समुद्रीय बेटांचे सौंदर्य – फिलिपिन्स!

स्नॉर्कलिंग ही माझ्या फॅमिलीची खूप आवडती ऍक्टिव्हिटी आणि मलाही ते फार आवडतं. इतकंच काय तर माझा नवरा, दोन्ही मुलं आणि आता सूनसुद्धा, आमच्याकडे सगळेच सर्टिफाईड स्कूबा डायव्हर्स आहेत! त्यामुळे समुद्रकिनारे, विशेषतः जिथे छान स्नॉर्कलिंग करता येईल अशी ठिकाणं आम्हाला खूप आवडतात. याच आवडीमुळे आतापर्यंत अंदमान, हवाई, मालदिव्स, मॉरिशस, फिलिपिन्स, ऑस्ट्रेलिया अशा अनेक डेस्टिनेशन्सना आम्ही स्नॉर्कलिंग केलं आहे.” इट्स नॉस्टॅल्जीक ! आम्ही बावीस वर्षांपूर्वी फिलिपिन्सच्या बोराकेमध्ये केलेलं स्नॉर्कलिंग मला आजही जसंच्या तसं आठवतं. पाण्याखालचं हे सुंदर विश्व पाहताना तासंतास कसे जातात हे कळत नाही. याच फिलिपिन्सबद्दल आज थोडं जाणून घेऊया.

फिलिपिन्स म्हणजेच रिपब्लिक ऑफ फिलिपिन्स हा देश ७००० हून अधिक बेटांचा समूह, जणू निसर्गाने वेळ घेऊन रंगवलेलं एक सुंदर चित्रच ! उत्तरेला तैवान, दक्षिणेला इंडोनेशिया आणि नैर्ऋत्येला मलेशिया, सिंगापूर, पर्यटकांच्या साऊथ ईस्ट एशियातील ऑल टाईम फेव्हरिट देशांनी फिलिपिन्स देशाला वेढलेलं आहे. तर फिलिपिन्सच्या वायव्येला महाकाय चीन आहे. मनिला हे फिलिपिन्सचं राजधानीचं शहर आहे तर सुमारे साडे अकरा कोटी लोकसंख्येसह फिलिपिन्स हा सर्वाधिक लोकसंख्येच्या यादीत जगात १४ व्या क्रमांकावर आहे.

हा निसर्गरम्य देश पाहण्यासाठी केसरीकडे ८ दिवस ७ रात्रीची फिलिपिन्स विथ पलावन ही धम्माल टूर आहे. या टूरमध्ये फिलिपिन्सच्या मनिला, सेबू आणि बोराके या तीन सुंदर शहरांना तर आपण भेट देतोच, सोबत पलावान हे मनमोहक आयलँडही आपल्याला पाहता येते. टरक्वॉइज ब्लू पाणी आणि नयनरम्य समुद्रकिनारा ! हा नजारा पर्यटकांसाठी अगदी पैसा वसूल अनुभव ठरतो.

स्वच्छ समुद्रकिनारे, निळसर पाणी, घनदाट जंगलं आणि भव्य डोंगररांगा असलेलं पलावन हे फिलिपिन्समधलं सर्वोत्तम बेट. आपल्या अमर्याद निसर्ग सौंदर्यामुळे द लास्ट फ्रंटियर म्हणून लावन ओळखलं जातं. प्युएर्तो प्रिन्सेसा अंडरग्राऊंड रिव्हर हे इथलं मुख्य आकर्षण. चुनखडीच्या गुंफांमधून वाहणारी ही नदी जगभरातील पर्यटकांना भुरळ घालते. बोटीत बसून या गुंफांत प्रवास करताना एखाद्या जादुई दुनियेत प्रवेश केल्यासारखं वाटतं. गुंफांमध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेल्या कलाकृती आणि चमकणाऱ्या भिंती यामुळे हा अनुभव अधिकच लक्षात राहतो. ही नदी इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे की तिचा समावेश जगातील सात नैसर्गिक आश्चर्यांच्या यादीत आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीतही होतो.

दुसरं प्रमुख आकर्षण, फिलिपिन्समधलं देखणं शहर म्हणजे बोराके आयलँड. आपल्या क्रिस्टल क्लिअर पाण्यासाठी इथले समुद्रकिनारे विशेष प्रसिद्ध आहेत. कदाचित म्हणूनच या बेटाला आयकॉनिक आयलँड म्हणूनही ओळखलं जात असावं. आपल्या आवडीनुसार इथे स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंग, आयलँड हॉपिंग, पॅरासेलिंग, जेट स्कीइंग अश्या विविध वॉटर अॅक्टिव्हिटीज आपल्याला करता येतात. इथल्या प्रसिद्ध व्हाइट बीचला भेट देत घेतलेला सनसेट कृझचा अनुभव प्रत्येक पर्यटकाने एकदा तरी घ्यावा असाच आहे! बोराकेमधली आणखी एक खास जागा म्हणजे इथला डी मॉल. इथे आपल्याला मनसोक्त खरेदी करता येते. महिलांसाठी तर हे पर्ल पॅराडाईजच! कारण इथल्या महिला जास्तीतजास्त रंगीबेरंगी पर्ल्स वापरताना दिसतात. त्या रंगीबेरंगी माळा पाहताना आपणही हरवून जातो.

सेबू हे फिलिपिन्समधलं एक टूरिस्टिक शहर आणि बेट. फिलिपिन्सच्या गौरवशाली इतिहासाच्या पाऊलखुणा आपल्याला सेबूमध्ये जागोजागी दिसून येतात. ऐतिहासिक स्थळांपासून ते धार्मिक स्थळांपर्यंत – फक्त नाव घ्या, सेबूमध्ये सर्व काही आहे! इथल्या ताओईस्ट टेम्पलमधून दिसणारा सेबू शहराचा नजारा डोळ्यात भरून घ्यावासा वाटतो. फिलिपिन्स समजून घ्यायचं असेल, तर टूरमध्ये सेबू असायलाच हवं!

इथल्या निसर्गरम्य अश्या बोहोल आयलँडलाही आपण भेट देतो. बोहोल म्हंटले की डोळ्यांसमोर येते ते म्हणजे सरळसोट, शिस्तीत उभी असलेली महोगनी झाडाची हिरवीगार आणि घनदाट जंगलं, मोठाल्या डोळ्यांनी पाहणारा छोटुसा प्राणी टार्सियर आणि शांतपणे वाहणारी निळीशार लोबोक नदी. इथली चॉकलेट हिल्स तर जगप्रसिद्ध आहेत. खऱ्याखुऱ्या चॉकलेटपासून बनलेले हिल्स नव्हे, तर निसर्गाचा हा एक अद्भुत आणि अविश्वसनीय चमत्कारच. एखाद्या आईसक्रीम कोनसारख्या दिसणाऱ्या जवळजवळ १२०० टेकड्यांचा हा समूह ! नजर जाईल तिथपर्यंत हिरव्यागार झाडांमध्ये सजलेल्या चॉकलेटी रंगाची शिखरं पाहताना आपण कुठल्या तरी चॉकलेटच्या जगातच तर नाही ना आलो, असा प्रश्न पडतो. इथल्या फास्टेस्ट फेरी बोटने आपण इथल्या कोरल रीफचं रंगीबेरंगी दृश्य अनुभवतो.

या टूरमध्ये पुढे आपण फिलिपिन्सच्या राजधानीचं शहर, मनिलामध्ये दाखल होतो. देशातील सर्वाधिक लोकसंख्येचं शहर आज पर्यटनासाठी जगप्रसिद्ध आहे. शिवाय, साऊथ ईस्ट एशियातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्येही मनिलाचा समावेश होतो.

या शहराच्या नावाची कथा फारच रोचक आहे ! खरं तर मनिला म्हणजे अशी जागा जिथे इंडिगो (निळ्या) रंगाचा शोध लागला. निला हा स्थानिक शब्द संस्कृतमधल्या नील या शब्दावरून आला. नील म्हणजे निळा रंग. असं मानलं जातं की, या परिसरातील विशिष्ट वनस्पतींपासून पूर्वी हा निळा रंग तयार केला जायचा. त्यामुळेच या ठिकाणाला पूर्वी मयनिला म्हणत असत, जे पुढे मनिला असं झालं.

मनिलामध्ये भव्य किल्ले, जुनी घरं, चर्चेस, सुंदर पार्क्स, इंट्राम्युरससारखा भिंतींनी वेढलेला ऐतिहासिक परिसर, दगडी रस्ते आणि लोकल मार्केट्स अशा अनेक जागा पाहिल्यावर आपल्याला इथे पुन्हा पुन्हा यावसं वाटेल. 

आज आपल्याला कोणत्याही डेस्टिनेशनला जायचं असेल तर तिथले फोटोस, व्हिडीओस आपल्याला अगदी सहज उपलब्ध आहेत. एकदा पलावन आयलँडचे फोटोस, व्हिडीओसही पाहा, आमच्या पर्यटकांनी केलेली धम्माल पाहिल्यावर आपल्यालाही इथे नक्कीच जावंस वाटेल. नितळ समुद्रकिनारे, अप्रतिम नद्या, रम्य धबधबे, मनसोक्त शॉपिंग, स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग यासारख्या वॉटर अॅक्टिव्हिटीज असलेला, इतिहास आणि आधुनिकतेचा सुरेख संगम असलेला फिलिपिन्स देश आपल्याला अनुभवायचा असेल, तर केसरीची फिलिपिन्स विथ पलावन टूर आपल्या ट्रॅव्हल बकेटलिस्टमध्ये असायलाच हवी! आता इथे हिवाळा सुरू होतोय आणि ही या टूरसाठी परफेक्ट वेळ आहे! त्वरित बुकिंग करा आणि चला एका अनोख्या प्रवासाला, एक अविस्मरणीय अनुभव घ्यायला, फिलिपिन्स पाहायला, फक्त केसरीसोबत!

Tags