सिंगापूर, थायलँड, मलेशिया या ठिकाणी जेव्हा भारतीय पर्यटक आजसारखे मोठ्या प्रमाणात जात नव्हते, त्यावेळी भारतीय पर्यटकांना प्रचंड आकर्षित करत होता तो आपला शेजारी देश म्हणजे नेपाळ. एकेकाळी नेपाळ ही भारतीयांसाठी परदेशी माल मिळण्याची मोठी बाजारपेठ असे. नेपाळमध्ये चीनमार्गे आलेले विदेशी कपडे आणि शूज असे सर्व सामान मिळे तसेच नेपाळमधील कोरल्स प्रसिद्ध असल्यामुळे पर्यटक या सहलीमध्ये नेपाळी कोरल्स खरेदी करत असत.
काठमांडू – पोखरा – चितवन हे नेपाळ सहलीसाठीचे विनिंग कॉम्बिनेशन. या सहलीमध्ये काठमांडूमधील बौद्धनाथ स्तुप, जगप्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिर, भव्य दरबार स्क्वेअर, चंद्रगीरी हिल्सला केबल कारने जाताना दिसणारा नयनरम्य नजारा, हिंदूंचे श्रद्धास्थान मनोकामना मंदिर, आदी पाहता येते. नेपाळमध्ये गेलात तर चितवन वाईल्ड लाईफ सँच्यूरीला नक्कीच भेट द्यायला हवी. भारताचा राष्ट्रीय प्राणी रॉयल बेंगाल टायगर आणि एक शिंगी गेंड्याचे दर्शन आपल्याला येथे होते. हत्तीवर बसून जंगलात फेरफटका मारता येतो. थारू या नेपाळच्या सांस्कृतिक नृत्याचा खास शो सुद्धा आपल्याला चितवनमध्ये पाहता येतो. पोखरा ही नेपाळमधील अतिशय सुंदर व्हॅली. आपण पोखरामध्ये देवी फॉल हा नयनरम्य धबधबा, बाराही मंदिर आणि विंध्यवासिनी मंदिर ही नक्षीदार मंदिरं पाहता येतो. सांगकोट येथून अन्नपूर्णा पर्वत रांगेमागून होणारा विलोभनीय सूर्योदय अनुभवतो. तसेच माऊंट फिशटेलसह इतर सुंदर पर्वतांनी वेढलेल्या फेवा लेकमध्ये बोटीतून केलेली सैर अविस्मरणीय न झाली तर नवलच.
नेपाळच्या या सहलीत काठमांडू, पोखरा, चितवन या शहरांना भेट देत नेपाळची छोटीशी झलक पाहता येते. या भेटीमध्ये आपल्याला नेपाळच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारस्याचा उत्कृष्ट संगम दिसतो. मुक्तिनाथसह नेपाळ या सहलीमध्ये नेपाळ मधील इतर पर्यटन स्थळांसोबतच आपल्याला प्राचीन मुक्तिनाथ मंदिराला भेट देता येते. भगवान विष्णूंना समर्पित असलेल्या या मंदिरात जगभरातील हिंदू आणि बौद्ध धर्मीय दर्शन घेण्यासाठी येतात.
जसा नेपाळ आपला शेजारी देश आहे तसेच श्रीलंका आणि मालदिव्स हेही आपल्या सीमेजवळील हिंद महासागरातले देश. पर्ल ऑफ द इंडियन ओशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीलंकेसाठी भारतीयांच्या हृदयात एक वेगळेच स्थान आहे. रामायणातील रावणाचा वध, अंजनेय मंदिर, सीता एलीया आणि अशोकवन वाटिका ही ट्रेल पार श्रीलंकेत जाऊन थांबते. आणि म्हणूनच श्रीलंका सहलीत जास्तीत जास्त रामायण ट्रेलचा उहापोह होतो आणि जो पहायला, एन्जॉय करायलाही एक वेगळच थ्रिल वाटते. प्रचंड धार्मिक महत्त्व असलेले श्री महा बोधी वृक्ष आपल्याला पाहता येतो. स्वर्गीय सुंदर बगीच्यांनी वेढलेला सिगिरिया किल्ला तिथल्या सिंहाच्या भव्य दगडी प्रतिकृतीसाठी प्रसिद्ध आहे. उंच बुद्ध मूर्ती असलेले डम्बुला मंदिर आणि टेम्पल ऑफ टूथ रेलिक या बुद्ध प्रार्थना स्थळांना भेट देतो. तसेच बेंटोटा येथील टर्टल हॅचरीला भेट देतो आणि श्रलंकेतील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे याला नॅशनल पार्कलाही जातो. श्रीलंकेच्या शेजारी असलेली मालदिव्स बेटे ही केवळ तिथल्या आलिशान रिसॉर्ट्ससाठी नाही तर तिथल्या सुंदर सागरकिनाऱ्यासाठी आणि स्नॉर्कलिंग व स्कुबा डायविंग अशा साहसी प्रकारांसाठी प्रसिद्ध आहे.
आपण कदाचित जग फिरलो असू पण, आपले हे शेजारी देश पाहिले आहेत का? हाच तो सिझन लगेच बुकिंग करा केसरीसोबत आणि घ्या एक अविस्मरणीय अनुभव!