माय फेअर लेडी सेलिब्रेटिंग वुमनहूड!

देशविदेशातील अमेझिंग टूर्स. भरपूर मज्जा मस्ती, गेम्स, पैठणी शो, रॅम्प वॉक, शॉपिंगसह बरंच काही….

मंडळी, निसर्गाचं ऋतुचक्र आपल्याला नेहमीच आकर्षित करतं. चैत्राची चाहूल लागली की, संपूर्ण पानं गळून निष्पर्ण झालेले वृक्ष नव्या दिमाखात उभी राहतात. यावेळी पोपटी, हिरव्या, तांबड्या आणि गुलाबी रंगछटांची पालवी फुटते. निसर्गाच्या या सोहळ्याला जोड असते सण, व्रतवैकल्यांची आणि त्यांना उत्साहाने पाळणाऱ्या महिलांची. या दरम्यान त्या नऊवारी नेसून पारंपरिक साजशृंगार करतात, सर्वांना भेटत एकत्रपणाचा सोहळा साजरा करतात. कधी कोमल फुलांसारख्या तर कधी तेजस्वी सूर्यकिरणांसारख्या दिसतात. थोडक्यात काय, तर निसर्ग आणि महिला हे दोघंही सौंदर्य आणि सृजनशीलतेची देणगी आहेत. प्रत्येक सोहळा साजरा करताना निसर्गाला कृतज्ञता व्यक्त केली जाते. हाच वारसा जोपासत पुढे घेऊन जात आहे केसरीच्या वुमेन्स स्पेशल माय फेअर लेडी टूर्स बदलत्या ऋतूनुसार जशी निसर्गाची विविध रूपं अनुभवता येतात, तशीच महिलांची नाविन्यपूर्ण रूपं माय फेअर लेडी टूर्समध्ये अनुभवता येतात. 

हाच उत्साह जोपासत सर्व महिला पुन्हा नव्या उत्साहात निघाल्या आहेत माय फेअर लेडीच्या देशविदेशातील टूर्सना. जिथे तिला मिळणार आहे हवाहवासा ब्रेक, स्वच्छंद आणि मनमोकळं फिरण्याचा आनंद ! मार्च ते एप्रिल दरम्यानच्या निसर्गसोहळ्यात ती न्हाऊन निघणार आहे. मगाशी सांगीतलं तसं, जपान चेरी ब्लॉसमच्या निसर्ग उत्सवात किमोनो पेहराव करत सेल्फीज् काढणार आहे. सोबत आराशियामा बांबू ग्रोव्ह, ओसाका ते हिरोशीमा बुलेट ट्रेन, टोकियो स्काय ट्री, शिंकू ग्योएन पार्क, माऊंट फुजीच्या 5 व्या लेव्हलला भेट अशा अनेक साईटिसिईंग्स् पाहणार आहे. काश्मीर – युरोपच्या रंगीबेरंगी ट्युलिप्समध्ये बागडणार आहे. काश्मीरमध्ये आशियातील हायेस्ट गंडोला राईड, चार चिनार, दल लेक शिकारा राईड, श्रीनगर हाऊसबोटमध्ये निवांत वास्तव्य, बेताब सिनेमाचं जिथे शूटिंग झालं त्या बेताब व्हॅली येथे फोटोस्टॉप, मेडो ऑफ गोल्ड सोनमर्गचा सुंदर नजारा अनुभवणार आहे. युरोपला स्वित्झर्लंडच्या बर्फामध्ये “जरा सा झूम लू मै…” गाणार आहे. लंडन ते पॅरिस युरोस्टारने गॅरंटीड प्रवास, टॉप ऑफ युरोप युंगफ्रॉला इगर एक्स्प्रेसने प्रवास, आयफेल टॉवरच्या टॉप लेव्हलला भेट, डिस्नेलँड, माऊंट टिटलीस रोटेअर अशा एकापेक्षा एक साईटसिईंग्स्, तर नैनितालच्या लेकमध्ये बोटिंग, क्वीन ऑफ हिल्स राणीखेत, नैना देवी मंदिराचं दर्शन आणि कुमाओं रेजिमेंट शहीद स्मारकाजवळून प्रवास करणार आहे.

एकीकडे ही धम्माल अनुभवताना दुसरीकडे लेह लडाखमध्ये सैनिकांना भेटत कृतज्ञतापूर्वक सलाम करत रक्षाबंधन साजरं करणार आहे, 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाचा सोहळा अनुभवणार आहे, कारगिल वॉर म्युझिअम पाहत नतमस्तक होणार आहे. सोबत मोटरेबल रोड खारदुंगला पास, पँगाँग त्सो लेक, मॉनेस्ट्रीज् आणि शांती स्तुपा. तर लखनौ अयोध्या प्रयागराज वाराणसी यात्रेत राम मंदिर अयोध्येचं दर्शन, त्रिवेणी संगम, बनारस गंगा आरती आणि काशी विश्वनाथ मंदिराचं दर्शन. लँड ऑफ ट्रुथ नेपाळमध्ये चितवन नॅशनल पार्क, नेपाळी फोक डान्स, पशुपतीनाथ मंदिर आणि रोप वे राईडने मनोकामना मंदिराची पावन अनुभूती घेणार आहे. या सगळ्या साईटसिईम्सचा आनंद घेताना गाणी, गेम्स, पैठणी शो, डिजे नाईट, रॅम्प वॉक आणि भरपूर मज्जा करणार आहे. सोबतीला आहे काळजी घेणारं केसरीचं आपलं माणूस. लक्झरियस हॉटेल्स, बेस्ट एअरलाईन्स आणि दर्जेदार सेवा. परत ती निघणार आहे गुजरात रण उत्सव, अमृतसर, इंदौर उज्जैन मांडू, केरळ कन्याकुमारी मदुराई रामेश्वरम पाँडिचेरी महाबलीपुरम, पुरी भुवनेश्वर चिलिका, राजस्थान मारवाड आणि राजस्थान मेवाड टूर्सना. या टूर्सचा आनंद घेण्यासाठी ती आता मनपसंत पेहराव्याची, शॉपिंगची आणि न थकता आनंद घेता यावा म्हणून फीटनेसची तयारी करतेय. या सर्व टूर्स फेस्टीवल्स, निसर्ग सोहळा, जिथे जात आहोत तिथल्या स्पेशॅलिटी… या सर्वांचा विचार करत नियोजीत केल्या जातात. दुबईला जाताना तिथली आधुनिकता, अॅक्टिव्हीटीज, संस्कृतीसह तिथली स्पेशॅलिटी… अर्थात शॉपिंगचा विचार केला जातो. म्हणूनच दुबई शॉपिंग फेस्टीवल दरम्यान ही टूर जाते, फ्री लँड थायलँडच्या कोरल आयलँडमध्ये पॅरासेलिंग करते आणि वॉटर अॅक्टिव्हीटीजचा रोमांच अनुभवते.

मंडळी, या टूर्स गृहिणींकरता ठरतात माहेरपण, तरूणींसाठी ठरतात नवनवीन स्थळं बघत जग अनुभवण्याचं सुंदर माध्यम आणि नातवंडांमध्ये रमलेल्या आजींसाठी ठरतात बालपणीचं अंगण. थोडक्यात, या टूर्स प्रत्येकीला काहीना काही देतात. कारण माय फेअर लेडी म्हणजे तुमचं प्रतिबिंब, जी प्रत्येकीमध्ये दडलेल्या मुलीला स्वतंत्रपणे जगायला शिकवते, सुप्त कलागुणांना वाव देते आणि सर्वकाही विसरून स्वतःचा वेळ अनुभवायला देते. चला तर येताय ना… आम्ही आपल्या स्वागतासाठी सज्ज आहोत !

मी नियालीए जपानला तुम्हीही येताय ना? – टूर्स हाऊसफुल्ल होत आहेत! त्वरा करा.
-सेलिब्रिटी सोनाली कुलकर्णी

8 मार्चला साजऱ्या झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा! मंडळी, आपल्या टूर्सचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी लोकप्रिय अप्सरा….. अर्थात सोनाली कुलकर्णी निघालीए जपान टूर्सना. जपानच्या LJ वुमेन्स स्पेशल माय फेअर लेडी टूर आणि JF फॅमिली टूरला तेही 28 मार्चला, तर अवश्य या! गप्पा, सेल्फीज् आणि फुल टू धम्माल अनुभवा. त्वरित बुकिंग करा आणि या अविस्मरणीय टूर्सचा आनंद घ्या. कारण मंडळी, आजच्या काळातील महिलांचं कामाचं क्षेत्र कितीही विस्तारलं असलं तरीही आपल्या आधी प्रत्येक महिला घरच्यांचा विचार करते. मग यंदा आपली आई, बहिण, पत्नी किंवा मैत्रीण अशा नात्यांची सुंदर गुंफण असणाऱ्या महिलांना तिच्या पसंतीची टूर भेट द्या आणि तिच्या सर्वस्वी आनंदासाठी थैंक यू म्हणा!

Tags