ट्रेंडिंग व्हिएतनाम

“अगं झेलम, व्हिएतनाममध्ये काय एव्हडं विशेष आहे गं ? सगळेच व्हिएतनामला निघालेत. ” माझ्या एक मैत्रिणीचा मला फोन आला. आणि पुढे लगेच म्हणाली, “ए, मला पण आठ एक दिवसांची एखादी व्हिएतनामची असेल तर सांग गं. जरा बघूनच यावं म्हणतेय हे व्हिएतनाम. “

भारतीय पर्यटकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, हे जरी खरं असलं तरी पर्यटकांना नवनवीन पर्यटनस्थळांना भेट द्यायला आवडतं, हेही तेव्हडंच खरं आहे. मागच्या काही वर्षांत अनेक पर्यटकांनी मालदीव्सला पसंती दिली होती. परंतु, गेल्या एक दीड वर्षांपासून व्हिएतनाम आणि बाकू या दोन पर्यटनस्थळांना पर्यटकांनी भरभरून पसंती दर्शवली आहे.

सोशलिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएतनाम म्हणजेच व्हिएतनाम हा खरं तर एक छोटासा देश. फक्त ३,३१,७०० चौ किमी परिसरात पसरलेल्या साऊथ ईस्ट एशिया मधल्या व्हिएतनाम या देशाच्या उत्तरेला चीन आणि पश्चिमेला लाओस व कंबोडिया हे देश आहेत. या देशाच्या अवतीभवती पाणी असल्यामुळे हा देश थायलँडच्या खाडीने थायलँड, फिलिपाइन्स, इंडोनेशिया आणि साऊथ चायना समुद्राने मलेशियाला जोडला गेला आहे. हनॉई हे राजधानीचे शहर आहे तर हो चि मिन्ह हे सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर आहे. या शहराचे जुने नाव सायगॉन असे होते.

खरं तर हा भारतासारखाच शेतीप्रधान देश परंतु शेतीमध्ये या मंडळींनी प्रचंड प्रगती केली आहे. इथे फिरताना आपल्याला असं वाटावं जणू हा ड्रॅगन फ्रुट्स आणि लिचीचाच प्रदेश आहे. दूरवर पसरलेली ड्रॅगन फ्रुट्सची शेती इथे पाहायला मिळते. शिवाय केळी, नारळ, चहा, कॉफी आदींचे उत्पादनही या देशात होते. हा देश तांदूळ आणि मत्स्यउत्पादनांची निर्यातही करतो. इथले लोक फिश फार्मिंग करतात आणि उत्तम दर्जाचे खेकडे व लॉबस्टर निर्यात करतात. ज्यामुळे परदेशी उत्पन्न मिळवून देशाच्या आर्थिक उलाढालीत हातभार लागतो.

मला व्हिएतनाममध्ये सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे इथली प्रचंड स्वच्छता. इथली शहरे, इथले रस्ते खूपच स्वच्छ आहेत. रस्त्याने जाताना कुठेही कचरा किंवा प्लास्टिकचा लवलेशही नाही. प्रत्येक मनात अशी स्वच्छतेची भावना असेल तर हे शक्य होतं.

केवळ व्हिएतनामची सहल असेल तर आपण हनाई, हलाँग बे, हो चि मिन्ह, आदी शहरांना भेट देतो. हनॉई या राजधानीच्या शहरात आपण विविध मंदिरे, राईस पॅडी, स्वॉर्ड लेक, बा डीन स्क्वेअर, आणि ज्याला हलाँग बे ऑन लँड म्हटले जाते ते टम कॉक आपण पाहतो. हलाँग बे ही एक अमेझिंग युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. हिरव्या पाचूसारखे पाणी आणि त्यातून प्रचंड लाईमस्टोनच्या एक दोन नाहीत तर हजारो रचना अशी ही सुंदर जागा नक्कीच स्वर्गवत भासते. खूप सारी बेटे कॉक फायटिंग रॉक, सेल आयलँड, इंसेन्स बर्नर रॉक, सी डॉग रॉक हे पाहतानाही खूप मज्जा येते. शिवाय आपण फ़्लोटिंग व्हिलेजला भेट देतो व डीनर क्रूजही करतो. सारं कसं अद्भुत व सुंदर, पूर्वी न पाहिलेलं असं या दिवशी आपण अनुभवतो. मिकाँग डेल्टा, मिकाँग नदी या परिसरातून फिरताना आपल्याला या देशातील शेतीप्रधान संस्कृती आपल्याला अनुभवायला मिळते. हनी टी, हनी बी फिडींग आणि टमटममधून प्रवासाने मला व्हिएतनाममध्ये सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे आपल्याला गावाकडला फील येतो. विन ट्रॅन्ग पॅगोडा आपल्याला व्हिएतनामवरील चायनीज, कंबोडिया आणि फ्रेंच पगडा असल्याचे दर्शवितो. व्हिएतनामला जरी १९४५ मध्ये स्वातंत्र्य मिळाले असले तरी जवळ जवळ १९७५ पर्यंत ते युद्धग्रस्त होते. युद्धाच्या खुणा जपणारे कु चि टनल पाहणं हा एक वेगळाच अनुभव आहे. तर व्हिएतनाममध्ये केलेली खरेदी हा एक सुखद अनुभवच.

थायलँड, जपान या देशातील बायका सदैव कामात मश्गुल असतात. प्रचंड काम करतात. हा अनुभव इथेसुद्धा येतो. व्हिएतनामध्ये उगाचच आपण श्रीमंत आहोत, असे वाटते. कारण २०० भारतीय रुपये म्हणजे सुमारे ५८,८०० व्हिएतनामी डाँग आहेत. व्हिएतनामला भारतीय मोठया संख्येने जाण्याचे दूसरे कारण म्हणजे व्हिसा मिळण्याची सोपी पद्धत. पटकन मिळणार व्हिसा आणि इथे उत्तम एअरलाईन्सही आहेत.

आपण जर फक्त व्हिएतनाम प्रवास केला तर हा एक देश व्यवस्थित पाहून होतो. एका सहलीत दोन देश पाहायचे असतील, तर व्हिएतनाम कंबोडिया एकत्र करू शकतो. अशाने तिकिटाच्या खर्चातही बचत होते. चला तर मंडळी या वर्षी व्हिएतनाम कंबोडिया पाहण्याचे स्वप्न पूर्ण करूया, फक्त केसरी सोबत.

केसरी नेहमीच एक अविस्मरणीय अनुभव.

पर्यटकांसाठी महत्त्वाची टीप

व्हिएतनाममध्ये प्रवास करताना भरपूर पाणी प्या म्हणजे आपण डिहायड्रेट होत नाही. आणि व्हिएतनामी टोपीचा उपयोगही करा. फोटोग्राफी तसेच रील्स बनवण्यासाठी इथे चांगला वाव आहे.

Tags