमच्यासाठी एक वेगळी संधी असेल. म्हणून यावेळी केसरीच्या मुंबई–गोवा–लक्षद्वीप–मुंबई क्रूझ टूरचा भाग होण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत.
या टूरमध्ये आम्ही लक्षद्वीपलाही भेट देणार आहोत. निसर्गसौंदर्याने नटलेली, शांत, निर्मळ आणि अजूनही अनटच्ड असलेली ही बेटं माझ्या बकेट लिस्टमध्ये बऱ्याच दिवसांपासून आहेत.
या क्रूझवर आम्हाला एकत्र आनंद घेण्यासाठी काही ना काही फन ऍक्टिव्हिटीज सापडतीलच. पण आम्ही दोघंही नृत्याशी जोडलेले असल्यामुळे या क्रूझवर आम्हाला नक्कीच एखादा स्टेज किंवा डान्स फ्लोअर मिळेल, मग आमचा धम्माल डान्स परफॉर्मन्स सुरू होईल आणि हा प्रवास आमच्या कायम स्मरणात राहील, याची मला खात्री आहे.
आम्ही दरवर्षी दिवाळी एकत्र साजरी करतो. यंदा दिवाळी, विशेषतः भाऊबीज, क्रूझवर साजरी करण्याचा अनुभव आमच्यासाठी खरोखरच अविस्मरणीय असेल. तेव्हा आपणही आपल्या कुटुंबासोबत या दिवाळीत आमच्यासोबत या धम्माल क्रूझवर चला आणि या खास प्रवासाचा आनंद घ्या!
- अभिनेत्री सोनाली कुलकर्णी
