केसरीच्या देशविदेशातील जानेवारी ते मार्च टूर्स म्हणजे गर्दी कमी, किंमत कमी आणि भरपूर आनंदाची हमी!
जॉयफुल जानेवारी, फॅन्टास्टिक फेबु्रवारी आणि मॅजिकल मार्च... याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे केसरीच्या जानेवारी ते मार्च दरम्यानच्या देश-विदेशातील टूर्स! मंडळी, हे वर्ष संपायला अवघा आठवडा राहिला आहे. हे वर्ष संपण्यापूर्वी स्वित्झर्लंडमधील निसर्गरम्य एंगलबर्गमधील वास्तव्यासह आमच्या युरोप टूर्सचं बुकिंग करा. केसरीच्या विविध ऑफर्स आणि डिस्काऊंट्सचा लाभ घ्या आणि आपलं युरोप पाहण्याचं स्वप्न पूर्ण करा. हे वर्ष कसं गेलं? याचा विचार करतानाच येणारं वर्ष आणखी चांगलं कसं घालवता येईल, याचा अनेक जण विचार करतात. त्यातून निर्माण होतात अनेक संकल्प. एकदा का संकल्प केला की, त्याच्या पूर्ततेसाठी आपण झटून कामाला लागतो. आपल्या पर्यटन संकल्प पूर्ण करण्यासाठी केसरी सदैव तत्पर आहे. बेस्ट सीझन आणि बेस्ट बजेट डिल्सचे अप्रतिम कॉम्बिनेशन असणार्या जानेवारी ते मार्च दरम्यानच्या धम्माल टूर्ससह केलेलं वर्षाच्या सुरुवातीचं पर्यटन हा वर्षभरासाठी आनंदाचा बूस्टरच ठरतो.
जानेवारी ते मार्च दरम्यानचा सीझन हा आल्हाददायक वातावरण, गुलाबी थंडी, फुलांचा बहर, कमी गर्दी आणि निवांत स्थळदर्शनाचा सुरेख संगम असतो. हिरव्या वनराईच्या कोंदणातील हिमाचल, बर्फमयी काश्मीर, निसर्गाचा सौंदर्याविष्कार लाभलेले शिमला, मनाली, साऊथ ईस्ट एशियातील कला-तंत्रज्ञानाचा आविष्कार, क्रूझचा प्रवास, दुबईची धम्माल शॉपिंग या सगळ्याचा निखळ आनंद जानेवारी ते मार्च दरम्यानच्या सहलींमध्ये अनुभवता येतो.
लागोपाठ सुट्ट्या असल्याने फेस्टीव्ह सीझनमध्ये पर्यटनस्थळांना पर्यटकांची मोठी गर्दी असते. हॉटेल्स आणि विमानप्रवासाचे दरही जरा चढेच असतात. पण पर्यटन स्थळांवरील पर्यटकांची ही गर्दी ओसरली की कमी गर्दीचा, कमी किमतीचा आणि भरपूर आनंदाची हमी असलेला जानेवारी ते मार्चमधील टूर्सचा सिझन सुरु होतो. या दरम्यान देशविदेशातील टूर्स ‘गॅरेंटिड लो प्राईस’मध्ये उपलब्ध असल्या तरी केसरीची दर्जेदार आणि आपुलकीची सेवा मात्र कायम आहे.
मेस्मरायझिंग काश्मीर
पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून आपल्या काश्मीरचा गौरव केला जातो. हिमालय आणि पिरपांजाल पर्वताच्या बर्फाच्छादित रांगा, या डोंगरांना लाभलेली हिरवाईची मोहक महिरप, गुलाबांपासुन ते ट्युलिपपर्यंत सुंदर सुंदर फुलांमधुन हसणारा निसर्ग, विस्तिर्ण जलाशय, प्रतिकुल परीस्थितीशी सामना करतानाही चेहर्यावरील स्मित न हरवलेले स्थानिक हे सगळे नेहमीच खुशामदीद – वेलकम म्हणून पर्यटकांचे काश्मीरमध्ये स्वागत करत असतात.
बर्फाच्छादित डोंगर, उंच उंच झाडे आणि अप्रतिम निसर्गासह स्वप्नातही रंगवता येणार नाही असे सुंदर स्वर्गिय निसर्गसौंदर्य लाभलेले ठिकाण म्हणजे गुलमर्ग. बर्फाचे मुकूट मिरवणारे पर्वत, हिरवीगार कुरणे, सूचिपर्णी वृक्षांची दाटी आणि खळाळत वाहणारी नदी हे सारं लाभलेलं पहलगाम पाहून आपल्या मनात नकळत अप्रतिम हेच शब्द उमटतात. या गावापासुन अमरनाथ यात्रेचा प्रवास सुरु होतो, यात्रा मार्गावरले पहिले गाव म्हणून याचे नाव पहलगाम.
सभोवती बर्फाच्या भव्य पहाडी आणि त्यात ऐकु येणारी खामोशी असं वर्णन केलं जातं ते सोनमर्ग म्हणजे सोन्याचे कुरण. काश्मिर भटकंतीत पर्यटकांना सर्वात जास्त आवडलेलं ठिकाण कोणतं तर ते हेच. ये वादी-ए-कश्मीर है जन्नत का नज़ारा’ हे प्रत्यक्षात अनुभवता येतं ये हाऊबोटमधील राजेशाही निवासात. कोरीवकाम केलेल्या आरामदायी, प्रशस्त हाऊसबोटमध्ये राजेशाही पाहुणचार म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव.
हेवनली हिमाचल
देवराज इंद्राच्या अंगठीतला, शुभ्र लखलखता हिरा… हिमाचल! पाचूसारख्या हिरव्या वनराईच्या कोंदणातल्या हिमाच्छादित शिखरांचा… हिमाचल! नितळ नद्यातला, निळ्या आभाळाच्या प्रतिबिंबांचा…हिमाचल! हा हिरा जवळून, निरखून पाहण्याचा तर केसरीबरोबर या सिझनमध्ये हिमाचलच्या सहलींना जायला हवं!
अनुपम निसर्गसौंदर्याचं वरदान जसं लाभलेल्या मॅजिकल मनालीला पुराणकथांचं गूढ रम्य वलयही लाभलेलं आहे. एकीकडे खळाळत वाहाणारी प्रसन्न बियास नदी आणि दुसरीकडे बर्फाच्छादित पर्वत म्हणजे मनालीची खासियत. सात हजार फूटांवर वसलेलं शांत निवांत शिमला हे ब्रिटीश राजवटीत भारताची उन्हाळी राजधानी होतं. आजही शिमल्याच्या रस्त्यांवर फिरताना ब्रिटीशकालीन खूणा नजरेस पडतात. हिमाचलमधील डलहौसी हे सुंदर ठिकाण धौलदार पर्वतरांगेत पाच टेकड्यांव मिळून वसलेलं आहे. या राज्यातील चम्बा या शहराला तिथल्या चम्पावती देवीवरून चम्बा हे नाव मिळाले आहे. इथले लक्ष्मी नारायणाचे मंदिर पाहाण्यासारखे आहे.
रंगीलो राजस्थान
निसर्गाचे रंगीबेरंगी रंग दाखविणाऱ्या राजस्थानमध्ये एका शाही आदारातिथ्यामधून अनोखं सेलिब्रेशन अनुभवता येतं. भव्य राजवाडे, कलात्मक महाल, प्राचीन मंदिरे, नैसर्गिक आणि मानव निर्मित सरोवरे, ऐतिहासिक किल्ले असा राजस्थानचा समृध्द वारसा यादरम्यान अनुभवता येतो. राजस्थानमधील वातावरण आणि निसर्गसौंदर्य ही अप्रतिम असतं. याठिकाणी पर्यटकांना महलवजा भव्य हॉटेल्समध्ये वास्तव्य देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. पारंपरिक लोकसंगीतापासून ते चविष्ट पाककलेपर्यंत अनेक बाबतीत बहुरंगी असलेले राजस्थान बघायला जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी येतात.
माऊंट अबूचे कोरीवकामाने नटलेले, संगमरवरी दिलवाडा मंदिर, उदयपूरची सहेलियोंकी बाडी, चित्तोडगड, पुष्करचे ब्रह्मदेवाचे मंदिर, रणथंबोरची थरारक जंगल सफारी, पिंक सिटी जयपूरचा हवामहल, आमेर किल्ला, बिकानेरचा जुनागड किल्ला, कॅमल सेंटर, दशनोकचे करनी माता मंदिर, जैसलमेरचा किल्ला, सँड ड्यून्स, जोधपूरचे उमेदभवन, मेहरनगड या ठिकाणांमुळे ही सहल रंगरंगीली होऊन जाते. मग ‘पधारो म्हारे देस’ म्हणत आपल्याला खुणावणारा राजस्थान आपल्याला आपल्या रंगांमध्ये रंगवतो.
राजस्थानची एक खासियत म्हणजे तेथील थारचे वाळवंट. वाळवंटाचा आनंद घेण्यासाठी आपण जैसलमेर जवळच्या साम सॅण्ड ड्यून्सना भेट देतो. अफाट पसरलेल्या वाळवंटाची झलक आपल्याला चकित करते. मग उंटाची सवारी, राजस्थानी लोकसंगीताची मैफिल आणि खास राजस्थानी भोजन यामुळे ती संध्याकाळ अविस्मरणीय ठरते.
एव्हरग्रीन केरळ
निसर्गाने भरभरून दिलेली भूमी, गॉड्स ओन कंट्री म्हणजे केरळ. हिरवेगार चहाचे मळे, नारळीच्या बनांची किनार लाभलेला सागरकिनारा, तुडूंब भरलेल्या नद्यांचे वळणदार प्रवाह, गर्द जंगलाने भरलेले डोंगर या सगळ्यामुळे केरळ आणि एकंदरीत दक्षिण भारताला एक विलक्षण मोहक रूप प्राप्त झाले आहे. केसरीच्या केरळ, कन्याकुमारी सहलींमध्ये भारताचे हे दक्षिणरंग अनुभवता येतात. केरळचे प्रवेशद्वार प्राचीन ऐतिहासिक शहर कोचीन आणि केरळच्या मनमोहक निसर्गाची जादू अनुभवता येते ते ‘टी टाऊन’ मुन्नार आपल्याला इथल्या सहलींमध्ये पाहता येते.
केरळचे खास आकर्षण असलेल्या बॅकवॉटर्स राईडचा आनंद घेण्यासाठी आपण वेम्बनाड सरोवराच्या विशाल जलाशयाला भेट देतो. याच सरोवराच्या काठावर कुमारकोम बर्ड सँक्च्युअरी आहे. सुमारे चौदा एकरांमध्ये पसरलेल्या या पक्षी अभयारण्यात इग्रेट, हेरॉन, डार्टर, कॉर्मोरंट, मूरहेन अशा पाणपक्ष्यांबरोबरच क्रेन, टील, डक्स असे स्थलांतरीत पक्षी ही पाहायला मिळतात. प्राचीन मंदिरे, संग्रहालये, निसर्गसौंदर्य पाहातानाच केरळच्या संस्कृतीचा, परंपरेचा परिचयही होतो. कैराली शो, कुमीली स्पाईस व्हिलेजमध्ये शॉपिंग, मुत्तुपट्टी डॅममधील स्पीड बोट राईड, अर्धचंद्राकर आकाराचा कोवालम बीच अशा एव्हरग्रीन केरळचं दर्शन इथल्या सहलींमध्ये घडतं.
एक्सायटिंग अंदमान
भारतातच असलेले हे डेस्टिनेशन आपले वेगळेपण टिकवून आहे. क्रिस्टल क्लिअर बिचेस आणि निसर्गवैविध्यामुळे इथे नेहमीच सेलिब्रेशनचा माहोल असतो. येथे गेल्यावर अगदी थायलँड – मॉरिशसला गेल्याचा आभास होतो. इथले गगनचुंबी वृक्ष, समुद्रातले शंख शिंपले व कोरल्स, अजस्त्र मासे, खळाळणारे निळे पाणी आणि या सर्वांना सदोदित साक्षी असणारे निरभ्र आकाश हा अमूल्य खजिना डोळ्यासमोर ठेवून सहलीचा अनुभव काही औरच असतो. अंदमान येथील एक निसर्गनिर्मित अदभूत रमणीय स्वराज बेट आपल्या अनोख्या निसर्गसौंदर्याने सर्वांना भुरळ घालते, जॉली बॉईज आयलँडला समुद्रीकिनारी रिलॅक्स होता येते, विविध वॉटर स्पोर्टस् आणि स्वीमिंगची धम्माल अनुभवता येते. येथील स्थानिक नेहमीच पर्यटकांच्या आदरातिथ्यासाठी सज्ज असतात. एकंदरीतपणे अंदमान धम्माल डेस्टिनेशन्स आहे, हे तिथे गेल्यावरच समजते. मग फॅमिलीसोबत आनंददायी अंदमानला भेट द्यायलाच हवी.