छोट्या ब्रेकची मोठ्ठी धम्माल!

“झेलम, मी फ्रेंच रिव्हेरा सहल बूक केली आहे, पण इतक्या दूर जातोय तर अजून एखादा देश या सहलीत पाहता आला तर बरं होईल,” आमच्यासोबत प्रवास करणाऱ्या पर्यटक विजयाताई सुरूशे म्हणाल्या. तर शशी एरंडे सरांचं म्हणणं असं की ” मी मात्र नेहमी केसरीच्या मोठ्या सहली करतो आणि परदेशात जायचे तर चांगले १५ दिवस तरी हवेत.” खरंच मंडळी, परदेशातल्या मोठ्या सहलींना पर्यटक खूप धम्माल करतात, कारण या सहलीत प्रत्येक दिवशी काही तरी नवनवीन, नयनरम्य, मनाला भावेल आणि शिकवेल अशा ठिकाणांना आपण भेट देतो असतो आणि सर्वोत्तम आयटीनरी ही तर केसरीची विशेषता आहेच. त्यामुळे प्रवासात किती वेळ लागतो, त्यात कुठल्या ठिकाणांना भेट द्यावी, ज्या ठिकाणी जातो तिथल्या रस्त्यांची आणि रहदारीची माहिती या सर्व गोष्टी संपूर्ण अभ्यास करून केसरी सगळ्या सहलींचे अगदी विचारपूर्वक आयोजन करत असते. बडी टूर बड़ा मजा अशा बऱ्याचशा परदेशातील मोठ्या सहली पर्यटकांच्या पसंतीस उतरतात. आईसलँड, साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ आफ्रिका विक्टोरीया फॉल्स, संपूर्ण युरोप, कॅनडा, अलास्का, सेंट्रल युरोप, स्कँडिनेव्हिया, रशिया, ऑस्ट्रेलिया न्यूझीलँड या सहलींचा समावेश आहे. या सर्व सहली लांब पल्ल्याच्या आणि जास्त दिवसांच्या आहेत, या सहली केल्या की जणू जग कवेत आल्यासारखे वाटते आणि म्हणून या सहली पर्यटकांच्या पसंतीच्या आहेत.

अशा लांब पल्ल्याच्या मोठ्या सहलींना जायचं तर बऱ्याच व्यावसायिक किंवा महत्त्वाच्या हुद्द्यांवर कार्यरत लोकांची मात्र पंचाईत होते. कारण आपल्या कामाच्या जबाबदारी व व्याप्यातून इतका वेळ काढणं त्यांना शक्य नसतं आणि म्हणून आमच्याकडे विचारणा होते की ४-५ दिवसांच्या छोट्या सहली आहेत का ? पूर्वी केसरीकडे किमान ८ दिवसांच्या सहली असायच्या. पर्यटकांची ही गरज ओळखत आम्ही छोट्या ४-५ दिवसांच्या सहली लाँग विकेंडला धरून सुरु केल्या आणि लक्षात आले की छोटा ब्रेक सहली पर्यटकांना खूप आवडू लागल्या आहेत. या छोट्या सहली आपोआप आमच्या नकळतच पर्यटकांसाठी छोटा ब्रेक बड़ा मजा बनल्या. यामध्ये सुवर्ण मंदिर, अमृतसर, अयोध्या, वाराणसी, लेह, उटी कोडाई, गोल्डन ट्रेंगल – दिल्ली आग्रा जयपूर, नेपाळ, वैष्णोदेवी, जैसलमेर-जोधपूर -बिकानेर, वृंदावन, म्हैसूर – बैंगलोर उटी, अष्टविनायक यात्रा, काश्मिर, इंदौर उज्जैन -मांडू, सिंगापूर, थायलँड, व्हिएतनाम अशा अनेक छोट्या सहली समाविष्ट आहेत.

आपल्या प्रचंड व्यस्त जीवनात अशी लॉन्ग विकेंडमध्ये एखादी छोटी सहल करता येणं हा अनुभव म्हणजे आयसिंग ऑन द केक. एक छोटा पण ताजेतवाने करून पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी घेतलेला ब्रेक म्हणा ना. अशा छोट्याखानी सहलींमध्येही आपण खूप काही पाहू आणि अनुभवू शकतो.

मोठी सहल करावी की ४-५ दिवसांची छोटी सहल करावी, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असेल. मात्र सोबत चांगली असेल तर प्रवास सुखाचा आणि आनंददायी होतो, हे नक्की. मग तो प्रवास आयुष्याचा असो वा जगाचा. खरं तर या जगात सर्वात सुंदर काय आहे ? असं विचारलं तर हे जग खूपच सुंदर आहे. चला तर मग आपणही फिरुया आणि घेऊया अविस्मरणीय अनुभव, फक्त केसरीसोबत!

केसरी अॅकॅडमी – पर्यटन क्षेत्रात सुवर्णसंधी!

मंडळी, केसरी अॅकॅडमी पुन्हा सुरु करत आहोत. जर आपल्या संपर्कातील कोणालाही पर्यटन क्षेत्रात व्यवसाय करायचा असेल तर अधिक माहितीसाठी आपण ७७९६००६५४५ या क्रमांकावर सोमवार ते शनिवार सकाळी ११ ते सायंकाळी ६ दरम्यान संपर्क साधू शकता.

Tags