बकेट लिस्टमधलं ड्रीम डेस्टिनेशन युरोप

कधी काळी भारतासह अनेक देशांवर राज्य करणारा युरोप आज जगभरातील पर्यटकांसाठी ड्रीम डेस्टिनेशन बनला आहे. व्हिसा प्रक्रिया सोपी झाल्याने दरवर्षी लाखो पर्यटक युरोपला भेट देत आहेत. मात्र, युरोपला भेट देण्यापूर्वी हा सुंदर खंड का आणि कसा पाहावा हे समजून घेणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून प्रत्येक भेटीत नवे आणि अद्भुत अनुभव मिळतील.

युरोप हा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात वसलेला, चोहोबाजूंनी समुद्रांनी वेढलेला एक अद्वितीय खंड आहे. उत्तरेला आर्क्टिक महासागर, पश्चिमेला अटलांटिक महासागर, दक्षिणेला मेडिटेरियन समुद्र, तर पूर्वेला आशियाच्या सीमा आहेत. जगाच्या एकूण भूभागाच्या केवळ २% क्षेत्रफळ व्यापणारा युरोप आकाराने दुसऱ्या क्रमांकाचा लहान खंड असला तरी त्याचा ऐतिहासिक वारसा आणि वैविध्यपूर्ण संस्कृती जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. रशिया हा युरोपातील सर्वात मोठा देश असून, युरोपच्या एकूण भूभागाचा ३९% भाग व्यापतो. बाकी देश तुलनेने लहान असले तरी त्यांच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे युरोपाला अनोखा दर्जा प्राप्त झाला आहे.

रोम ते लंडन म्हणजे इटली, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, नेदर्लंड्स, जर्मनी, फ्रांस, युनायटेड किंग्डम हे ऐतिहासिक शहरे असलेले वेस्टर्न युरोपमधील देश पाहायलाच हवे. तसेच नॉर्दन युरोपमधील स्कँडिनेव्हिया, स्वीडन, जर्मनी, नॉर्वे, स्विडन, फिनलँड हे अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलेले देश बघायलाच हवे. सेंट्रल युरोपमध्ये हंगेरी, लायचेनस्टाईन, पोलंड, स्लोवाकिया आणि स्लोवेनिया हे देश पाहता येतात. फ्रेंच रिव्हेरा हा युरोपातील निसर्गरम्य भूभाग आहे. युरोप मधील इतर देशांपेक्षा अतिशय वेगळा युरोपिअन देश म्हणजे आईसलँड. ग्रीस आणि आशिया खंडाचा प्रभाव असलेला युरोपियन देश टर्की. तर इथला प्राचीन इतिहास आणि आशियाई प्रभाव असलेली वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं पाहायला हवीत. 

व्हेनिसच्या कालव्यांमधील गंडोलाची सफर, आयफेल टॉवरच्या शिखरावरून पॅरिसचे विहंगम दृश्य, किंवा स्विस आल्प्सच्या पर्वतरांगांतील केबल कार प्रवास यांसारखे अनुभव पर्यटकांच्या मनावर अमिट छाप सोडतात. मार्च-एप्रिल-मेच्या हंगामात कुकेनहॉपच्या रंगीत ट्युलिप्स गार्डनला भेट देणं, तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये गर्दीमुक्त युरोप पाहणं हा अनोखा अनुभव असतो.

खरं तर युरोप प्रवास हे जगभरातील प्रत्येक पर्यटकाचं स्वप्न. इथल्या राजा-राणीचं आयुष्य हे बालपणीच्या एखाद्या परिकथेप्रमाणे भासतं. इथले प्रशस्त रस्ते आणि भव्य महलांतून युरोपचा समृद्ध इतिहास, वैभवसंपन्न संस्कृती आणि परंपरांचं दर्शन घडतं. व्हेनिसच्या कालव्यांमधील गंडोलाची सफर असो, आयफेल टॉवरच्या शिखरावरून पॅरिसचे विहंगम दृश्य असो, किंवा स्विस आल्प्सच्या पर्वतरांगांतील केबल कार प्रवास असो युरोपच्या प्रत्येक पर्यटन स्थळाला भेट दिल्यावर आपण मंत्रमुग्ध होणारच! मार्च-एप्रिल-मेच्या हंगामात कुकेनहॉपच्या जगातील सर्वात मोठे ट्युलिप्स ट्युलिप्स गार्डनला भेट देणं, तर मे-जून-जुलैमध्ये कमी थंडीचा युरोप आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कमी गर्दीचा युरोप पाहणं हा अनोखा अनुभव असतो. लंडन भेटीमध्ये लंडन आय, मादाम तुसॉ संग्रहालय, कोहिनूर हिरा, आदी गोष्टी पाहायलाच हवं आणि युरोस्टारचा प्रवासही करायलाच हवा.

प्रत्येक वयोगटातील पर्यटकांना युरोप खुणावतं. डिस्नेलँडच्या जादुई दुनियेत आपल्या आवडत्या कार्टून भूमिकांना भेटण्याची आणि धम्माल करण्याची संधी आपल्याला मिळते. निसर्गसौंदर्य अनुभवत वेगवान युरोस्टारने केलेला लंडन ते पॅरिसचा प्रवास वेळेची बचत करतोच आणि आपल्याला भारावतो. टॉप ऑफ द युरोप युंगफ्रोच्या केबल कार प्रवासात निसर्गरम्य परिसराचं दर्शन घडतं. जगातील पहिल्या फिरत्या केबल कारने प्रवास करत स्विस आल्प्समधील माऊंट टिटलिसला भेट देता येते. फ्लॅम ते मर्डल दरम्यानचा अल्पाईन ट्रेनचा आलिशान प्रवासही पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. अद्भुत नैसर्गिक आश्चर्य नॉर्दन लाईट्सचा नयनरम्य नजारा डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान पर्यटकांना आईसलँड, स्वीडन, स्कँडिनेव्हियामध्ये पाहता येतो. नॉर्वेच्या उत्तरेकडील जंगलात किरूना परिसरातून नॉर्दन लाईट्स ( अरोरा बोरालेस) हा अचंबित करणारा निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळणं हे भाग्यच, नाही का ? याच परिसरातील जगातल्या पहिल्या संपूर्णपणे शुभ्र बर्फाने तयार केलेल्या अद्भुत आईस हॉटेलमध्ये राहण्याचा अनोखा अनुभव आपल्याला घेता येतो. तर जूनमध्ये मिडनाईट सन पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. सूर्य न मावळणाऱ्या या प्रदेशातील लोक मध्यरात्री लख्ख प्रकाशात गोल्फ खेळताना दिसतात. फ्रेंच रिव्हेरा सहलीत लॅव्हेंडर फुलांच्या बागा बघणं म्हणजे काही औरच आनंद. आणि हो, युरोपात असाही एक देश आहे, जो चुकून युरोपात आला आहे असं वाटावं. लँड ऑफ आईस अँड फायर म्हणजेच आईसलँड हा जगावेगळा देश. झाडी अजिबात नाही, काळ्या दगडांचे समुद्रकिनारे, ज्वालामुखीय उद्रेकाच्या चहुबाजूला खुणा, फेसाळत कोसळणारे धबधबे, दूर वर पसरलेले शुभ्र ग्लेशिअर्स सारं काही या देशात आहे. हा नैसर्गिक चमत्काराचा आणि मानवनिर्मित अविष्काराचा हा खजिना लुटायचा तर युरोपला जायलाच हवं.

पर्यटक युरोप सहलीला खासकरून डिसेंबरमध्ये मोठ्या संख्येने जातात. आकर्षक रोषणाईने सजलेले ख्रिसमस मार्केट आणि चहूकडे पसरलेले बर्फाच्छादित डोंगर आपल्याला एका वेगळ्याच विश्वात नेतात. एल्व्हज व्हिलेज किंवा सॅटा क्लॉज व्हिलेजला ख्रिसमसमध्ये फिरताना अगांवर आनंदाने रोमांच आला नाही तर नवलच..! तर आपणही अनुभवा युरोपचा एक अविस्मरणीय अनुभव!

Tags