केसरीच्या देशविदेशातील जानेवारी ते मार्च टूर्स म्हणजे गर्दी कमी, किंमत कमी आणि भरपूर आनंदाची हमी!
जॉयफुल जानेवारी, फॅन्टास्टिक फेब्रुवारी आणि मॅजिकल मार्च… याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे केसरीच्या जानेवारी ते मार्चच्या देश-विदेशातील टूर्स !
मंडळी, 2024 कसं गेलं? याचा विचार करतानाच 2025 आणखी चांगलं कसं घालवता येईल, याचा अनेक जण विचार करतात. त्यातून निर्माण होतात अनेक संकल्प. एकदा का संकल्प केला की, त्याच्या पूर्ततेसाठी आपण झटून कामाला लागतो. आपला पर्यटन संकल्प पूर्ण करण्यासाठी केसरी सदैव तत्पर आहे. बेस्ट सीझन आणि बेस्ट बजेट डिल्सचे अप्रतिम कॉम्बिनेशन असणाऱ्या जानेवारी ते मार्च दरम्यानच्या धम्माल टूर्ससह केलेलं वर्षांच्या सुरुवातीचं पर्यटन हा वर्षभरासाठी आनंदाचा बूस्टरच ठरतो.
जानेवारी ते मार्च दरम्यानचा सीझन हा आल्हाददायक वातावरण, गुलाबी थंडी, फुलांचा बहर, कमी गर्दी आणि निवांत स्थळदर्शनाचा सुरेख संगम असतो. समृद्ध वन्यजीवन लाभलेलं आफ्रिका, साऊथ ईस्ट एशियातील कला – तंत्रज्ञानाचा आविष्कार, क्रूझचा प्रवास, दुबईची धम्माल शॉपिंग, इवल्याश्या गुलाबी पांढऱ्या चेरी ब्लॉसमच्या फुलांमध्ये न्हाऊन निघालेलं जपान, अद्भुत निसर्ग आश्चर्य आणि अनोख्या वन्यजीवनाचं वरदान लाभलेलं ऑस्ट्रेलिया, भारताचे शेजारी देश श्रीलंका, नेपाळ आणि भूतान या सगळ्याचा निखळ आनंद जानेवारी ते मार्च दरम्यानच्या सहलींमध्ये अनुभवता येतो.
लागोपाठ सुट्ट्या असल्याने फेस्टीव्ह सीझनमध्ये पर्यटनस्थळांना पर्यटकांची मोठी गर्दी असते. हॉटेल्स आणि विमानप्रवासाचे दरही जरा चढेच असतात. पण पर्यटन स्थळांवरील पर्यटकांची ही गर्दी ओसरली की कमी गर्दीचा, कमी किमतीचा आणि भरपूर आनंदाची हमी असलेला जानेवारी ते मार्चमधील टूर्सचा सिझन सुरु होतो. या दरम्यान देशविदेशातील टूर्स गॅरेंटिड लो प्राईस मध्ये उपलब्ध असल्या तरी केसरीची दर्जेदार आणि आपुलकीची सेवा मात्र कायम आहे.
ऍडव्हेंचरस आफ्रिका
आफ्रिका हा एकच खंड या भूतलावर आहे जिथे बिग फाईव्ह म्हणजे सिंह, बिटे, गेंडे, हत्ती आणि आफ्रिकन म्हैस मुक्तपणे संचार करताना दिसतात. आफ्रिकेतील गेम रिझर्व्ह म्हणजे जगातले एकमेव ऍनिमल किंग्डम म्हणता येईल. दबा धरून बसलेली सिंहीण, तिच्यावर लक्ष ठेऊन असलेली हजारो गझेल्स हरणं, त्यांच्या डोळ्यातली भिती, हत्तीचे कळप, ते लहानग्या हत्तीची कशी काळजी घेतात, हे सारं पाहणं म्हणजे एक सुखद अनुभव. केनिया हे प्राण्यांचे विश्व म्हणून जगप्रसिद्ध आहे. इथले गेम रिझर्व्ह, विशेषतः मसाई मारा आणि लेक नाकुरू येथे फ्लेमिंगोचे थवे, हरीण, हत्ती आणि जिराफांचे कळप हे सारं पाहणं म्हणजे एका आगळ्या-वेगळ्या जगाची सफर.
व्हिक्टोरिया फॉल्स हा जगातील सगळ्यात मोठा धबधबा. 5604 फूट रुंद असा हा कल्पनेपेक्षाही मोठा धबधबा इथे पाहता येतो. नेल्सन मंडेलांचा गौरवशाली इतिहास सांगणाऱ्या साऊथ आफ्रिकेमध्ये केप टाऊन, टेबल टॉप माऊंटन आणि गार्डन रूट या नयनरम्य प्रांताला भेट देतो. वास्को द गामाने भारताचा शोध घेत केप ऑफ गुड होपला वळसा घेऊन पुढे प्रवास केला. फनिक्युलर ट्रामचा प्रवास करत आपण इथल्या लाईट हाऊसला भेट देतो. टेबल टॉप माऊंटनला झिपलाईनचा साहसी अनुभव घेता येतो.

इजिप्त हूरघडा
इजिप्त म्हटलं की सर्वांना कुतूहल आणि उत्सुकता असते ते म्हणजे पिरॅमिड्स, ममी आणि नाईल नदीचे. या दोन गोष्टींमुळे इजिप्तचं पर्यटन वाढलं. सुदाममध्ये उगम पावलेली जगातली सर्वांत लांब नाईल नदी इजिप्त मधून वाहत मेडिटेरिअन सीमध्ये मिसळते. या नदीकाठी वसलेल्या नाईल डेल्टामुळे इजिप्तला प्राचीन इतिहास लाभला. कैरोमध्ये येताच इजिप्तशिअन म्युझियमला भेट देत बॉय किंग म्हणून प्रसिद्ध राजा तुतनखामुनचा प्राचीन आणि दुर्मिळ वस्तूंचा खजिना पाहत इजिप्तशिअन संस्कृतीची ओळख होते.
ग्रेट पिरॅमिड्स ऑफ गिझाच्या भेटीत या पिरॅमिड्समध्ये दडलेलं रहस्य उघगडते. मानवी डोके, सिंहाचे शरीर आणि गरुडाचे पंख असलेला स्फिंक्स या पौराणिक प्राणी इथल्या प्राचीन मंदिरांचे संरक्षण करताना दिसतो. माहितीपूर्ण लाईट अँड साऊंड शोचा अनुभव घेता येतो.
आस्वानमध्ये सुरु झालेल्या नाईल रिव्हर क्रूझच्या प्रवासात नदीकाठचा नयनरम्य नजारा पाहताना इजिप्तचा प्राचीन इतिहास अनुभवता येतो. जगप्रसिद्ध अबू सिम्बेल येथील द ग्रेट टेम्पल ऑफ फारो रामसेस द्वितीय, टेम्पल ऑफ क्वीन नेफरतारी, कोम ओम्बो येथील दुहेरी मंदिर, एडफू टेम्पल पाहता येतं. व्हॅली ऑफ द किंग्स ही तर फारोजची दफनभूमी. इथली राजा तुतनखामुनची 3300 वर्षांची ममी जगप्रसिद्ध आहे.
हुरघडा हे रेड सीच्या किनाऱ्यावरील सर्वात मोठे रिसॉर्ट डेस्टिनेशन आहे. डॉल्फिन क्रूझ हे इथलं प्रमुख आकर्षण. नाईल नदीच्या किनारी वसलेल्या या अद्भुत अनोख्या देशाची सहल ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक आश्चर्यांची ओळख करून देते. इजिप्त हूरघडासाठी केसरीच्या सहली प्रत्येक महिन्यात आहेत.

उगवत्या सूर्याचा देश जपान
चेरी ब्लॉसमचा जपान म्हणजे अप्रतिम निसर्गसौंदर्याचा अविष्कारच संपूर्ण जपान जणू निसर्गदेवतेने स्वतः आपल्या हाताने सजवलाय असंच वाटावं. एका वेगळ्याच उत्सवाचे स्वरूप या काळात जपान आणि जपानी लोकांच्या उत्साहाला लाभलेले असते. चेरी ब्लॉसमचा निसर्ग उत्सव मर्यादित काळापुरता असून साधारणपणे मार्च अखेर ते एप्रिल पहिला आठवडा या काळात आपण अनुभवू शकतो. इट इज ऑन मदर नेचर एक ते दोन आठवडे आपल्याला कुठे ना कुठे तरी चेरी ब्लॉसम पाहता येतो. हजारो हरणांचं निसर्गरम्य घर असलेल्या नारा डिअर पार्कमध्ये आणि हिरव्यागार आराशिया बांबू ग्रोव्हमध्ये मारलेला फेरफटका, ओशिनो हवाई येथून दिसणारा माऊंट फुजीचा अप्रतिम नजारा यांमुळे जपान सहल एक अविस्मरणीय अनुभव ठरतो. वेगवान बुलेट ट्रेनने ओसाका ते हिरोशिमा प्रवास आणि सगानो रोमँटिक ट्रेनचा प्रवास, जपान मधला प्रत्येक प्रवास एका वेगळ्याच दुनियेत सोडेल. जगप्रसिद्ध तोरी गेट, जपानची सर्वात मोठी बुद्ध मूर्ती असलेलं तोडाई-जी मंदिर, इत्सुकुशिमा श्राईन आणि इतर धर्मस्थळांना दिलेली भेट म्हणजे एक अध्यात्मिक अनुभव. साऊथ कोरियामध्ये कोरियन डिमिलिटराइज्ड झोनला भेट देता येते. सोलमधील लोटे वर्ल्ड टॉवर आणि बुसानमधील गेमचॉन कल्चरल व्हिलेज आधुनिकतेचं दर्शन घडवतात. नैसर्गिक चमत्कार ओवाकुडाणी बॉयलिंग व्हॅली, ऐतिहासिक वारसा नॅशनल फोकलोर म्युझियम आणि शिराकावागोच्या वास्तुकलेचा अनुभव कोरियाच्या सांस्कृतिक समृद्धीचा परिचय करून देतात. केसरीच्या Value for Money जपान सहलींमध्ये 4/5 स्टार हॉटेल्समध्ये वास्तव्य मिळते. म्हणून जपान पाहावं तर केसरी सोबत.

फन फिल्ड ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियाला दिलेली प्रत्येक भेट प्रत्येकाला मंत्रमुग्ध करते. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडची सैर, फिलिप बेटावरील पेंग्विन परेड, आणि ग्रेट ओशन रोडवरील हेलिकॉप्टर राईड यांसारख्या रोमांचक अनुभव ऑस्ट्रेलियाच्या भेटीत मिळतात. कुरांडा रेन फॉरेस्टमधील स्काय – रेल राईड, जार्विस बेटावरील डॉल्फिन क्रूझ, आणि ग्रेट बॅरिअर रीफमध्ये ग्लास-बॉटम बोटीमधून केलेले समुद्रीजीवनाचे निरीक्षण पर्यटकांना निसर्गाच्या अगदी जवळ नेते. ऑस्ट्रेलियातील कांगारू, कोआला आणि डॉल्फिन पाहणं म्हणजे वन्यजीवनप्रेमींसाठी पर्वणीच.
प्रेक्षणीय किनारी गावं भव्य उद्यानं आणि वारसास्थळं लाभलेल्या ऑस्ट्रेलियामध्ये नैसर्गिक सौंदर्य, सांस्कृतिक विविधता, आणि आधुनिक शहरजीवन यांचा अद्वितीय संगम पाहता येतो. म्हणूनच रोमँटिक हनिमून असो किंवा कौटुंबिक साहस, ऑस्ट्रेलियाची सहल म्हणजे विश्रांती आणि थरार यांचा परिपूर्ण समतोल.

साऊथ ईस्ट एशिया
सिंगापूर म्हणजे मिनी वर्ल्डच पर्यटकांची जगभरातील आवडीची पर्यटनस्थळे या देशात आहेत. सिंगापूर फ्लायर या महाकाय आकाशपाळण्यातून सिंगापूर शहराचं विहंगम दृश्य पाहता येतं. जगप्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयही इथे आहे. प्रसिद्ध युनिव्हर्सल स्टुडिओला सिंगापूरमध्ये भेट देऊ शकतो. सेंतोसाच्या किनाऱ्यावर विंग्स ऑफ फायर हा अनोखा लाईट अँड साऊंड शो पाहता येतो. भव्य गार्डन्स बाय द बेमधील क्लाऊड फॉरेस्ट, फ्लॉवर डोम, नयनरम्य मानवनिर्मित धबधबा आणि इथलं शांत वातावरण हे सारं अचंबित करणारं आहे. जगातील एकमेव नाईट सफारीचा आनंद घेता येतो.
समुद्रकिनाऱ्यावर धम्माल करण्यासाठी थायलँडमधील बँकॉक, पट्टाया आणि क्राबी हे बेस्ट डेस्टिनेशन्स, पॅरासेलिंगसारखे वॉटरस्पोर्ट्स आणि पट्टायामधला सुंदर क्रिस्टल क्लिअर समुद्रकिनारा पर्यटकांना नेहमी आकर्षित करतो, बँकॉकच्या सफारी वर्ल्डमध्ये अनोखे वन्यजीवन अनुभवता येते. चाओ फ्राया रिव्हर क्रूझमध्ये केलेली धम्माल पर्यटक कधीच विसरू शकत नाहीत.
मलेशियामधले पेट्रोनास टॉवर आणि क्वालालंपूर टॉवर आता या देशाची ओळख बनले आहेत. गेंटिंग हायलँड येथे धम्माल राईड्ससह रेनफॉरेस्टही पाहायला मिळतं.
साऊथ ईस्ट एशियातील या पॉप्युलर देशांच्या सहलींसह आपल्याकडे काही ऑफ बिट आणि अनोखे पर्यायही आहेत. व्हिएतनाम, कंबोडिया, हाँगकाँग, शेन्जेन, मकाऊ, बाली आणि जकार्ता या देशांसह आपल्यासाठी केसरीकडे साऊथ ईस्ट एशियामधील वीसहून अधिक सहलींचे पर्याय उपलब्ध आहेत. गिली आयलँड हे तर इथलं नवीन आकर्षण. दरवर्षी फेब्रुवारीमध्ये येणारा लँटर्न फेस्टिवल पाहण्यासाठी आपण तैवानला नक्की भेट द्यावी. इथल्या सहलींमध्ये जे जे पाहायला हवं ते सर्व समाविष्ट असतं, म्हणूनच इथली सहल करावी तर फक्त केसरीसोबत !
डॅझलिंग दुबई
आधुनिकता, सांस्कृतिक वारसा, आणि लक्झरियस लाईफस्टाईलचा परिपूर्ण संगम म्हणजे दुबई. बुर्ज खलिफाच्या 124 व्या मजल्यावरून दुबईचा नजारा आपल्याला इथे अनुभवता येतो. धाओ क्रूझवर घालवलेली संध्याकाळ प्रत्येक पर्यटकांसाठी धम्माल अनुभव असतो. दुबईची डेझर्ट सफारी जगप्रसिद्ध आहे. सांस्कृतिक नृत्य आणि स्थानिक भोजनाचा आनंद पर्यटकांना घेता येतो.
फेरारी वर्ल्डमध्ये वेगवान फॉर्म्युला रोझामध्ये बसण्याचा अनुभव मिळतो. वॉर्नर ब्रदर्समध्ये ४डी सिनेमा पाहता येतो. दुबईच्या म्युझियम ऑफ द फ्युचरला भेट देता येते. शेख झायेद मॉस्क, पाम जुमैराचा नयनरम्य नजारा, जैवविविधतेने नटलेलं मिरॅकल गार्डन, बुर्ज अल अरब असे अनुभव पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी दुबई आणि अबुधाबीमध्ये आहेत. डेरा सिटी सेंटर, गोल्डसुकमध्ये सोने आणि दागदागिने खरेदी करण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. डिझायनर कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, पर्शियन कार्पेट, अरबी परफ्यूम्स, ड्राय फ्रूट्स, मसाले, खजूर, असं बरंच काही खरेदी करता येतं. 4/5 स्टार हॉटेल्ससह सर्वांनी वाखाणलेल्या केसरीच्या दुबई सहलींना आपणही चला.

स्कँडिनेव्हियन नॉर्दर्न लाईट्स
अद्भुत नैसर्गिक आश्चर्य नॉर्दन लाईट्सचा नयनरम्य नजारा पर्यटकांना आईसलँड, स्वीडन, स्कँडिनेव्हियामध्ये फेवारीपर्यंत पाहता येतो. नॉर्वेच्या उत्तरेकडील किरूना परिसरातून नॉर्दन लाईट्स हा अचंबित करणारा निसर्गाचा चमत्कार पाहाणं हे भाग्यच. जगातल्या पहिल्या संपूर्णपणे शुभ्र बर्फाने तयार केलेल्या अद्भुत आईस हॉटेलमध्ये राहण्याचा अनोखा अनुभव आपल्याला इथे घेता येतो. इथले आणखी एक आकर्षण म्हणजे सॅन्टा क्लॉज व्हिलेजला दिलेली भेट. रोषणाईने झगमगणारं हे सुंदर गाव पाहण्यासाठी रॉव्हेनिएमिला जातो, तर रेनडिअर स्लेडिंगचा भन्नाट अनुभव पर्यटकांना रिसवीकामध्ये घेता येतो. तर आर्क्टिक ऍक्वेरियममध्ये आपल्याला विविध प्राण्यांचे जीवन जवळून अनुभवता येते. गोठलेल्या समुद्रातून वाट काढत जाणाऱ्या आइसब्रेकर क्रूझची सफर हा एक अविस्मरणीय अनुभव !