“It is not what you get out of books that is so enriching; it is what books get out of you that will ultimately change your destiny.“
लेखक रॉबिन शर्मा यांच्या पुस्तकातलं हे वाक्य आधी पटकन लक्षात आलं नाही, परंतु पुन्हा पुन्हा वाचल्यावर डोक्यात प्रकाश पडला. अनेक पुस्तकं आपलं कधी जीवन बदलतात आणि कधी आपलं नशीबही बदलतात चांगली पुस्तकं नेहमीच प्रभावी असतात. मला पर्यटनाबद्दलही तसंच वाटतं, पुस्तकांतून काय मिळतं हे आपल्याला समृद्ध करत नाही; तर पुस्तकं आपल्याकडून काय करवून घेतात, हेच खऱ्या अर्थाने समृद्ध करतें, पुस्तकं आणि प्रवास या दोन्हीमध्ये आपलं नशीब बदलण्याची ताकद आहे. वाचाल तर वाचाल, जग हे एक पुस्तक आहे, आणि जे प्रवास करत नाहीत ते फक्त एकच पान वाचतात. पुस्तक आपल्याला एका वेगळ्या जगाचा अनुभव देतं, तर प्रवास ते जग दाखवतो आणि तो अनुभव प्रत्यक्षात आणतो. माझ्या प्रत्येक प्रवासात माझ्यासोबत एक तरी पुस्तक असतं, आणि जगभरात फिरताना समुद्राच्या किनाऱ्यावर विमानात, ट्रेनमध्ये पुस्तकं वाचणाऱ्या अनेकांनी मला प्रेरित केलं आणि हा छंद जडला. पुस्तकं आणि प्रवास या दोन गोष्टी माणसाला खऱ्या अर्थाने समृद्ध करतात अनुभव, समज, वागणूक, सहानुभूती आणि सामाजिक जाण वाढवतात. तेव्हा पुस्तकं वाचूया, जग बघूया, समृद्ध होऊया !
सध्याच्या भूराजकीय परिस्थितीमुळे भारतातील पर्यटन वेगाने वाढलं आहे. देशांतर्गत टूर्समध्ये काश्मीर, हिमाचल, लेह-लडाख, लाहौल-स्पिती व्हॅली-चंद्रताल, नैनिताल आणि सिक्कीम- दार्जिलिंगसारखे हिमालयाच्या निसर्गरम्य प्रदेशातील टूर्स उपलब्ध आहेत. तर दक्षिण भारतातील केरळ आणि तामिळनाडू राज्यात केसरीच्या अनेक कॉम्बिनेशन टूर्स आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत समुद्रकिनारी रिलॅक्स व्हायचं तर अंदमान हा बेस्ट ऑप्शन, सोबत लक्षद्वीपची क्रूझ टूर सुद्धा आहे. काश्मीर वैष्णोदेवी, काश्मीर अमरनाथ यात्रा आणि अक्षय तृतीयेपासून सुरू होणाऱ्या उत्तरांचल चारधाम यात्रेसाठी जोरदार बुकिंग सुरु आहे. जून महिन्यात सुरु होणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेसाठी केवळ कैलास मानसरोवर, मुक्तिनाथसह हेलिकॉप्टर प्रवासासह असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
तसंच युरोप, अमेरिका, जपान, आफ्रिका, साऊथ ईस्ट एशिया, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलँडमधील अप्रतिम डेस्टिनेशन्सना केसरीचे पर्यटक धम्माल करताहेत. आकाशातील रंगीबेरंगी प्रकाशकिरणांचा सुंदर देखावा पाहण्यासाठी 18 जूनला न्यूझीलँड सदर्न लाईट्स ही अनोखी टूर निघतेय. वाईल्डलाईफ सफारीसाठी खास करून ग्रेट मायग्रेशनचा रोमांचक अनुभव घेण्यासाठी केसरीच्या आफ्रिकेतील केनिया सफारी आणि टांझानिया वाईल्डलाईफ स्पेशल या टूर्स ऑगस्ट महिन्यात निघणार आहेत.
सगळीकडे एअरलाईन्स आणि हॉटेल्सच्या किंमती खूपच वाढल्या आहेत. परंतु केसरीच्या व्हॅल्यू फॉर मनी इंटरनॅशनल टूर्सचा आपल्याला अजूनही लाभ घेता येईल. केसरीच्या सर्व टूर्समध्ये 4- स्टार हॉटेल्स आणि महत्त्वाची सर्व साईटसीइंग्स समाविष्ट आहेत.
Travel is the only thing you buy that makes you richer.
तर मग, या उन्हाळ्याच्या सुट्टीत पुस्तकांमधून जग पाहतानाच केसरीसोबत हेच जग प्रत्यक्ष अनुभवूया, फक्त केसरीसोबत !
टूर लीडर्सचं समर्पण आणि केसरीचं व्यवस्थापन उत्तम!
चारधाम यात्रा ही आव्हानात्मक आहे; पण केसरीने बारकाईने केलेलं नियोजन, टूर लीडर्सचं समर्पण आणि मार्गदर्शन यामुळे ती सहज पार पडली. वाहनप्रवास, निवास आणि टूर लीडर्सचं इथल्या स्थळांचं सखोल ज्ञान पाहता सर्व काही व्यावसायिकतेने हाताळलं गेलं.
इथलं हवामान सतत बदलत राहतं; पण प्रत्येक पर्यटकाला धीर देत टूर लीडर्स सर्वांच्या सुरक्षेची काळजी घेत होते. त्यांचं मार्गदर्शन पाहून आम्हीही निश्चितपणे पुढे जात होतो. त्यांच्या वचनबद्धतेने आणि संयमाने आम्हाला आत्मविश्वास दिला आणि संपूर्ण यात्रा समाधानकारक ठरली.
– समीर जाधव, उत्तरांचल चारधाम यात्रा
कैलास मानसरोवर यात्रेचा स्वप्नपूर्तीचा आनंद!
माझी पत्नी ज्योती शंकराची खूप मोठी भक्त तिच्यासाठी कैलास मानसरोवर यात्रा म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी मिलन. ही यात्रा करणं तिचं स्वप्न होतं, जे केसरीमुळे पूर्ण झालं. टूर लीडर कल्पेशचं मार्गदर्शन आणि केसरीचं व्यवस्थापन उत्तम! कैलास पर्वताचं दर्शन आणि मानसरोवर परिक्रमा पूर्ण केल्यानंतरचे क्षण शब्दांत वर्णन करता येणार नाहीत. केसरीचं नियोजन, बुकिंग प्रक्रिया, हॉटेल्स आणि भोजन यांसह अनेक दर्जेदार सेवा विशेष आवडल्या.
– दत्तात्रय शिंदे, कैलास मानसरोवर यात्रा
दर्जेदार सेवा आणि उत्कृष्ट टूर लीडर !
आमची व्हिएतनाम टूर अतिशय सुरळीत आणि आनंददायी पार पडली. टूर लीडर राजेशचं व्यावसायिक मार्गदर्शन, नम्र स्वभाव आणि प्रत्येक पर्यटकाकडे दिलेलं वैयक्तिक लक्ष विशेष जाणवलं. केसरीच्या उत्तम नियोजनासाठी मनापासून आभार!
– स्नेहल आणि अनिल राओराणे, व्हिएतनाम
