दसरा, दिवाळी, ख्रिसमस कुठे जाऊयात फिरायला ?

“झेलम, दर दिवाळीत मी केसरीसोबत कुठे ना कुठे तरी फिरायला जाते. या वर्षी कुठे जायचं, हे समजत नाहीये. बहुदा सगळं पाहून झालंय. आता कुठे जाऊ सांगा ना?” आमच्या देसाई काकींचा हा प्रश्न आपल्यालाही पडला असेल तर या सणासुदीच्या काळात फिरण्यासाठी मी आपल्याला काही पर्यटनस्थळे सुचविते. 

केसरीच्या मारिगोल्ड सहलींमध्ये सहभागी होत आजतोवर लाखो भाविकांनी देशभरातील तीर्थक्षेत्रांची मंगलमय यात्रा केली आहे. यामध्ये चारधामची यात्रा तर भाविकांच्या विशेष आवडीची. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सुरु झालेल्या या यात्रेला आपल्याला भाऊबीजेपर्यंत जाता येते. आपल्याकडे स्टॅंडर्ड आणि प्रीमियम अशा दोन प्रकारच्या चारधाम यात्रा आहेत. त्रिस्थळ दर्शन म्हणजेच गया-प्रयागराज-वाराणसी आणि प्रभू श्री राम मंदिर पाहण्यासाठी अयोध्या अशा सहलीला आपण जाऊ शकता. केवळ अयोध्येची सहलसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. भगवान श्री कृष्णाच्या जन्मापासून निर्वाणापर्यंतचा जीवनप्रवास अनुभवण्यासाठी आपण श्रीकृष्ण चरित्र यात्रा करू शकता. अष्टविनायक यात्रा, ५ ज्योतिर्लिंग आणि शिर्डी या महाराष्ट्रातील सहली पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहेत. दक्षिण भारतातीत तीर्थक्षेत्रांच्या मदुराई – रामेश्वर – कन्याकुमारी,  साऊथ इंडिया टेम्पल टूर आणि पिठापूरम – कुरवपूर – श्रीशैल्यम अशा सहली हजारो पर्यटकांनी नावाजलेल्या आहेत. गुजरात मधील सौराष्ट्र स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि पश्चिम बंगाल मधील जगन्नाथ – पुरी – कोलकत्ता – गंगासागर किंवा मुक्तिनाथसह नेपाळ या सहली म्हणजे निसर्ग सौंदर्य आणि अध्यात्माचा सुंदर मिलापच जणू.

भव्य हिमालयीन पर्वत रांगांच्या कुशीत वसलेला निसर्गरम्य हिमाचल प्रदेश या काळात सुंदर रंगबेरंगी फुलांनी आणि फळांनी बहरून आला आहे. अशा वेळी भेट देणाऱ्या पर्यटकांना त्याचा मनमुराद आनंद लुटता येतो. या दरम्यान पर्यटक अमृतसर – धरमशाला – डलहौसी या सहलीला जातात किंवा फक्त अमृतसर पाहण्यासाठी एक छोटा ब्रेक घेतात. सफरचंदाच्या बागा, केशरची फुले, आणि स्वर्गसुंदर निसर्ग पाहण्यासाठी पर्यटक सप्टेंबर – ऑक्टोबरमध्ये केसरीसोबत काश्मीरमध्ये दाखल होतात तर फॉल कलर्स किंवा स्नो फॉल आपल्याला नोव्हेंबरमध्ये पाहता येतो. केरळ आणि राजस्थानमध्ये सप्टेंबरपासून पर्यटकांची लगबग सुरु होते. पधारो म्हारे देस म्हणत पर्यटकांचे स्वागत करणारे राजेशाही राजस्थान आपल्याला मेवाड आणि मारवाड अशा दोन विभागांमध्ये पाहता येतो. मेवाड म्हणजे जयपूर, उदयपूर आणि माऊंट अबू तर मारवाडमध्ये जैसलमेर, जोधपूर आणि बिकानेर हा प्रदेश येतो. शिवाय मेवाड-मारवाड अशी एकत्र सहलही करता येते. दिल्ली-आग्रा-जयपूर असा छोटा ब्रेक आपण घेऊ शकता. केरळ म्हणजे गॉड्स ओन कंट्री. सुंदर हिरवाई आणि त्याला बॅकवॉटरचा साज.  मुन्नार, कोचिन, थेकडी, पेरियार आणि त्रिवेंद्रम येथे केसरीच्या हनिमून टूर्स, सिनिअर्स स्पेशल तसेच खास महिलांसाठी माय फेअर लेडी टूर्सही आहेत. ऊटी – कोडाई – कोईम्बतूर आणि कोस्टल कर्नाटक या तर पर्यटकांनी नक्की कराव्यात अशा सहली आहेत.

नोव्हेंबर महिन्यात आपण रण उत्सवामध्ये सहभागी होत केसरीसोबत गुजरातही पाहता येतो. देशाच्या नॉर्थ ईस्ट भागातील रम्य प्रदेश पाहण्यासाठी अमेझिंग नॉर्थ ईस्ट विथ काझिरंगा नॅशनल पार्क, दार्जिलिंग – गॅंगटोक – पेलिंग किंवा फक्त दार्जिलिंग – गॅंगटोक या सहलींचा पर्यायही आपल्याकडे आहे. 

राजस्थान, साऊथ इंडिया, खास करून केरळ हा प्रांत एप्रिल-मे महिन्यांत अधिक गरम असतो. मात्र आपण ऑगस्टपासून पुढील मार्चपर्यंत इथे सहली सुरु असतात. आपण भारतीय लोक खरंच भाग्यवान आहोत. देवाच्या कृपेने आपल्याला खरोखरच सुजलाम सुफलाम प्रांत लाभला आहे. आपल्या देशात सर्व प्रकारचे अन्नधान्य, भाजीपाला आणि फळे तयार होतात. सूर्यप्रकाशही मोठ्या प्रमाणात आहे. नद्या, समुद्रकिनारे, सारे सारे इथे आहे. जेव्हा आपण परदेशात फिरतो तेव्हा आपल्या अतुल्य भारताचे महत्व लक्षात येते. कारण तिथे काही ठिकाणी काही वेळा अतिशय खडतर हवामान असते. युरोपवर वर्षातील ४-५ महिने बर्फाची चादर पसरलेली असते म्हणून बऱ्याच गोष्टीसाठी इथल्या देशांना इतरांवर अवलंबून राहावे लागते. तर मॉरिशससारखा सुंदर देश बटाटे, कांदे आणि टोमॅटोसाठी इतर देशांवर अवलंबून आहे. सिंगापूरसारखा संपन्न देश पिण्याच्या पाण्यासाठी मलेशियावर अवलंबून आहे. हे पाहिल्यावर प्रकर्षाने जाणवते की आपल्याकडील ही नैसर्गिक साधनसंपत्ती आपण जतन करायला हवी किंवा त्याची काळजी घ्यायला हवी.

आपल्या माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देशवासियांना देशात पर्यटन आणि डेस्टिनेशन वेडिंग्ज करण्याची हाक दिली आणि भारतीय पर्यटकांनी प्रचंड संख्येने देशात फिरायला सुरुवात केली. आपले देशांतर्गत पर्यटन वाढले आणि देशातील डेस्टीनेशन वेडिंग्जचे प्रमाणही वाढले. गेल्याच महिन्यांत केसरी अवेडिंग्सने गोव्यातील ५ लग्न कन्फर्म केली. 

केसरीचे बरेच पर्यटक एक डोमेस्टिक आणि एक इंटरनॅशनल, अशा वर्षातून दोन सहली करतात. तर अनेक सिनियर्स वर्षभरात ३ ते ४ सहलीही करतात. मंडळी, भारतासाठी आणि साऊथ ईस्ट एशियासाठी हा खरोखर एक उत्तम सिझन आहे. तेव्हा आता वाट बघू नका. लवकरच नजीकच्या केसरी कार्यालयाला भेट द्या. आपल्या आवडत्या सहलीचे बुकिंग करा आणि मिळवा एक अविस्मरणीय अनुभव फक्त केसरीसोबत!

एक अविस्मरणीय अनुभव फक्त केसरीसोबत!

Tags