प्रीमियम अंटार्क्टिका

मागच्या आठवड्यातली गोष्ट. आमच्या केसरीचे गेस्ट अनंत साठे यांची भेट झाली. तेव्हा म्हणाले, “झेलम, तुम्ही ड्रेक पॅसेजला न जाता अंटार्क्टिका टूर करणार आहात का? असेल, तर पहिलं माझं बुकींग कर.” योगायोगाने आमची प्रीमियम अंटार्क्टिका टूरची तयारी व चर्चा सुरुच होती. मी म्हटलं, “आता आपण ड्रेक पॅसेज टाळत वेळ वाचवून व गैरसोय न होता प्रीमियम अंटार्क्टिका टूर करणार आहोत. “

अंटार्क्टिका म्हणजे सदर्न मोस्ट कॉन्टिनंट One of the most Coldest, Windiest and Driest continents of the world असे ज्याच्याविषयी म्हटले जाते, जे वेगळे व अद्वितीय आहे, ते आपल्या बकेट लिस्टमध्ये असायलाच पाहिजे नाही का? एका सर्व्हेनुसार जगातील जवळजवळ ९० टक्के बर्फ अंटार्क्टिकामध्ये आहे आणि ज्याचे क्षेत्रफळ अमेरिकेच्या दीडपट आहे. अंटार्क्टिकाचे दोन भाग आहेत, ईस्ट आणि वेस्ट ईस्ट अंटार्क्टिकाचे आकारमान दोन तृतीयांश आहे म्हणजे साधारणपणे आपल्या ऑस्ट्रेलिया एव्हडं वेस्ट अंटार्क्टिका आयलंड्स अँडीस पर्वतरांगेपर्यंत पसरले असून ट्रान्स अटलांटिक माऊंटन्सने हे दोन्ही प्रभाग विभागले आहे.

बऱ्याच वेळा ही पूर्ण रेंज बर्फाच्छादित असते. दोन किमी इतका घट्ट बर्फ म्हणजे आपण फक्त कल्पनाच करू शकतो. मोठमोठाले ग्लेशिअर, ग्लेशिअर्सचे समुद्रात पडलेले तुकडे म्हणजेच आईसबर्ग यांचा असा हा बर्फाचा प्रदेश. आपल्यासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशात राहणाऱ्या मंडळींसाठी हे सर्वच कल्पनातीत.

अंटार्क्टिका हा प्रदेश सदर्न हेमिस्फेअरमध्ये असल्यामुळे इथले ऋतू आपल्यापेक्षा वेगळे आहेत. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा इथला उन्हाळा, तर मार्च ते सप्टेंबर हे अंटार्क्टिकामध्ये हिवाळ्याचे महिने असतात. पण उन्हाळा हाच इथला उत्तम ऋतू कारण उन्हाळ्यात सुद्धा इथले तापमान साधारणपणे उणे ५० अंश सेल्सिअस ते उणे ५७ अंश सेल्सिअस असे असते. आत्तापर्यंतचे सगळ्यात कमी तापमान म्हणजे उणे ८९ अंश सेल्सिअस हे व्होस्टोक स्टेशन, अंटार्क्टिका येथे रेकॉर्ड झाले आहे.

असे म्हणतात की, गोबल वॉर्मिंगमुळे गेल्या ५० वर्षात इथला बराच भाग वितळून इथला वॉर्म पेनिन्सुला ( द्वीपकल्प ) वाढतोय. इथे अल्गी, मॉस शिवाय दुसरी हिरवळ नाही. सगळीकडे बर्फाचे आणि पाण्याचे साम्राज्य, परंतु काही पक्षी आणि प्राणी अंटार्क्टिकामध्ये आनंदाने नांदतात. अनेक प्रकारचे पेंग्विन हम्पबॅक व्हेल्स, फिन्स व्हेल्स, ब्लू व्हेल्स, अंटार्क्टिक सिन्कव्हेल्स, अनेक प्रकारचे थंड प्रदेशातील पक्षी जसे साऊथ पोलार स्कुआ, जायंट पेट्रिल, अल्बाट्रॉसेस, वगैरे इथे पाहायला मिळतात. पेंग्विनच्या वसाहती आणि महाकाय व्हेल्स पाहणं हा जगावेगळा अनुभव असतो. इथे अतिथंड पाण्यातील डुबकी आणि छोटा ट्रेकही आपण करु शकतो.

अंटार्क्टिका व्हिझिट ही तशी सोपी नाही. परंतु, जाताना आणि येताना दोन्ही वेळा आपण विमानाने प्रवास केला तर ही टूर फक्त सात दिवसात होते. आपण या टूरला जर क्रूझने गेलो, तर ब्युटिक प्रीमियम क्रूझ आणि इनसाईड केबिन किंवा व्हरांडा केबिन असे पर्याय असून हा प्रवासही विलक्षणच असतो. मंडळी, आपणाला अंटार्क्टिका प्रीमियम स्टाईलमध्ये पाहायचे असेल तर आम्ही २०२५च्या जानेवारीमध्ये घेऊन जाणार आहोत. आमचे वडील म्हणजेच केसरी भाऊ पाटील यांनी तर ही टूर क्याच्या ७०व्या वर्षी केली, तेही थंड पाण्यात यशस्वीपणे डुबकी मारून! हो, या सहलीला आपला फिटनेस महत्वाचा आहे, बरं का..!

अंटार्क्टिकाला जाण्यासाठी आपल्याला आधी साऊथ अमेरिकेला जावे लागते व तिथून पुढे क्रूजने व विमानाने आपण ही सहल करतो. विमानाने जाण्याचा अजून एक फायदा म्हणजे आपल्याला एरिअल व्ह्यू दिसतो, जो एक झकास अनुभव आहे. तसेच, क्रूझ प्रवासाचे आपले जवळजवळ ४ दिवस वाचतात. ड्रेक पॅसेजचा प्रवास थोडा रफ आहे. बरेचदा अनेक मंडळींना सी सिकनेसचा त्रास होतो. शिवाय अंटार्क्टिकाच्या एअर स्ट्रीपवर लँडिंग होते तोही एक सुंदर अनुभव असतो.

आपल्याला स्वतः जायचे असेल किंवा किंवा आईवडिलांना पाठवायचे असेल, तर अंटार्क्टिकाचा हा पर्याय उत्तम आहे. शिवाय दिमतीला आहे केसरीचं आपलं माणूस.

केवळ मर्यादित जागा असणाऱ्या या प्रीमियम अंटार्क्टिका टूर्समध्ये आपल्या सोबत आम्ही देखील असणार आहोत. चला तर मग पहिल्या वहिल्या प्रीमियम अंटार्क्टिका टूर सोबत, अविस्मरणीय अनुभव घ्यायला, फक्त केसरी सोबत!

Tags