स्प्रेडींग स्माईल्स अँड हॅप्पीनेस

४० वर्षे अविरत पर्यटनाची, पर्यटकांच्या आनंदाची आणि समाधानाची !

“मायबाप पर्यटकहो, नमस्कार!” भाऊंनी असे शब्द उच्चारले की सर्व पर्यटक व केसरीअन्सना उत्साह आणि ऊर्जा मिळत असे, हे गेले अनेक वर्ष होत होते. मंडळी, काल ८ जून रोजी केसरीने पर्यटन क्षेत्रातील यशस्वी ४० वर्षे पूर्ण केली. हा प्रवास एका प्रवासाचा अविरत ५० वर्षे सुरु होता. या प्रवासातील भाऊंची कॉमेंट्री म्हणजे पर्यटकांना उत्तमोत्तम माहिती देण्याचा ध्यास, इतिहासातील संदर्भ व भौगोलिक महत्त्व हे सारे आजही पर्यटकांना नेहमी आठवते. वयोमानाने केसरी भाऊंना अलीकडे व्यवसायात सक्रिय राहणे शक्य होत नाही. परंतु त्यांनी पेरलेली ऊर्जा, प्रेरणा आणि सकारात्मकता सर्व केसरीअन्ससोबत असते. केसरी संस्था केसरीभाऊंनी सुरु केलेले पर्यटन क्षेत्रातील एक विद्यापीठच आहे, असे आम्ही म्हणतो. कारण पर्यटन क्षेत्रातील अनेक उत्तम केसरीअन्स व टूर लीडर्स या विद्यापीठामध्ये घडले आणि आजही घडत आहेत.

मंडळी, चाळीस वर्षांचा हा प्रवास मुळीच सोप्पा नव्हता, परंतु आपल्या साथीने आणि विश्वासाने तो नक्कीच आनंददायी झाला आहे. पर्यटकांचा विश्वास आणि प्रेम हीच आमची सगळ्यात मोठी संपत्ती आहे, असे आम्ही मानतो. पर्यटनामुळे जसे आमचे जग बदलले व समृद्ध झाले, तसेच अनेक पर्यटकांचीही आयुष्ये सकारात्मकरित्या बदलली आणि आम्ही या बदलाचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत. पर्यटकांची नेहमी प्रतिक्रिया असते की आम्ही पर्यटनाने जगायला शिकलो, आनंदी राहायला शिकलो, केसरीमुळे आम्ही जग बघितले, अगदी साऊथ अमेरिकेसारखी कठीण टूरही केसरीने आनंददायी केली. आमचे एक पर्यटक गृहस्थ बागमार काका नेहमी म्हणतात, “आमची टूर नेहमी छान होते कारण आमच्यासोबत केसरीचे आपले माणूस असते, जे आमची व्यवस्थित काळजी घेते.” बागमार काकांचा ग्रुप दरवर्षी एक तरी टूर करतो. त्यात ७० ते ९० वर्षांचे तरुण प्रवास करत असतात. हजारो पर्यटकांची नावे डोळ्यासमोर येत आहेत. इथे लिहिता येणार नाही, परंतु केसरीसोबत ४०-५० टूर्स करणारी ही सगळी मंडळी आहेत. अनेकांच्या तीन पिढ्यांनी हा प्रवास केला आहे. आपलं प्रेम आम्हाला सदैव टूरचा दर्जा उत्तम ठेवण्यासाठी प्रेरणा देते. उत्तम सेवेसाठी कोणतीही तडजोड आम्ही करत नाही. आमची सेवा, हॉटेल्स आणि जेवण यांचा दर्जा उत्तरोत्तर वाढवण्यासाठी आपले अभिप्राय आम्हाला बळ देतात. आपल्या या विश्वास व सहकार्याबद्दल सर्व पर्यटकांना सर्व केसरीअन्सतर्फे प्रणाम !

जगभरात जोडले गेलेले ट्रान्सपोर्टर्स, हॉटेलीअर्स आणि सप्लायर्स हे केसरीला सदैव साथ देत आहेत. काही लोकांसोबत तर आम्ही ४० वर्षांपासून जोडलेलो आहोत, याचाही आम्हाला खूप अभिमान वाटतो. आज केसरी परिवार देशातच नाही तर सप्तखंडात विस्तारलेला आहे. यातली बरीचशी मंडळी स्वतःला केसरी परिवाराचे सदस्यच समजतात.

४० वर्षात केसरीने अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना भारतीय पर्यटन क्षेत्राला दिल्या आहेत. केसरीने नव्वदीच्या शतकात हनिमून टूर्स सुरु केल्या. स्वतः संचालक टूर्ससोबत जात असत अशा जमान्यामध्ये केसरीने टूर लीडर्सचा मोठा ताफा तयार केला आणि त्यामुळे एका वेळी अनेक टूर्स होऊ लागल्या. जेव्हा भारतीय महिला एकट्या फिरत नव्हत्या तेव्हा खास महिलांसाठीच्या माय फेअर लेडी टूर्सची सुरुवात केसरीने केली. सिनिअर्स सिटीझन्ससाठी सेकंड इनिंग्स टूर्स सुरु केल्या. खूप बिझी शेड्युल असणाऱ्या मंडळींसाठी केसरीचा छोटा ब्रेक, शेतकऱ्यांसोबत केलेल्या ऍग्रो टूर्स, मुलांसाठी नासाच्या स्टुडंट्स टूर्स, कॉर्पोरेट क्षेत्रासाठी केसरी माईस टूर्स, धार्मिक स्थळांच्या आनंददायी यात्रेसाठी केसरीच्या मारीगोल्ड टूर्स, इंडिव्हिज्युअल आणि कुटूंबांना कस्टमाइज्ड टूर्स देण्यासाठी ग्रुप तुमचा, बजेट तुमचे आणि सहकार्य आमचे या तत्वावर केसरी सिलेक्ट नेहमीच सज्ज असते. केसरीने अशा अनेक नवीन संकल्पना सुरु केल्या आहेत आणि त्या आजही सर्व ठिकाणी राबवत आहोत. टूर्ससोबत ब्रँड अँबेसेडर ही एक नवीन संकल्पना तर पर्यटकांनी खूपच उचलून धरली आहे.

मंडळी, सतत काही तरी नवनवीन करायला हवे म्हणूनच केसरीने आता केसरी अवेडिंग्स ही डेस्टिनेशन वेडिंग कंपनी सुरु केली आहे. या मार्फत देशविदेशातील डेस्टिनेशन वेडिंग्स आवाक्यातील किंमतीत शक्य होणार आहे. केवळ १५ लाखांपासून गोव्यातील डेस्टिनेशन वेडिंग करता येणार आहेत. परदेशातील आलिशान डेस्टिनेशन वेडिंग्सही आपण केसरी अवेडिंग्सच्या साथीने करू शकतात.

आम्हाला हे सांगायला आनंद होत आहे की पर्यटनासाठी लागणाऱ्या साऱ्या गोष्टी पर्यटकांना एकाच ठिकाणी खरेदी करता याव्यात म्हणून केसरीने shop.kesari.in हे नवीन ऑनलाईन स्टोअर सर्व पर्यटकांसाठी सुरु केले आहे. आम्हाला खात्री आहे की एक्केचाळीसाव्या वर्षातील या नवीन उपक्रमालाही आपणा पर्यटकांची आम्हाला साथ लाभेल. तुमच्या या निरंतर विश्वासामुळेच आम्ही जे करणार ते उत्तमच असेल हे नक्कीच.

मंडळी, प्रवास अनंत अखंड आहे. मग तो प्रवास आयुष्याचा असो वा पर्यटनाचा. तो आनंदी बनविण्यात अनंत हातांचे योगदान असते. त्याची आठवण ठेऊन आपला प्रवास अविस्मरणीय बनवूयात ! पर्यटन करता करता लाखोंचा हा परिवार सदैव आनंदी राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद !

Tags