लक्झरी टूर्स फक्त केसरी सोबत!

“झेलम, कामानिमित्ताने जग फिरत असलेल्या माझ्यासारख्या माणसाला आता थोडे आरामदायी आयुष्य हवेहवेसे वाटते. एखाद्या टूरला जायचा विचार आहे, पण पर्यटन स्थळे पाहण्यासाठी पुरेसा वेळ हवा आणि हॉटेल्स शहराच्या मध्यवर्ती भागात असायला हवी, तर प्रवास अधिक आरामदायी होईल.” रश्मीभाई, आमचे एक रोटरीन मित्र, त्यांच्या सोबतचा हा संवाद. मी लगेजच त्यांना म्हटलं “हो, आपली इच्छा शिरसावंद्य !” बऱ्याच दिवसांपासून माझ्याही मनात अशा लक्झरियस सहली सुरु करायचा विचार होताच.

मंडळी, आपल्या आसपासही अशी अनेक जण असतील, ज्यांना थोडी आरामदायी सहल करायची आहे, अशा समान आवडीच्या लोकांसोबत आनंददायी वास्तव्य व प्रवास करायचा आहे, तर आम्ही आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी उत्कृष्ट आरामदायी सहली घेऊन आलो आहोत. इथे आपले शहराच्या मध्यवर्ती भागातल्या फोर-फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये वास्तव्य असेल. एका ठिकाणी किमान दोन ते तीन दिवसांचा मुक्काम, जे पाहायला हवेच, त्या सर्व पर्यटन स्थळांनी या सहली समाविष्ट असतील. पर्यटन स्थळांना आरामात भेटी देता येईल. आणि दिवसाचा काही वेळ स्वतःहून फिरण्यासाठीही मिळेल. सोबत मदतनीस हवा असेल तर अधिक आकारणी भरून तीही सुविधा उपलब्ध असेल. या सहलीत फक्त सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण समाविष्ट असेल, जेणे करून दिवसभर स्थानिक पदार्थ चाखता येतील. मस्त मनमुराद धमाल करायची, वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी द्यायच्या. आणि हो, तुम्हाला जपायला आणि तुमची काळजी घ्यायला सोबतीला असेल केसरीचं ‘आपलं माणूस‘.

अशा सहलींमध्ये जगभरातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या लक्झरियस ट्रेन्स, क्रूजेस, नेहमीच्या पर्यटन स्थळांसोबतच थोडी हटके ठिकाणे आणि इतर सहलींमध्ये सहसा समाविष्ट नसलेली अशी वन अँड ओन्ली जगप्रसिद्ध ठिकाणे या सहलीमध्ये समाविष्ट असतील. भटकंतीची आवड असेल तर, जितकी ठिकाणे पाहायला हवीत, तितकी आपण या सहलीत नक्की समाविष्ट करू.

व्यस्त जीवनशैलीतून आपल्याला किंवा परिवारातील मंडळींना थोडासा वेळ द्यायचा असेल तर या सहली तुमच्यासाठीच आहेत. चला तर मग अनुभवुया प्रवासातील लक्झरी !

इथे फक्त देशातल्याच सहली नाही तर जगभरातील आरामदायी सहलींचे आयोजन आम्ही आपल्यासाठी करत आहोत. लक्झरियस साऊथ आफ्रिका, मायग्रेशन मादागास्कर, फिजी, युरोपियन क्रूजेस, इग्लू-नॉर्दन लाईट्स, चॉपर राइड्स, व्हिएतनाम, साऊथ अमेरिका, सेंट्रल अमेरिका, अशा सहलीं जगभरात कुठेही नेण्यासाठी किमान दहा लोकांचा तरी ग्रुप हवा. जगात काही ठिकाणे मुळात लक्झरीने समुद्ध आहेत, जी बघायलाच हवी, उदा. आईसलँड, इनक्रेडिबल सालार द उयूनी, बोलिव्हिया बोरा बोरा, फ्रेंच पॉलिनिशिया, वर्डन जॉर्ज, तर काही ठिकाणे त्यांच्या निसर्ग सौंदर्यामुळे लक्झरियस वाटतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे काश्मीर आणि आपली ही काश्मीर सहल असणार आहे रॅडिसन हॉटेलच्या चेनसोबत. ही सारी सुप्रसिद्ध पर्यटन स्थळे बघायची असतील तर चला निघूया एका आरामदायी सहलीला फक्त केसरी लक्झरी टूर्स सोबत.

Tags