२०२४चा युरोप फक्त केसरी सोबत !
पर्यटन क्षेत्रात पेंडमिकनंतर सकारात्मक मोठा बदल झाला तो भारतीय पर्यटक आणि त्यांच्या प्रवासामध्ये चायनीज पर्यटक कमी झाल्याने अमेरिकेपासून युरोप एशियापर्यंत भारतीय पर्यटक सर्वत्र दिसू लागले आहेत. वर्षातून फक्त एकदा फिरणारे भारतीय पर्यटक दोन ते तीन वेळा आणि दोन वेळा फिरणारे पर्यटक तीन ते चार वेळा आनंदाने फिरू लागले आहेत. कारण या मिळालेल्या वेळेत त्यांना भारताच्या पर्यटनातील सौंदर्य दृष्टीपथात येऊ लागले. भारतातलं पर्यटन हे लेह लडाख ते कन्याकुमारी पुरते मर्यादित न राहता आजतोवर प्रकाशझोतात न आलेली असंख्य अपरिचित पर्यटन स्थळे पर्यटकांनी शोधून काढली आणि त्यांचे सोशल मीडिया नार्केटिंगही उत्तम केले. भारतातल्या अनेक नवीन प्रेक्षणीय सहली वाढविण्याची आम्हालाही संधी मिळाली. एकंदरीत प्रवास आणि प्रवासी दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ झाली. भारतीयांनी भारतात खूप प्रवास केला, आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं ‘सफर करते रहो, सेहत के लिये अच्छा है’.

पर्यटन क्षेत्रात देशाबाहेरील प्रवासाच्या बकेट लिस्टमध्ये सर्वात बाजी मारणारा खंड म्हणजे ‘युरोप’. २०२२-२३ मध्ये नेहमीप्रमाणे युरोपनेच बाजी मारली. २०२३ मध्ये तर जगभरातून प्रचंड संख्येने पर्यटकांनी युरोप प्रवास केला. यावेळी भारतीय पर्यटकांना सर्वांत मोठे आव्हान झेलावं लागलं ते युरोपचा व्हिसा मिळवण्याचं. व्हिसाची अपॉईंटमेन्ट मिळणं, आणि मिळाली तर पासपोर्ट वेळेत हातात येणं अशक्य झाले होते. या कारणांमुळे इंडिविज्युअल युरोप प्रवास करणाऱ्या अनेक मंडळींचे नॉन रिफंडबल तिकिटांचे पैसेही वाया गेले. अशा कठीण परिस्थितीतही हजारो पर्यटकांनी केसरीसोबत सुखद युरोप प्रवास केला, याचं आम्हाला खूप मोठ्ठे समाधान आहे.
आता २०२४मध्ये जर युरोपचा प्रवास करण्याची इच्छा असेल तर या प्रवासाच्या तयारीची सुरुवात आत्ताच करायला हवी. कारण युके आणि शेन्जेन असे दोन व्हिसा करावे लागतात. त्यासाठी फाईल आपण कितीही सबमिट केलीत, तरी कॉन्स्युलेट जोवर अपॉइंटमेंट देत नाही तोवर व्हिसा प्रोसेस करता येत नाही. म्हणूनच व्हिसाची तयारी निदान सहा महिने आधीच सुरु करायला हवी. यासाठी केसरीची प्रशिक्षित व्हिसा टीम आपल्याला सहकार्य करण्यासाठी नेहमीच तत्पर असते.

उत्तम फोर स्टार हॉटेल्स, उत्कृष्ट एअरलाईन्स, गॅरटेड युरोस्टार सफर, भारतीय भोजनासोबत स्थानिक भोजनाची खवय्येगिरी, या आणि अशा अनेक कारणांमुळे केसरीसोबत युरोप हे गेली कित्येक वर्षे एक उत्तम समीकरण बनले आहे. मुळात युरोप हा नुसता पाहण्याचा नाही तर अभ्यासाचा आणि अनुभवण्याचा विषय आहे. यासाठी तुमच्या दिमतीला आहेत युरोपची उत्तम माहिती देणारे आमचे अनुभवी टूर लीडर्स म्हणजेच तुम्हाला जपणारं, तुमची काळजी घेणारं केसरीचं ‘आपलं माणूस’ काही ठिकाणी अनेक पर्यायी पर्यटन स्थळे युरोपच्या सहलीमध्ये समाविष्ट न केल्याने सुरुवातीला छोटी दिसणारी किंमत बुकिंग करताना हळूहळू वाढत जाते आणि अनेकदा पर्यटक जास्त किंमत भरतात. परंतु केसरीच्या सहलीमध्ये मात्र हीच सगळी पर्यायी पर्यटन स्थळे आधीच समाविष्ट असल्याने ही ऑल इन्क्लुसिव्ह सहल पर्यटकांच्या फायद्याची ठरते. आणि युरोप एकाच सहलीत वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येतो. म्हणूनच आईसलँड, स्कैंडिनेव्हीया, मिडनाईटसन, ब्रिसमस स्पेशल, सेंट्रल युरोप, नॉर्दन लाईट्स, ईस्टर्न युरोप, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, स्विस पॅरिस, ट्युलिप्स स्पेशल, फ्रेंच रिव्हेरा, असा हा संपूर्ण युरोप अनेक पर्यटकांनी पादाक्रांत केला आहे तो फक्त केसरीसोबत…! म्हणूनच म्हणतात, केसरी म्हणजे युरोप आणि युरोप म्हणजे केसरी !
तर मंडळी येताय ना युरोपला केसरी सोबत? आजच बुकिंग करून आपल्या युरोप राहलीची तारीख निश्चिती करा. आपली सहल यशस्वी होणारच ही आमची हमी.
केसरी पर्यटन क्षेत्रातील ४० वर्षांची यशस्वी परंपरा!