“झेलम, पर्यटनाचा ट्रेंड नेहमीच बदलत असतो, नाही का? मला काय वाटतं, आता कुठे तरी वेगळ्याच ठिकाणी फिरायला गेलं पाहिजे, तू काही तरी सुचव ना?” आणि हो, प्रवास उत्तम कसा करावा ? किंवा ज्या ठिकाणी जायचे आहे तिथे काय काय बघायलाच हवे ? नेमके कोणते पदार्थ नक्की चाखले पाहिजेत ? कुठे आणि काय खरेदी करायला हवे? त्या ठिकाणासोबत कोणते जवळचे कुठले ठिकाण बघता येईल ? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा प्रवास केव्हा आणि कसा केला म्हणजे वेळ व पैशाची बचत होईल? कोणते हॉटेल निवडावे? कोणती पर्यटन स्थळे नक्की पहायला हवी? असे एक ना अनेक सल्ले, पर्यटन स्थळांची आणि इतर माहिती मी माझ्या मित्रपरिवाराला देत असते. आणि मला खात्री असते की तिथे जाऊन आल्यानंतर मला त्यांचा हमखास फोन येणार “टूर छान झाली. तुझ्या छोट्या छोट्या टिप्सचा फायदा झाला.” मंडळी, नवीन काहीतरी सुचवणं हे आमचे कामच आहे आणि प्रत्येकाच्या आवडीनुसार, लाईफस्टाईलनुसार सुचवायला आम्हालाही हुरूप येतो आणि पर्यटक जेव्हा आमच्या सल्ल्यानुसार प्रवास करून आनंदी होतात, ते समाधान काही वेगळेच असते.
पर्यटनाचा ट्रेंड बदलला आहे का? तर मंडळी, होय, पर्यटनाचा ट्रेंड आमुलाग्र बदलला आहे. आज पर्यटकांना वाटतंय की एकदा चाललोय तर सगळेच बघून यायला हवे, सोबत काहीतरी अनोखा अनुभव घ्यावा. नॉर्दन लाईट्स बघायला जाताना इग्लूमध्ये राहायला मिळाले तर सोने पे सुहागा, जपानला जातोच आहोत तर चेरी ब्लॉसम किंवा आशिकागा फ्लॉवर फेस्टिवल बघता आला तर आयुष्यभराचा आनंदाचा ठेवा जपावा तसा आपण मनात आणि फोटोत जपतो. साऊथ अमेरिकेला जाताना वर्षभर ज्याची तयारी केली जाते तो रिओ कार्निव्हल पाहणे, ते सुद्धा प्रिमियम सिट्स वरून, हे क्षण आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाहीत. तर त्या क्षणाचा आनंद वेळीच घ्यायचा आणि तो क्षण हृदयात साठवायचा, ती साठवण खूप महत्वाची असते. टर्कीला चाललाय तर हॉट एअर बलूनची राईड मिस करून कसे चालेल? ऑस्ट्रेलियन वेल्व्ह अपोस्टलची एअर राईड नक्कीच करावी.
आईसलँडला जाऊन रात्रीचे सुंदर लाईट्स ( अरोरा बोरालेस) हा अचंबित करणारा निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळणे हे भाग्यच, नाही का ? ख्रिसमस मार्केट आणि चहूकडे पसरलेले बर्फाच्छादित डोंगर आपल्याला एका वेगळ्याच विश्वात नेतात, जे कदाचित आपण पुन्हा अनुभवू शकणार नाही. परंतु प्रत्यक्षात हा एक अविस्मरणीय अनुभवच जणू !
एल्व्हज व्हिलेज किंवा सॅटाक्लॉज व्हिलेजला ख्रिसमसमध्ये फिरताना अगांवर रोमांच आला नाही तर नवलच..! फ्रेंच रिव्हेरा टूरवर असताना पर्यटकांना जेव्हा लॅव्हेंडर फिल्ड्स बघता येतात तेव्हाचा आनंद काही औरच असतो. अलीकडे अनेक पर्यटकांना असे अनुभव सजवायला व गोळा करायला आवडू लागले आहेत.
आता पर्यटकांना जग भ्रमंतीची ओढ लागली आहे. पूर्वी वर्षभरातून एकदा प्रवास करणारी मंडळी आज दोन तीन परदेशवाऱ्या करत आहेत. काही पर्यटक एकाच वेळी एका डेस्टिनेशनचा पुरेपूर आनंद घेण्याचा प्रयत्न करताहेत. आम्हीही त्यांना यातून अविस्मरणीय अनुभव देण्याचा प्रयत्न करतो. मंडळी, पर्यटनाचा पर्यायाने प्रवासाचा चांगल्यासाठीच बदल होतोय आणि आमच्या सहलींद्वारे उत्तमोत्तम अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
तर मंडळी, प्रवास करताय ना ? करायलाच हवा. कारण प्रवास सुंदर आहे.
पर्यटकांसाठी महत्त्वाची टीप
आपण कोणताही व्हिसा जर स्वतः करत असाल तर आमचा सल्ला नक्की घ्या. व्हिसा मिळण्याआधी तिकीट विकत घ्यायचे असेल तर रिफंडबल तिकीट विकत घ्या. जेणे करून व्हिसा उशीरा आला किंवा रिजेक्ट झाला तर तिकिटाचे नुकसान होणार नाही.