व्हिसा फ्री परदेशवारी

परदेशवारीच्या पूर्वतयारीचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे आपण भेट देणार त्या देशाचा व्हिसा. हा व्हिसा एकदा मिळाला की जीव भांड्यात पडतो. पण जगाच्या पाठीवर असेही काही देश आहेत जिथे भारतीय पासपोर्ट धारक व्हिसा शिवायही भेट देऊ शकतात. काही देशात गेल्यावर आपल्याला एअरपोर्टवरच त्या देशाचा ऑन अराईव्हल व्हिसा देण्यात येतो. अशा बऱ्याच देशांना भेट देण्यासाठी भारतीय पर्यटक परदेशवारी करतात. अनेक वेळा पहिली परदेशवारी याच देशांना होते.

पॅनडॅमिकनंतरच्या काळात अजूनही काही देशांचा व्हिसा मिळणे मुश्किल व वेळ घेणारा आहे. तर काही देशांनी आता भारतीयांना फ्री व्हिसा तर काही काहींनी ऑन अराईव्हल व्हिसा देऊ केला आहे. श्रीलंका, मॉरिशस, नेपाळ, भूतान, थायलँड, मलेशिया, ट्युनिशिया, सेनेगल, एल साल्वाडोर, मकाऊ, कझाकस्तान, त्रिनिदाद, टोबॅगो, जमैका, हाइती, डॉमिनिका, बारबाडोस, ब्रिटीश व्हर्जिन आयलॅड़, कतार, ओमान, फीजी, कूक आयलँड हे व्हिसा फ्री देश आहेत. या सगळ्या देशांची नावे इथे तुमच्या माहितीसाठी देत आहे, कारण अगदी आयत्या वेळी सुद्धा जर परदेशवारी करावीशी वाटली तरी या पैकी कोणताही देश तुम्ही निवडू शकतात. नुकतेच भारतीयांना मलेशिया आणि थायलँड या देशांनी व्हिसा शुल्क माफ केले आहे. सिंगापूर – थायलँड – मलेशिया अशी टूर करायची आहे. तर एकूण खर्चातून या दोन देशांची व्हिसा फी कमी झाल्यामुळे टूरचा खर्चही कमी झाला आहे. तर मंडळी, सिंगापूर थायलँड मलेशिया फिरायची इच्छा असेल तर हीच ती योग्य वेळ आहे. या संधीचा त्वरित लाभ घ्या.

व्हिसा ऑन अराईव्हल ही सुविधा उपलब्ध असलेल्या देशांमध्ये काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागली लागते. सहा महिने वैध पासपोर्ट, दोन पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स, विमानाचे परतीचे तिकीट, निवासी हॉटेल कन्फर्मेशन, बँक स्टेटमेंट, आदी कागपत्रे सोबत असल्यास या देशांमध्ये विमानातून उतरताच तुम्हाला व्हिसा मिळतो.

काही देशांमध्ये कागदपत्रांची पूर्तता करतानाच निगेटिव्ह हेल्थ रिपोर्ट सुद्धा आवश्यक असतो. एखाद्या देशात आपण बाय रोड प्रवेश करत असाल तर व्हिसा मिळण्यासाठी एंट्री परमिट सुद्धा लागू शकते.

बरेचदा पर्यटक विचारतात, की तुम्हाला टूर बुकिंगसाठी बँक स्टेटमेंट्स, इन्कम टॅक्स रिटर्न्स, इन्व्हेस्टमेंट्स हे सगळे का हवे? तर मंडळी, ही सगळी कागदपत्रे व्हिसा मिळवण्यासाठी त्या देशाच्या दूतावासाच्या पाठवावी लागतात. परदेश प्रवास करणाऱ्या व्यक्तींची आर्थिक माहितीही अशा वेळी तपासली जाते.

सध्या अमेरिकेच्या व्हिसासाठी वर्षभर तरी थांबावे लागते. तर युरोपच्या काही देशांच्या व्हिसासाठी सहा महिने तयारी करावी लागते. या देशांच्या भेटीचे स्वप्न प्रत्येक पर्यटकांचे असते. परंतु ते शक्य नसेल आणि तरीही परदेशवारी करायची असेल तर चिंता करण्याचे कारण नाही. व्हिसा फ्री देशांची भटकंती करूया. जानेवारी ते मार्च हा परदेश प्रवासाचा उत्तम सिझन केसरीच्या वेबसाईटला भेट द्या, व्हिसा फ्री देशांच्या सहलींचे सर्वोत्तम पर्याय उपलब्ध आहेत. त्यातून आपल्या आवडीची सहल निवडा. केसरीच्या टोल फ्री क्रमांकावर संवाद साधून आपल्या सर्व शंकांचे निरसन करा. आपल्या सुट्ट्यांचे नियोजन करत त्वरित सहल बुक करा आणि पीक सिझन सरचार्ज टाळा. चला तर मग, व्हिसा फ्री देशांची सफर करायला, फक्त केसरी सोबत !

केसरी, स्प्रेडींग स्माईलस अँड हॅप्पीनेस

Tags