अविस्मरणीय तीर्थाटन… केसरी मारीगोल्डसोबत !

लाखो भाविकांनी गौरविलेल्या आध्यात्मिक यात्रांना आपणही चला !

मंडळी, आज २१व्या शतकात विज्ञान – तंत्रज्ञानाने भरधाव प्रगती केली आहे. मग इस्त्रोचं चंद्रयान- ३चं यशस्वी लैंडिंग असो किंवा २०४० साली चंद्रावर स्वारी करण्याची भारतीयाची मोहिम असो. वेगाने बदलत्या तंत्रज्ञानाचं प्रतिबिंब ऑर्बिटल स्पेस टूरिझमच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्रातही दिसून येत आहे. यावर जगातील अनेक स्पेस कंपन्यांसह अनेक देश रियुजेबल ऑर्बिटल व्हेइकलवर काम करत आहेत. ही ऑर्बिटल स्पेस टूर करण्याचं स्वप्न केसरीनेही मनी बाळगलं आहे. कारण पर्यटकांना वेळोवेळी नाविन्यपूर्ण सेवा देणं… हाच केसरीचा ध्यास !

राजस्थानच्या १३ पर्यटकांसह सुरू केलेली पहिली सहल आज लाखो पर्यटकांसह सप्तखंडात पोहचली आणि भविष्यात अंतराळात झेप घेणार हे सुद्धा निश्चित! यावेळी मनात एक गोष्ट मात्र कायम असेल आणि ती म्हणजे जिथून पर्यटनाचा उगम झाला त्या तिर्थाटनाचे आणि ज्यांनी याचा प्रारंभ केला त्या पूर्वजांचे शतशः आभार! आपली बहुरंगी संस्कृती समजावी, भेटी-गाठीतून वैचारिकतेची देवाण-घेवाण व्हावी, मन, शरीर आणि आत्म्याचं शुद्धीकरण व्हावं यासाठी त्यांनी ठिकठिकाणी धार्मिक अधिष्ठानं उभारली, तीही निसर्गाच्या सानिध्यात! तीर्थाटन करताना मनात येणारे सात्विक विचार, सद्भावना आणि सकारात्मकता… हे सारं काही मनाला भुरळ घालतं. पूर्वजांच्या विचारांचा हा वारसा आधुनिक पर्यटनाशी सांगड घालत आपल्या देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी पुढे घेऊन जात आहेत. हैद्राबाद येथील श्री रामानुजाचार्य यांचा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, रामराज्य आणणारं अयोध्येतील राम मंदिर… अशा अनेक तीर्थक्षेत्रांची स्थापना करत आहेत. वैविध्यतेने नटलेल्या आणि संस्कृतीचा मोठा गाभा असलेल्या आपल्या देशाच्या पर्यटनाला उजाळा देत एक भारत श्रेष्ठ भारत असल्याचं ते दाखवून देत आहेत. तसंच आपल्या मूल्यांचा कलात्मक माध्यमातून विस्तार व्हावा, नविन पिढीला ओळख व्हावी यासाठी नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र उभारण्यात आलं. जिथे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी भारतीय संगीत, ललित कला, हस्तकला अशा अनेक गोष्टींचं संवर्धन होताना दिसतं. याची प्रचिती नुकत्याच सुरू झालेल्या श्रीकृष्ण चरित्र यात्रेवर आधारित जगातील पहिला म्युझिकल शो राजाधिराजच्या माध्यमातून झाली.

मंडळी, नुकतीच झालेली पंढरीची वारी असो, येणारी श्रीकृष्ण जन्माष्टमी किंवा गणेशोत्सव असो… या दरम्यान सकारात्मक उर्जेने भरलेलं एक आध्यात्मिक वातावरण तयार होतं. याच पवित्र वातावरणाची अनुभूती घेता यावी आणि आपल्या हजारो वर्षांच्या परंपरेचं जतन व्हावं म्हणून केसरीद्वारे मारीगोल्ड यात्रा सुरू करण्यात आली! गेल्या ४० वर्षांपासून नाविन्याची कास धरत तीर्थक्षेत्रांची ही मंगलमय यात्रा सुरू आहे. अष्टविनायकांच्या दर्शनापासून होणारा श्रीगणेशा, १२ ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रातील ५ ज्योतिर्लिंग, श्रद्धा सबूरीचा संदेश देणारे शिर्डीचे साई बाबा, गॉड्स ओन कंट्री दक्षिणेतील टेंपल टूर, दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या वास्तव्याने पावन झालेले पिठापुरम कुरवपूर श्रीशैलम, जगन्नाथपुरी कोलकाता गंगासागर, सौराष्ट्र पालिताना स्टॅच्यु ऑफ युनिटी, डिवाईन नेपाळ मुक्तीनाथ यांच्यासह भारताच्या चहूबाजूंच्या प्रमुख धार्मिक अधिष्ठानांचा मारीगोल्डमध्ये समावेश करण्यात आला आहे. धाम या डिव्हिजनमध्ये उत्तरांचल चारधाम, पारंपरिक चारधाम, त्रिधाम यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. भारताच्या विविध राज्यात प्रवास होत असल्याने हवामानाच्या अनुकुलतेचा विचार करून ही धाम यात्रा आयोजित केली जाते, या सगळ्यांमध्ये भाविकांनी गौरवलेली आणि देशात सर्वप्रथम सुरू झालेली यात्रा म्हणजे श्रीकृष्ण चरित्र यात्रा! जिथे श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते निर्वाणस्थळापर्यंत त्यांच्या पदस्पर्शाने पावनभूमीची अनुभूती घेता येते.

तरूणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक वयोगटातील भाविकांचा यात्रांना उदंड प्रतिसाद लाभत आहे. चारधाम, अमरनाथसारख्या आव्हानात्मक यात्रा यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या आधुनिक श्रावण बाळ अर्थात केसरीच्या आपल्या माणसाच्या कार्याला पर्यटकांनी वेळोवेळी गौरविलं आहे. यात्रांदरम्यान अनुभवता येणारी देवांची महती, संत-महंताची गाथा यांच्या कार्याची उजळणी करताना, निसर्गाच्या सानिध्यात वावरताना आपणही सकारात्मक विचारातून बदलतो आहोत आणि घडतो आहोत…याची प्रत्येक पावलांवर जाणीव होते. तर मंडळी येणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त त्यांच्या आदर्शवत चरित्र यात्रेला सहकुटुंब चला किंवा देशातील इतर मंगलमय यात्रांचा घ्या एक अविस्मरणीय अनुभव फक्त केसरी मारीगोल्डसोबत !

Tags