Connecting People and Places with the Purpose
“झेलम, आप ये सब कैसे मॅनेज करते हो ? बहोत तकलीफवाला काम है। टेक केअर ऑफ द ग्रुप अँड मॅनेज हाऊएव्हर यू कॅन. आय एम प्रिटी शुअर यु विल डू द बेस्ट इन थिस सिच्युएशन. व्ही ट्रस्ट यु” आमची कार्पोरेट टूर सुरु होती आणि मला मालक आणि संचालकांशी बोलायची वेळ आली होती. श्रीनगरची MICE टूरमध्ये आम्ही पहलगामच्या डे ट्रिपवर होतो. सर्व सूचना देऊनही शेवटची बस उशीरा निघाली. पहलगाम व्यवस्थित पाहून झाले परंतु कॉन्व्हॉयमुळे थोडा उशीर झाला. परतीचा प्रवास दिवसा उजेड असताना करायला हवा, अशी सूचना होती. आम्ही टूर्सना हे नेहमीच करतो. त्या दिवशी उशिरात उशिरा ४ वाजता निघायचं होतं. परंतु अनेक सूचना देऊनही काही मंडळी मागे रेंगाळली. ५ वाजेपर्यंत आम्ही तिथून निघतो. परंतु त्या दिवशी काही कारणाने ४ वाजताच परतीचा प्रवास रद्द झाला होता. कोणीही ऑफिसर रिस्क घ्यायला तयार नव्हते. सर्व मंडळीना हॉटेल रुम्स मिळणे आता कठीण होते. परंतु इतक्या वर्षांचे हॉटेलिअर्सचे संबंध अशा अडचणीच्या वेळी कामी येतात. तिनही बस मधील सर्व प्रवाशांची त्या रात्रीची सोय पहलगाममध्ये केली आणि पहाटे श्रीनगरला आलो. सर्व प्रवाशांची उत्तम सोय झाली. श्रीनगरही ठरल्याप्रमाणे पाहिले. परंतु जेव्हा विमान प्रवास रद्द होतो, विमानाचे उड्डाण ३-४ तास उशिरा होते, एखादी नैसर्गिक आपत्ती, आदी अनपेक्षित प्रसंग उद्भवतात. त्यावेळी खरंच त्रेधा तिरपीट होते. परंतु आऊटकम महत्त्वाचे ठरते. यावेळी ती परिस्थिती आपण कशी हाळताळतो, हे महत्वाचे असते.
MiCE म्हणजे मीटिंग, इन्सेंटिव्हस, कॉन्फरन्सेस आणि एक्झिबिशन्स. गेली अनेक वर्ष आम्ही या कॉर्पोरेट टूर्स करतोय. वर्षभरात साधारणतः 250 ते 300 टूर्स करतो. परंतु प्रत्येक टूर १००% यशस्वी व्हायला हवी, हा प्रयत्न असतो. MICE मध्येच आम्ही आपल्या वैयक्तिक सहली म्हणजे महिलांचे छोटे ग्रुप्स, डॉक्टर्स, सीए, वकील, रोटरी आणि लायन्स क्लब अशा संस्थांच्या ग्रुप टूर्सही करतो. टूर्सवर मिळणाऱ्या दर्जेदार सुविधांमुळे अनेक मोठ्या कोर्पोरेट्सचा आपण विश्वास संपादन करू शकलो. या पैकी साधारणपणे १०० कोर्पोरेट्स गेली १५ वर्षे केसरी MICE सोबत प्रवास करत आहेत. अनेकांनी आता आमच्या सोबत किमान १० ते १५ टूर्स केल्या आहेत. आमच्या टीममध्ये विविध टेक्निकल एक्स्पर्टचा समावेश आहे, त्यामुळे उत्तम सुविधा देणे, जे प्रॉमिस केलंय ते देणं, यामध्ये आम्ही यशस्वी ठरत आहोत. सोबत आता आम्ही एक इव्हेंट टीमही तयार केली आहे, ज्या अंतर्गत आता आम्ही खूप मोठे इव्हेंट्सही करतो.
MICE मध्ये आज पावेतो आम्ही मॅनेजमेंट टूर्स, डॉक्टर्सच्या कॉन्फरन्स, एम्प्लॉयी’स इन्सेन्टिव्ह टूर्स, आशियातील सर्वात मोठा क्रूझ ग्रुप, तसेच रिलायन्स, टाटा, बिर्ला, गोदरेज या नावाजलेल्या मोठ्या कंपन्यांबरोबर काम करता आले. अनेक शैक्षणिक सहली केल्या. साऊथ ईस्ट एशियापासून युरोपपर्यंत आणि कॅनडा-अमेरीका-आफ्रिका ते ऑस्ट्रेलियापर्यंत सर्वत्र टूर्स केल्या.
MICE टूर्सचा ट्रेंड व्हिसा उपलब्धता किंवा Ease of VISA तसेच एअरलाईन्सच्या थेट कनेक्टिव्हीटीवर अवलंबून असतो. थायलँड, मलेशिया, सिंगापूर, बाकु, व्हिएतनाम, पॅरिस, लंडन, सिडनी, मेलबर्न, स्वित्झर्लंड, ताश्कंद, दुबई, अबुधाबी या ठिकाणी MICE टूर्स मोठ्या प्रमाणात होत असते.
केसरीच्या टूर्समध्ये संपूर्ण व्यवस्थापन आमच्या हातात असतं, म्हणजेच SOP, आयटनरी, हॉटेल्स, बजेट या सर्वांवर आमचं पूर्णपणे नियंत्रण असतं. कारण एसओपी आमची आहे. नैसर्गिक आपत्ती सोडली तर सारे बरहुकुम होत असते. MICE टूर्समध्ये मात्र कॉर्पोरेटच्या बजेट, आयटनरी, डेस्टिनेशन्स प्रमाणे टूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि कोओर्डीनेटरच्या भूमिकेत असतो. त्यांना काय हवं, त्याप्रमाणे आम्ही काम करतो. कधी एक्सपेरिएन्शिअल MICE असते तर कधी स्टडी टूर असते, कधी हायर मॅनेजमेंट कॉन्फरन्स करावी लागते, तर कधी एम्प्लॉयी’स इन्सेन्टिव्ह टूर्स. हे सर्व करताना प्रत्येक वेळी सर्व बारीक सारीक गोष्टींचा सक्रियपणे विचार करावा लागतो. कॉन्फरन्स किंवा ग्रुप टूर यशस्वी झालीच पाहिजे यावर आमचं नेहमीच 100% लक्ष असतं.
आपल्या देशात कॉर्पोरेट टूर म्हणजे MICE या शब्दाची सुरुवात साधारणपणे २००० साली झाली. आम्ही २०० लोकांना घेऊन काश्मीरच्या टूर्स यशस्वी केल्या. परंतु या टूर्स MICE प्रमाणे होत आहेत, हे माहित नव्हतं. आज भारतात इतक्या मोठ्या प्रमाणात MICE च्या टूर्स होत आहेत की आम्हाला सतत नवी डेस्टिनेशन्स आणि नवे अनुभव शोधण्याची गरज भासते. युरोप व्हिसा मिळवताना आजही अनेक समस्या असल्या तरी पँडेमिकनंतर भारतीय पर्यटन क्षेत्रातला जीवनदान दिले ते MICE टूर्सनी. गेल्या दोन वर्षात बाकु आणि व्हिएतनाम या दोन डेस्टिनेशन्सना Ease of VISA आणि एअर कनेक्टीव्हीटीमुळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
मंडळी, आपल्यालाही आपल्या कुटूंबासोबत, ऑफिस सहकाऱ्यांसोबत, मित्रपरिवारासोबत छानसे गेट टुगेदर जगभरात कुठेही करायचं असेल तर केसरी अशा सहली केसरी आपल्या बजेटमध्ये करून देतं. आपली टूर १००% यशस्वी होणार याची खात्री आम्ही देतो.