आध्यात्मिकतेचा अक्षय्य आनंद!

अखंड, शाश्वत, पावन… हे आणि असे अनेक सुंदर शब्द आपल्या मनात येतात, जेव्हा अक्षय्य तृतीया या पवित्र सणाचा विचार करतो. नावातच अखंडतेचा अर्थ सामावलेला, साडेतीन मुहूतांपैकी एक आणि नुकत्याच साजऱ्या झालेल्या अक्षय्य तृतीयेनिमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा !

हिंदू संस्कृतीमध्ये मुहूर्ताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हिमालयाच्या सानिध्यात वसलेल्या चार धामांची कपाट खुली होत आहेत. या दिवशी केलेलं शुभकार्य, दान, जप, तप किंवा पूजन अत्यंत फलदायी ठरतं, अशी दृढ श्रद्धा आहे. सणांच्या निमित्ताने आप्तस्वकीय आणि प्रियजन एकत्र येतात. नात्यांमधील जिव्हाळा, प्रेम, आपुलकी आणि कृतज्ञतेची भावना अधिक जागृत होते – हीच आपल्या सणांची खरी शिकवण आहे. आपल्या पूर्वजांचा हा वारसा आजच्या आधुनिक युगातही जपला जात आहे. कोव्हीड काळात या सणांचं आणि प्रत्यक्ष भेटीचं महत्त्व अजूनच जाणवलं. व्हिडीओ कॉल्स, फोनवरून संवाद सुरू होता, पण प्रत्यक्ष भेटीतून मिळणारा आत्मिक आनंद… जो अक्षय्य होता, आहे आणि राहील.

आपल्या पूर्वजांनी निसर्ग, ऋतूचक्र, आकाशगंगा यांचा अभ्यास करून तीर्थस्थळे उभारली, सणांचे कालखंड ठरवले आणि तीर्थयात्रा सुरू झाल्या. हा विषय अत्यंत रोचक आहे. आपल्या कालगणनेत सूर्याच्या उत्तरायण दक्षिणायन प्रवासाला महत्त्व आहे. या प्रवासानुसार ऋतू बदलतात आणि प्रवासास अनुकूल हवामान ठरते. पूर्वजांची ही दूरदृष्टी आणि नियोजन पाहता, त्यांना नतमस्तक व्हावंसं वाटतं. विशेषतः उत्तर भारतातील हिमालयीन भागात वसलेली चारधाम – केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री. जी आत्मिक समाधान देणारी, प्रवासाचा आणि निसर्गाचा अक्षय्य आनंद देणारी असून ही भाविकांसाठी अपूर्व अनुभूती ठरते. यासोबतच हरिद्वारची गंगा आरती, हरी की पौडी, लक्ष्मण झूला, गीता भवन आणि काली कमलीवाला आश्रम यांसारखी अनेक स्थळंही भाविकांसाठी आकर्षण ठरतात. आद्य शंकराचार्यांनी भारताच्या चार दिशांना स्थापन केलेली चारधामं बद्रीनाथ, रामेश्वरम, जगन्नाथपुरी आणि द्वारका ज्यांचं दर्शन पारंपरिक चारधाम यात्रांमध्ये करता येतं. या यात्रांचं नियोजन सहसा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये केलं जातं. यात्रेतील प्रवास सुखकर व्हावा यासाठी केसरीने सहा वेळा विमानप्रवासाची सुविधा उपलब्ध केली आहे.

अमरनाथ यात्रा, कैलास मानसरोवर यात्रेसह इतरही अनेक धार्मिक स्थळांचं दर्शन यात्रांमध्ये अनुभवता येतं. ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दक्षिणायन दरम्यान भक्तांची पावलं दक्षिणेतील तीर्थस्थानांकडे वळतात. शिवाय या दरम्यान श्रावण मासाचा प्रारंभ होत असल्याने वातावरणात एक नवचैतन्य, निसर्गाचा बहर आणि नवी स्फूर्ती जाणवते. जी तीर्थस्थळांची भेट अजूनच आल्हाददायी बनवते. पूर्व, पश्चिम व दक्षिण या दिशांमध्ये सुरू होणाऱ्या भारतातील यात्रा भाविकांसाठी आत्मिक उन्नतीचं माध्यम ठरतात. डोंगरदऱ्या, मंदिरं, द्रविड वास्तुकला, संगीत आणि शिल्पकलेचा संगम हे सर्व मिळून एक आगळीवेगळी अनुभूती देतात. हे सगळं केसरीच्या मारीगोल्ड या तीर्थक्षेत्रांच्या मंगलमय यात्रांच्या माध्यमातून अनुभवायला मिळतं. यात केसरीचे अनुभवी टूर लीडर्स म्हणजे आधुनिक श्रावण बाळ साथ देतात.

प्रवास कुठलाही असो अंटार्क्टिकाचा बर्फाळ स्पर्श, अबूधाबीच्या वाळवंटातील शांतता, स्कँडिनेव्हियाच्या न मावळणाऱ्या सूर्याची जादू, बद्रीनाथच्या तेजस्वी सूर्योदयाची ऊब आणि अंदमानच्या सागरावर मावळणारा सोनेरी सूर्यास्त … निसर्गाच्या या अनमोल भेटी आजही मनाला प्रसन्न करतात. प्रत्येक प्रवासाने दिलेले हे क्षण माझ्या मनात कायमचे घर करून आहेत. जे अक्षय्य आनंद देत असतात. प्रवासाची अशीच आनंदयात्रा आपल्या सर्वांच्या आयुष्यातही अखंड सुरू राहो, प्रत्येक क्षण समाधानाने आणि प्रेमाने भरून जावो, हीच आपणा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा !

या आव्हानात्मक यात्रा सहज पार पाडण्यासाठी शारीरिक आणि मानसिक समतोलांची साथ हवी. यात्रेपूर्वी दोन ते तीन महिने आधी ट्रेकिंग बुट घालून रोज कमीत कमी चार ते पाच किलोमीटर चालण्याचा सराव करावा. या यात्रा उंच पर्वतीय भागात आहेत. त्यामुळे श्वसनाचा त्रास होऊ नये म्हणून रोज प्राणायाम आणि योगाचा सराव करावा. अमरनाथ – या यात्रेसाठी 13 ते 70 वर्षे वयोमर्यादा असून सरकारी डॉक्टरांकडून वैद्यकीय सुदृढतेचे प्रमाणपत्र अनिवार्य.

कैलास मानसरोवर – परिक्रमेसाठी 18 ते 65 वर्षे वयोमर्यादा आणि यात्रेसाठी 18 ते 70 वर्षे वयोमर्यादा. चारधाम – या यात्रेसाठी वयोमर्यादा नाही. हे ठिकाण उंच पर्वतीय भागात असल्याने ज्येष्ठ नागरिक किंवा लहान मुलांना हा प्रवास आव्हानात्मक ठरू शकतो. यात्रेकरूंनी registrationandtouristcare.uk.gov.in या लिंकद्वारे रेजिस्ट्रेशन करावे.

Tags