युरोप २०२४-२५ फक्त केसरीसोबत !

“झेलमताई, युरोप सहल इतकी छान झाली की विचारूच नका. हवा तसा युरोप पाहता आला. स्वादिष्ट भोजन, सर्वोत्तम हॉटेल, कुठे कुठेही नाव ठेवायला जागा नाही आणि आपला टूर लीडर सुदर्शन म्हणजे सुद्धा एकदम छान व्यक्तिमत्व. आता आमचं ठरलं, सर्व सहली केसरीसोबतच करायच्या“, नुकतेच युरोप सहलीवरून परतलेले आमचे एक तरुण पर्यटक क्षितिज तायडेसर यांची ही बोलकी प्रतिक्रिया. 

३० वर्षे सातत्याने युरोपवारी करतोय, युरोप सहलीचा पूर्ण पॅटर्न बदलण्याचं क्रेडिट केसरी घेऊ शकतं. ज्या जमान्यात यूरोप सहलीत फक्त सकाळचा नाश्ता व रात्रीचे जेवणच असायचे, त्यावेळी आम्ही दुपारचं जेवण सुरु केलं. अनेक ऑप्शनल पर्यटनस्थळांसाठी युरोप सहलींमध्ये पर्यटकांना जास्त पैसे भरावे लागत होते, तिथे आम्ही पाहायलाच हवी ती सर्व पर्यटनस्थळे सामाविष्ट केली, त्यामुळे पर्यटकांचे पैसे तर वाचलेच आणि पर्यटक नवनवीन पर्यटन स्थळांना भेटी देऊ शकले आणि युरोपचा जास्तीत जास्त अनुभव घेता आला.

आता युरोप सहल सेट असली तरी पर्यटन क्षेत्रातील आव्हाने थोडीशी जिकरीची झाली आहेत. एअरलाईन्स, व्हिसा मिळवणं सोपं राहिलं नाही. तरीही आमच्या गेल्या वर्षीच्या युरोप सहली जवळजवळ ९९ टक्के यशस्वी ठरल्या. जे प्रॉमिस केलं ते देऊ शकलो, याचा आनंद आहे. खरं तर युरोपमध्ये एकट्याने फिरणं आता सुरक्षित राहिलं नाही. पर्यटकांपासून अगदी ऑलिम्पिक खेळाडूंपर्यंत कोणीही यातून सुटले नाहीत. अलीकडच्या काळात जगात कुठेही फिरायला गेलो, एकटं असो वा ग्रुपने, स्वतःची काळजी घ्यावीच लागते. केसरीच्या सहलीसोबत टूर लिडर असल्यामुळे वेळीच महत्वाच्या सर्व सूचना दिल्या जातात आणि त्याचा खूप फायदा होतो.

युरोप सहलीसाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे व्हिसा. हा व्हिसा सहलीपूर्वी वेळेत येण्यासाठी थोडे नियोजन करणं गरजेचं आहे. युरोप सहलीसाठी अर्ली बर्ड बुकींग करणाऱ्यांना सवलतीच्या किंमतीत सहल मिळते. पुढच्या वर्षी युरोपवारी करण्यासाठी आताच तयारी सुरु करा. कोणत्या महिन्यात युरोपला जायचं, हे बुकींगपूर्वीच ठरवा. मार्च-एप्रिल-मे महिन्यांत ट्युलिप्स गार्डनला भेट देता येते. कमी थंडीचा युरोप हवा तर मे-जून-जुलैमध्ये आणि कमी गर्दीच्या युरोपसाठी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जाता येतं तसंच कमी किंमतीतला आणि थोडासा बर्फाच्छादित युरोप पाहायचा तर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये जाता येतं.

उत्तम हॉटेल्स, उत्कृष्ट जेवणासह केसरीच्या युरोप सहलीमध्ये पाहायलाच हवी ती सर्व पर्यटनस्थळे सामाविष्ट आहेत. काही सहलींमध्ये निसर्गरम्य एंगलबर्ग शहरामध्ये वास्तव्य आहे. मोठ्या संख्येने पर्यटक केसरीसोबत प्रवास करत असल्याने हे सारं सामाविष्ट करणं आम्हाला शक्य होतं. ऑल इन्क्ल्युसिव्ह सहलीमुळे सगळी महत्त्वाची पर्यटनस्थळे अगदी वाजवी किंमतीत मिळतात आणि पर्यटकांना फायदा होतो.

पहिल्या युरोप सहलीत वेस्टर्न युरोपमधील इटली, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, नेदरलँड, जर्मनी, फ्रांस, युनायटेड किंग्डम हे देश पाहता येतात. नॉर्दन युरोपमधील स्कँडिनेव्हियन देश म्हणजे स्वीडन, नॉर्वे, फिनलँड आणि डेन्मार्क हे देश बघायलाच हवे. सेंट्रल युरोप म्हणजे हंगेरी, लायचेनस्टाईन, पोलंड, स्लोवाकिया आणि स्लोवेनिया हे छोटे पण अतिशय सुंदर देश युरोपिअन संस्कृतीचे दर्शन घडवतात. मोनॅको, मॉन्ट कार्लो, सेट ट्रोपेज सामाविष्ट असलेला फ्रेंच रिव्हेरा या निसर्गरम्य भागातील लॅव्हेंडर फुलांच्या बागा बघण्याचा आनंद काही औरच. इतर देशांपेक्षा अतिशय वेगळा ग्रीस आणि आशिया खंडाचा प्रभाव असलेला टर्की, असं युरोप आणि एशिया एकत्र पाहण्याचं समाधान आपल्याला युरोशियामध्ये मिळतं. युरोपातील अजून एक जगावेगळा देश म्हणजे आईसलँड. झाडी अजिबात नाही, काळे समुद्रकिनारे, ज्वालामुखीय उद्रेकाच्या चहुबाजूला खुणा, गरम पाण्याचे झरे, धबधबे, दूर वर पसरलेले ग्लेशिअर्स आणि अतिसुंदर नॉर्दन लाईट्स अशा साऱ्या अद्भुत गोष्टी या देशात आहे.

एखाद्या परिकथेप्रमाणे भासणाऱ्या युरोपचा प्रवास हे जगभरातील प्रत्येक पर्यटकाचं स्वप्न. इथले प्रशस्त रस्ते व भव्य महलांतून युरोपचा समृद्ध इतिहास तसेच वैभवसंपन्न संस्कृती आणि परंपरांचं दर्शन घडतं. बॉलिवूडला प्रेमात पाडणारं स्वित्झर्लंड तर सर्वश्रुत आहे. जगप्रसिद्ध आयफेल टॉवरच्या टॉप लेव्हल वरून पॅरिस शहराचं विहंगम दृश्य पाहता येते. लंडन म्हटलं की लंडन आय, मादाम तुसॉ संग्रहालय, कोहिनूर हिरा, आदी पाहायलाच हवं आणि युरोस्टारचा प्रवास हा तर करायलाच हवा.

प्रत्येक वयोगटातील पर्यटकांना डिस्नेलँडमध्ये धम्माल करण्याची संधी युरोपच्या सहलीत मिळते. अप्रतिम निसर्गसौंदर्य अनुभवत वेगवान युरोस्टारने केलेला लंडन ते पॅरिसचा प्रवास आपल्याला भारावतो आणि वेळ वाचवतो. टॉप ऑफ द युरोप युंगफ्रोच्या केबल कार प्रवासात सुंदर निसर्गरम्य परिसराचं दर्शन घडतं. जगातील पहिल्या फिरत्या केबल कारने प्रवास करत स्विस आल्प्समधील माऊंट टिटलिसला भेट देता येते. फ्लॅम ते मर्डलचा अल्पाईन ट्रेनचा आलिशान प्रवास पर्यटकांच्या कायम स्मृतीत राहतो.

अद्भुत नैसर्गिक आश्चर्य नॉर्दन लाईट्सचा नयनरम्य नजारा डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान पर्यटकांना नॉर्थ ऑफ नॉर्वेमधून पाहता येतो. नॉर्वेतील संपूर्णपणे शुभ्र बर्फाने तयार केलेल्या जगातल्या पहिल्या अद्भुत आईस हॉटेलमध्ये राहण्याचा अनुभव अतिशय अनोखा असतो. होल्मेनकोलबक्कन ही जगातील सर्वोत्तम स्की जंप नॉर्वेमध्ये आहे. वयाच्या ३-४ वर्षांपासून इथली मुलं सराव करतात, त्यामुळेच इथले लोक जगातील बेस्ट स्की जंपर आहेत. तर जूनमध्ये येथे मिडनाईट सन पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. न मावळणाऱ्या सूर्याच्या लख्ख प्रकाशात इथले लोक मध्यरात्री गोल्फ खेळताना दिसतात. इथले फियॉर्डसही प्रसिद्ध आहेत.

डिसेंबरमध्ये आकर्षक रोषणाईने सजलेले ख्रिसमस मार्केट आणि चहूकडे पसरलेले बर्फाच्छादित डोंगर आपल्याला एका वेगळ्याच विश्वात नेतात. एल्व्हज व्हिलेज किंवा सॅन्टाक्लॉज व्हिलेजला ख्रिसमसमध्ये फिरताना अगांवर आनंदाने रोमांच आला नाही तर नवलच..!

युरोपच्या प्रत्येक पर्यटन स्थळाला भेट दिल्यावर आपण मंत्रमुग्ध होतोच! नैसर्गिक चमत्कार आणि मानवनिर्मित अविष्काराचा हा खजिना लुटायचा तर युरोपला जायलाच हवं. तर मंडळी निर्धास्तपणे आपल्या आवडीची युरोप सहल निवडा आणि आपणही घ्या युरोपचा एक अविस्मरणीय अनुभव! सहल उत्तम होणार याची खात्री.

Tags