सोन्याची दुबई

भारतीय पर्यटक फार मोठया संख्येने जगभ्रमण करतात, हे आता संपूर्ण जगाने मान्य केले आहे. पर्यटकांच्या बकेट लिस्टमध्ये जसा युरोपचा पहिला नंबर आहे, तसा व्यावसायिक पर्यटनामध्ये सर्वात वरचा नंबर असेल तर तो दुबईचा. कदाचित आपल्या बॉलीवूडने दुबईचे महत्व वाढविले असेल किंवा त्यांच्या दर सहा महिन्यांनी बदलणाऱ्या स्कायलाईनने. पूर्वी फक्त दुबई पोर्ट आणि सोने किंवा इतर खरेदीची बाजारपेठ असलेले दुबई आज भारतीयांसाठी रिअल इस्टेटची सुद्धा मोठी बाजारपेठ झाली आहे. अनेक भारतीय सुपरस्टार्स किंवा व्यावसायिकांची दुबईमध्ये घरे आहेत, हे आपण नेहमीच ऐकत असतो.

मंडळी, दुबईच्या सहली सुरु करून आता ३० वर्षे उलटली. भारतीयांचा दुबईच्या बाजारपेठेवरील वाढता प्रभाव मात्र दुबईत जाणवल्याशिवाय राहत नाही. पूर्वी गोल्डसुकमध्ये स्थानिक व्यापारी होते. तिथे आता मलाबार, जॉयअलक्कास, पु. ना. गाडगीळ असे शोरूम दिसतात. इथल्या यशस्वी उद्योजकांतील बहुतांश नावे ही भारतीय आहेत. आपले मराठी उद्योजक धनंजय दातारांची तर संपूर्ण एमिरेटमध्ये ग्रोसरी चेन आहे. ते तेथे मसाला किंग म्हणून ओळखले जातात. रिअल इस्टेट असो वा प्रोफेशनल्स असो, भारतीय बऱ्यापैकी सर्वच क्षेत्रात वर्चस्व टिकवून आहेत आणि मला २१ व्या शतकातील दुबईची ही नवी ओळख वाटते.

जसे दुबई बदलले तश्या दुबईतील सहलीसुद्धा बदलल्या. पूर्वी फक्त बुर्ज खलिफा, डेझर्ट सफारी, धाओ क्रूझ पुरते इथले पर्यटन मर्यादित होते. या पर्यटनामध्ये आता अनेक नवनवीन गोष्टीची भर झाली आहे. मंडळी, केसरीची दुबई सहल म्हणजे दुबईच्या सोन्यासारखेच एक खणखणीत नाणे. दुबईत गेल्यावर आपल्याला जे पहायलाच हवे ते प्रत्येक पर्यटनस्थळ सहलखर्चात समाविष्ट आहे. हा खर्च कमी दाखवण्यासाठी इथे सहलीमध्ये कोणतीही काटछाट केलेली नाही. केसरीच्या दुबई सहलीत ३ स्टार हॉटेलच्या किमतीत आपल्याला मॅरिएटमध्ये वास्तव्य तर अबूधाबीमध्ये ५ स्टार हॉटेलमध्ये वास्तव्य करता येते.

बुर्ज खलिफाच्या १२४व्या मजल्यावरून दुबईचा नजारा, धाओ क्रूझवर घालवलेली धम्माल संध्याकाळ, दुबईची जगप्रसिद्ध डेझर्ट सफारी, फेरारी वर्ल्डच्या वेगवान फॉर्म्युला रोझाचा प्रवास, अमेझिंग वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओज, शेख झायेद मॉस्क, पाम जुमैराचा नयनरम्य नजारा, म्युझियम ऑफ द फ्युचर (ज्याची तिकीटे मिळणे मुश्किल असते, परंतु आपण देतो, न दिल्यास दुसऱ्या पर्यटन स्थळाला भेट देतो.) जैवविविधतेने नटलेलं मिरॅकल गार्डन, दुबईतील प्रसिद्ध बाजारपेठ गोल्डसुक, बुर्ज अल अरब असे एकापेक्षा एक अनुभव आणि पर्यटनस्थळांसह पर्यटकांना जास्तीत जास्त दुबई आणि अबुधाबी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो, तेही आलिशान हॉटेलमधील वास्तव्यासह. म्हणूनच आम्ही म्हणतो, केसरीची दुबई सहल ही Value for money आहे. अशी सर्वसमाविष्ट सहल एव्हड्या कमी किमतीत अशक्य आहे, असे आमचे पर्यटकही सहलीनंतर म्हणतात.

केसरी माय फेअर लेडीची सहल दुबई शॉपिंग फेस्टिव्हलच्या काळात दुबईला जाते. खास महिलांसाठीच्या या सहलीमध्ये मैत्रिणी – मैत्रिणी, बहिणी – बहिणी, नणंदा-भावजया, जावा-जावा, सासू-सुना व आइ-मुली अशा अनेक महिला सहभागी होत असतात. जर आपणही या सहलीचा आनंद घेऊ इच्छित आहात, तर आपल्या सहकाऱ्यांना या सहलीबद्दल सांगा, एकत्र ग्रुपमध्ये बुकिंग करून हजारो वाचवा. दुबईमध्ये आपण काही प्रमाणात सोन्याची खरेदी करू शकतो, ते भारतापेक्षा स्वस्तही मिळते. सोन्याचे भाव आकाशाला भिडले असताना आपला थोडा फायदा करावा. केसरीकडे खास सिनिअर सिटीझन्ससाठी दुबई सहल आहे. हीच, ती वेळ आपल्या आई-वडिलांना एक छान गिफ्ट देण्याची. दुबई सहलीचा आनंद हा काही वेगळाच आणि आई – वडिल जेव्हा आम्हाला अभिमानाने सांगतात की मुलांनी आम्हाला सहल गिफ्ट केली तेव्हा आम्हालाही त्यांच्या आनंदात सहभागी होता येते.

मंडळी, गेल्या १० वर्षांत दुबईमध्ये आमुलाग्र बदल झाले आहेत. पुन्हा एकदा हे बदलेलं दुबई पाहायला काय हरकत आहे ? चला तर मग केसरीसोबत, घेऊया दुबईचा एक अविस्मरणीय अनुभव.

दुबईची क्विक व्हिसा प्रक्रिया

दुबईची व्हिसा प्रक्रिया अतिशय सोपी आणि पूर्णपणे ऑनलाईन आहे. सहलीचे बुकिंग करताना फोटो, पासपोर्ट आणि पॅन कार्ड आदी कागदपत्रे घेतले जातात. केसरीची एक्स्पर्ट व्हिसा टीम ही प्रक्रिया पूर्ण करते आणि तयार झालेला व्हिसा सहलीला निघताना एअरपोर्टला आपल्याला दिला जातो.

Tags